Top Post Ad

विकास कामांवर करोडो रुपयांचा खर्च, मात्र सुरक्षिततेकडे दुर्लक्ष

 


ठाणे शहरात पथदिव्यांच्या खांबांना अनेक ठिकाणी झाकणे अस्तित्वात नाहीत परंतु या गोष्टींकडे दुर्लक्ष करत सुशोभीकरणाअंतर्गत झाकणे नसलेल्या खांबावर एलईडी लाईट माळांची रोषणाई करण्यात आलेली आहे. याबरोबरच काही ठिकाणी खांबावरील जंक्शन बॉक्सची तुटलेली झाकणे, विद्युत खांबाच्या आतील बाजूस लटकत असलेले एमसीबी, चुकीच्या पद्धतीने केलेली एलईडी माळांची जोडणी, खांबावर मोठ्या प्रमाणात असलेल्या विविध प्रकारच्या केबलचे वेटोळे याकडे महानगरपालिका विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.  स्मार्ट सिटी कडे वाटचाल करत सुशोभीकरण करत असताना ठाणेकरांच्या सुरक्षिततेची हमी कोण घेणार असा सवाल ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहूल पिंगळे यांनी केला आहे. 

आज विशेष मोहिम अंतर्गत राहुल पिंगळे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना याबाबत प्रत्यक्षात ही बाब निदर्शनास आणून दिली. यावेळी त्यांच्यासह काँग्रेस चे प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक, सुनील शिंदे, महिंद्र म्हात्रे, शिरीष घरत, माधुरी रांगळे, रवी कोळी, स्वप्नील कोळी, पप्पू मोमीन, श्रीकांत गाडीलकर, युवा अध्यक्ष लोकेश घोलप, प्रकाश मांडवकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

           तलावपाळी परिसरातील अत्यंत रहदारीच्या असलेल्या नौका विहार समोरील पदपथावर असलेल्या विद्युत खांबांना काही ठिकाणी झाकणेच नाहीत.तलाव पाळी येथील पदपथावर संध्याकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात नागरिकांची लहान मुलांसह वर्दळ असते त्यामुळे अशा खांबांच्या संपर्कात आल्यास शॉक लागून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही ही गंभीर बाब राहुल पिंगळे यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत झाकण नसलेल्या खांबांवर सुरक्षिततेच्या दृष्टीने फलक लावले . या गोष्टीची गांभीर्याने दखल घेत निष्काळजीपणा केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित ठेकेदारासह विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी अशी मागणीही राहुल पिंगळे यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com