Top Post Ad

बनावट कागदपत्रांच्या आधारे उभारले 'संतनगर' गृहसंकुल


  विरार पूर्वेकडील मनवेल परिसरात बनावट कागदपत्रांच्या आधारे १८ इमारतींचे  संतनगर नामक गृहसंकुल उभारल्या प्रकरणी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यासह १४ जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.प्रमोद दळवी असे गुन्हा दाखल झालेल्या शिंदे गटातील पदाधिकाऱ्याचे नाव आहे.दळवी हे शिंदे गटात नालासोपारा विधानसभा संघटक असून त्यांच्या विरोधात याआधीही विरार पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे.त्यातच आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने प्रमोद दळवी यांच्या अडचणी वाढणार आहेत.प्रभाग समिती ब चे सहा.आयुक्त सुरेश हरेश्वर पाटील यांनी विरार पोलीस ठाण्यात ३४,४२०,४६८,४७१ तसेच एम.आर.टी.पी कलमान्वये सदरचा गुन्हा दाखल केला आहे.विशेष म्हणजे  शिंदे गटाचे प्रमोद दळवी हे मनसुख हिरेन प्रकरणात सहभाग असल्याचा पुरावा मिळाल्याने एनआयएच्या कोठडीत असलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा उजवा हात म्हणून ओळखले जातात.

                     वसई विरार पालिकेच्या प्रभाग समिती ब अंतर्गत येणाऱ्या मनवेल पाडा परिसरात मौजे विरार सर्व्हे नंबर २२६ पै,सर्वे नं २३८,सर्व्हे नं. २२६ हिस्सा नं. ५ या जमीनीवर विकासकानी बनावट बांधकाम परवानगीच्या आधारे ४ मजली १८ इमारतीचे बांधकाम केलेले असल्याबाबत ठाकरे गटाचे उप शहर प्रमुख विनायक भोसले तसेच मानवधिकार फाऊंडेशन नरेंद्र बाईत यांनी तक्रार दाखल केली होती.याठिकाणी गुन्हा दाखल झालेल्या १४ विकासकांनी १) संत ज्ञानेश्वर अपार्टमेंट,२)संत गाडगेबाबा अपार्टमेंट,३) संत चक्रधर अपार्टमेंट,४) संत तुकाराम अपार्टमेंट,५) संत निवृत्ती अपार्टमेंट, ६) संत गोराकुंभार अपार्टमेंट,७) संत मुक्ताबाई अपार्टमेंट, ८)व्हि. एन. संकुल अपार्टमेंट,९) संत चोखामेळा अपार्टमेंट, १०)संत जनाबाई अपार्टमेंट, ११) संत रामदास अपार्टमेंट,१२) संत बहिणाबाई अपार्टमेंट,१३)संत सोपान अपार्टमेंट, १४)वरद विनायक अपार्टमेंट,१५)संत नामदेव अपार्टमेंट, १६)संत कबीर अपार्टमेंट,१७) संत मिराबाई अपार्टमेंट,१८)संत एकनाथ अपार्टमेंट या इमारती कोणत्याही सक्षम प्राधीकाऱ्याची परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधल्याचे दिसून आले.

त्यामुळे संबंधित विकासकांना प्रभाग समिती ब च्या सहा आयुक्तांनी दि.१६/०३/२०२३ रोजी एमआरटीपी कायदयान्वये नोटीस बजावण्यात आली होती. सदर नोटीसचे अनुपालन विकासकांनी न केल्याने प्रभाग समिती ब च्या सहा.आयुक्तांनी नगररचना विभागाकडे बांधकाम परवानगी बाबत पत्रव्यवहार केला असता उप संचालक,नगररचना विभाग यांनी मौजे २२६(पै), सर्व्हे नं. २२६(पै), सर्व्हे नं. २३८/५ पै. या ठिकाणी केवळ विकासक किशोर डी. नाईक यांना बांधकाम परवानगी दिलेली असून त्याव्यतिरीक्त बांधकाम केले असल्यास योग्य ती कार्यवाही करणेबाबत आदेश जारी केले होते.परंतू किशोर पाटील यांना दिलेली बांधकाम परवानगी जशीच्या तशी वापरून १८ इमारतींचे अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आले. तसेच सदरच्या इमारती अधिकृत असल्याचे भासवून दस्त नोंदणीकृत करून देऊन महापालिकेची व ग्राहकांचीही फसवणुक केल्याची बाब पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच सदर विकासकाविरुद्ध महापालीकेतर्फे कायदेशिर फिर्याद दिली आहे.

गुन्हे दाखल झालेल्या विकासकांची नावे

  • १)मे.सुगंधा इंटरप्रायजेस तर्फे निलेश गावड
  • २)मे.जे. बी. कंन्स्ट्रक्शनचे राजेंद्र गायकवाड
  • ३)मे.ओमसाई कंन्स्ट्रक्शनचे संजोग यंदे
  • ४)मे. जय एंन्टरप्रायजेस तर्फे जयेश नाटेकर
  • ५)मे.ओमकार डेव्हलपर्स तर्फे प्रमोद वैदय
  • ६)मे.एकविरा बिल्डर्स ऍन्ड डेव्हलपर्स तर्फे अशोक महादेव दहिबावकर
  • ७)मे. व्हि. एन. डेव्हलपर्स तर्फे नागेंदर सिंह
  • ८)मे.जी. बी. कंन्स्ट्रक्शन तर्फे समीर बिडये
  • ९) मे.आसरा इंटरप्रायजेस तर्फे विवेक राजापकर
  • १०) मे.ओमकार डेव्हलपर्स तर्फे धनेश खानोलकर
  • ११)मे.तेजस कंन्स्ट्रक्शन तर्फे प्रमोद दळवी
  • १२) मे.आम साई कन्स्ट्रक्शन तर्फे धनेश राऊत
  • १३) मे.जय मातादी कंन्स्ट्रक्शन तर्फे प्रकाश दामोदर पाटील 
  • १४)मे,मंगलम डेव्हलपर्स तर्फे देवराज यादव
निलेश नेमण ....विरार : 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com