Top Post Ad

मी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारसरणीचा - सत्यपाल महाराज


 सप्त खंजिरीवादक सत्यपाल महाराज चिंचोळकर यांच्यावर शुक्रवारी मुंबईत प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात सत्यपाल महाराज गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलीसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अंधश्रद्वा, व्यसनमुक्ती आणि अनिष्ठ रुढी परंपरांविरुद्ध सत्यपाल महाराज आपल्या पुरोगामी विचारसरणीतून प्रहार करतात. महाराष्ट्रातील एक अग्रणी प्रबोधनकार म्हणून त्यांची ओळख आहे. बुद्ध जयंतीनिमित्त मुंबईतील नायगाव दादर येथे सत्यपाल महाराजांचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. कार्यक्रम संपल्यानंतर अनेकांनी महाराजांसोबत छायाचित्र काढले.

 या गर्दीत तोंडाला बांधून एक युवक महाराजांजवळ पोहोचला आणि त्याने महाराजांच्या खांद्यावर हात ठेवण्याचे नाटक करुन चाकूने पोटावर वार केले. सत्यपाल महाराजांनी लगेच स्वत:ला सावरुन हल्ला चुकविण्याचा प्रयत्न केला, यावेळी हल्लेखोर पळून जाण्याच्या तयारीत असताना उपस्थित नागरिकांनी त्याला पकडले.जखमी सत्यपाल महाराजांना लगेचच केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी सत्यपाल विश्वनाथ चिंचोळकर महाराज यांनी भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली  सत्यपाल महाराजांवर प्राणघातक हल्ला करणारा कुणाल किशोर जाधव हा नवी मुंबईतील खारघर येथील रहिवासी आहे. कुणालने महाराजांवर हल्ला का केला, याची पोलीस कसून चौकशी करत असून, यामागे नेमका कुणाचा हात आहे, याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. आरोपी किशोर जाधव याच्याविरुद्ध भादंवि ३२४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला जामिनावर सोडण्यात आले. हल्ला करताना तो दारू प्यायला होता. 

मी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारसरणीचा असून, संत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांच्या विचारांचा प्रचार प्रसार राज्यभर करतो. समाजातील अंधश्रद्धा दूर होण्याकरिता समाज प्रबोधन करतो. अंधश्रद्धेला विरोध करणाऱ्या नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली. शुक्रवारी माझ्यावरही हल्ला झाला, या हल्ल्याने आपण विचलीत झालो नसून, शेवटच्या श्वासापर्यंत आपण महाराष्ट्रात प्रबोधन करुन समाजात जनजागृती करणार. - सत्यपाल महाराज, सप्त खंजिरीवादक...


प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्यावर मुंबईत चाकू हल्ला झाल्याची पोस्ट सध्या वायरल होत आहे. जी घटणा काही वर्षांपूर्वी झाली आहे. आता अस काहीही झालेल नाही. सत्यपाल महाराज यांचे पुत्र डाॅ. धर्मपाल चिंचोळकर यांनी वायरल होत असलेल्या हल्ल्याचे खंडण केले आहे. ” बाबा ठणठणीत असून , ते प्रबोधन कार्यक्रमात व्यस्त आहेत.” असे त्यांनी सांगितले आहे. कृपया हल्ला झाल्याची पोस्ट कुणीही वायरल करू नये अशी विनंती अ.भा.अं.नि.स. महाराष्ट्र राज्य युवा संघटक पंकज वंजारे यांनी पोस्ट व्हायरल करणाऱ्यांना त्यांनी केली आहे.

मुंबई येते शुक्रवार ला प्रशीद्ध किर्तनकार तथा सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांच्या प्राणघातक हल्ला झाल्याची स्क्रिप्ट सद्ध्या सामाजिक माध्यमांवर झळकत होती. दरम्यान एवढा मोठा हल्ला होणं म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारसरणीवर हल्ला आहे अशी चिंता इथल्या पुरोगामी मंडळींना वाटतेय. काही वर्षांपूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांच्या विचारांचा प्रचार प्रसार राज्यभर करणाऱ्या आणि समाजातील अंधश्रद्धा दूर होण्याकरिता समाज प्रबोधन करणाऱ्या अर्थात अंधश्रद्धेला विरोध करणाऱ्या नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली होती, अशातच समाज प्रबोधन करणाऱ्या सत्यपाल महाराज यांच्यावर हल्ला झाल्याची स्क्रिप्ट समोर आल्याने सगळ्यां गुरुदेव भक्तांना व पुरोगामी विचारसरणी असणाऱ्यांना मोठा हादरा बसलाय त्यामुळं ही स्क्रिप्ट सामाजिक माध्यमांवर सगळीकडे पसरली होती मात्र असा कुठलाही हल्ला सत्यपाल महाराज यांच्यावर झाला नसल्याचे व सन 2017-18 च्या दरम्यान तसा हल्ला झाल्याचे सत्यपाल महाराज यांचे पुत्र डॉ. धर्मपाल चिंचोलकर यांनी भ्रमणध्वनी द्वारे कळविले आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1