बहुजनाला फक्त तक्रार करणे भिकाऱ्या सारखे मागत राहणे दुसऱ्या जातीला मातीत घालण्यासाठी प्रस्थापित बामणशाही पोसणाऱ्या दोन पैकी एक पक्षाला मदत करणे. एकमेकांना बदणाम करणे. कायम गुलामीत राहणे आणि धार्मिक वादविवाद चालु ठेवणे. एवढेच ध्येय आहे. बहुजन वर्ग पक्ष काढत नाहीत काढला तर त्याच्यावर एखाद्या विशिष्ट समुहाचे प्रतिनिधीत्व दर्शवत असल्याचा शिक्का मारून त्याला चौकटीत बंदीस्त करून ठेवल्या जाते. शिवाय ज्या समुहाचे प्रतिनिधीत्व करीत असेल त्यांच्यातही एकवाक्यता ठेवायची नाही त्यामध्येही गद्दार निर्माण करून आपली पोळी भाजायची ही खेळी आता नवीन राहिलेली नाही. परिणामी काही काळातच असा पक्ष लयाला जातो. आज देश पातळीवर नाव असणारा राष्ट्रवादी पक्ष राज्यापूरता सिमीत करण्यात आला. यावरून आपण बोध घेऊ शकतो.
मुस्लिंमाच्या विरोधात काही केले की हिंदु खुश होतो हिंदूच्या विरोधात काही केले कि, दलीत समाज खुष होतो दलितांच्या विरोधात बोलले कि दलितेत्तर खुश होतात हा खुशी नाराजीचा खेळ वारवांर बामण खेळत असतो बहुजन खेळाडू असतात आणि बामण अंपाएरी करत सगळ्यांना नाचवत राहतो.. 370 कलम रद्द केले म्हणून हिंदू खुष.. प्रत्यक्षात यात हिंदूचा कवडीचाही फायदा नाही. अॅट्रासीटी कडक केली म्हणून दलीत खुष यात दलीतांना कायम दलीतांचा शिक्का बसतो हे दलितांच्या लक्षात येत नाही. कारण दलित सवर्ण भांडण सतत राहील्यास फायदा बामणांचाच.. तीन तलाक हा निर्णय हा मुस्लिम विरोधी नाहीच कारण या कायद्यामुळे मुस्लिम महिला सुरक्षित झाल्या. पण हिंदु यामुळे उगीचच खुष होत आहेत. याचा हिंदूना 1 टक्काही फायदा नाही तरी हिंदु मात्र बेगाने शादी मे अब्दूल्ला दिवाना सारखा उड्या मारत आहे .हिंदु मुसलमान व दलीत सारे बामणांकडून अनादी काळापासून मुर्खात काढले जात आहेत आणि या मुर्खपणात तेही आनंद मानत आहेत.
अयोध्येत राममंदिराचे उद्घाटन झाले याचा आनंद फक्त हिंदु बहुजनांना झाला आहे. खरतर यात बामणेत्तरांचा कसलाही लाभ नाही. एक अपवाद (त्यालाही कोणता अधिकार नाही) सोडला तर या मंदीराच्या प्रमुख ट्रस्टीमध्ये सर्वच बामण. सर्व मंदीर यांच्याच ताब्यात आहे. केवळ झाडू मारायला आणि साफसफाई करायला मात्र बामणेत्तर. इतकेच काय तर भविष्यात या मंदिरातल्या रामाला साधा स्पर्शही करता येणार नाही. कारण उत्तर प्रदेशातील अनेक मंदिरातून शूद्र प्रवेश ना करे असे बोर्ड लागल्याचे सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. तरी हे बहुजन वरातीत नाचल्यासारखे नाचत आहे.अयोध्येत रामाचं मंदिर पैसा जमा करण्याची मोठी बॅन्क ठरणार आहे. नव्हे त्या दिशेनेच व्यवस्थापन सुरु आहे. फक्त आता त्याला चमत्काराचा मुलामा कसा द्यायचा यावर खलंबतं सुरु आहेत. कारण तिरुपती बालाजी काय किंवा शिर्डीचे साईबाबा काय इथे लोकांच्या आस्था पक्क्या झाल्यात. मध्ये एका स्वामींनी साईबाबांच्या बद्दल बरंच काही सांगून या भक्तांची झोप उडवली होती. तसाच काहीसा प्रकार पुढे आणखीन व्यवस्थित केला जाईल आणि जयश्रीरामचा नारा बुलंद करण्यासाठी योजना आखल्या जातील. यासाठी खुद्द प्रधानमंत्र्यांनी दक्षिणा टाकून लोकांना सुचनाच केली आहे कि, या रामभक्तांनो या बहुजनांनो या आणि येथे आता भरपूर दान करा. आता राम मंदीर हे दुसरे बालाजी होणार आणि तथाकथित परशुरामाचे वंशज श्रीमंत होणार. पंढऱपूरचे विठ्ठल मंदीर बडव्यांच्या हातातून गेल्यावर यांनी लगेच प्रति पंढरपूर विठ्ठल मंदीर निर्माण केले आणि आपले कर्मकांड सुरु ठेवले आहे. येणाऱ्या काळात मुळ मंदिराला बगल देऊन हा समाज त्या मंदिरात गेला तर आश्चर्य वाटायला नको. कारण बहुजन वर्गाचा मेंदू कालही गुलाम होता आणि आजही गुलामच आहे.
धार्मिक गुलामगिरीतून हा समाज बाहेर पडावा म्हणून तथागत बुद्ध, गुरु नानक, महात्मा बसवेश्वर, संत तुकाराम, संत कबीर, संत नामदेव, राजर्षि शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले , डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज यांच्यासह अनेक महापुरुष संत महात्म्यांनी आपले आयुष्य वेचले पण बहुजनांच्या डोक्यात कसलाच प्रकाश पडलेला नाही. त्यांची मानसिक गुलामगिरी काल ही होती आणि यापुढेही तशीच राहणार ती तशीच रहावी म्हणून ते स्वत:च धडपडत आहेत. म्हणूनच इथली सर्वच व्यवस्थेची सुत्रे बामणांच्या हातात आहेत. कोणतही क्षेत्र घ्या तिथे वर्ग आघाडीवरच असतो. भले बहुजनातील मंडळी त्या क्षेत्रात माहिर असतील पण बोलबाला मात्र बामणांचाच होतो. आज इथला प्रत्येक मोठा राजकीय पक्षाचा प्रमुख ब्राम्हणच राहीला आहे. बहुजन फक्त मतदार असतो आणि कायम राहीलं. आणि सत्तेच्या चाव्या बामणाकडे कायम सुपूर्द करून दे दान सुटे गिराण वृत्ती जपत राहिल. नव्हे आता ते त्याच्या अंगवळणीच पडलं आहे.
लोकशाहीच्या माध्यमातून बहुजन वर्गाच्या मतांची पद्धतशीरपणे फाटाफूट करून ही मंडळी निवडणूक जिंकत आली आहेत. आणि सत्तेच्या किल्ल्या आजही त्यांनी आपल्याच ताब्यात ठेवल्या आहेत. आपले लोकप्रतिनिधी भले निवडून जात असतील तरीही त्यांना कोणताही अधिकार नाही कारण त्यांच्यावर बसलेली प्रशासकीय व्यवस्था या लोकप्रतिनिधींना स्वत:चा मेंदू चालवूनच देत नाहीत. या लोकप्रतिनिधीच्या डोक्यात ही बामणशाही केवळ स्वहीत भरते आणि बहुजन वर्गातील लोकप्रतिनिधी देखील मग माझं, माझ्या कुटुंबाचं भलं होतय ना या विचाराने स्वहित साधण्यापलिकडे काहीही करत नाही. ज्या लोकसमूहांची मते आपल्याला मिळत नाहीत ती कोणत्याही परिस्थितीत एक गठ्ठा कोणाला मिळू नयेत यासाठी त्या त्या समाजातील उमेदवार उभा करायचा. त्यांना भांडवल पुरवायचे. यासाठी हा वर्ग कितीही खर्च करायला, कोणतीही तडजोड करायला तयार असतो. बहुजनातील एखाद्या पक्षाशी मित्रत्वाचे संबंध जोडणारे छोटे पक्ष या बाबतीत बामणीव्यवस्थेचे संकटमोचक ठरतात. असे पक्ष वाढत जाणाऱ्या बहुजन वर्गाच्या पक्षाच्या छावणीमध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी आणि EVM द्वारे मतविभाजन घडवुन आणण्यासाठी उपयुक्त ठरतात. यासाठी ही व्यवस्था अशा पक्षांना आपले Trojan Horse म्हणुन विरोधी आघाडीत घुसवत असतो.
याशिवाय लहान-सहान जातीगटाचे नेतृत्व करणारे कार्यकर्ते, प्रचंड महत्वाकांक्षी वाचावीर, फुटकळ नेते हे निवडणूक जिंकण्यासाठी हवा असलेला कच्चा माल म्हणून यांच्या उपयोगात येतात. जेथे मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने आहेत त्या मतदार संघात अपक्ष म्हणुन उभे राहणारे अनेक मुस्लिम उमेदवार, जेथे बौद्ध मतदार मोठ्या संख्येने आहेत त्या मतदार संघात अपक्ष म्हणुन उभे राहणारे बौद्ध उमेदवार हे या प्रस्थापित व्यवस्थेचे प्रायोजित असतात. त्यांना होणारा वित्तपुरवठा त्यांच्याकडून होतो हे आता लपून राहिलेले नाही. काही ठिकाणी मतदान ओळखपत्र व आधार कार्ड घेऊन या, प्रति माणशी 2-5 हजार घ्या, दुसऱ्या दिवशी मतदान न केल्याची खूण म्हणुन बोटाला शाई लागलेली नाही हे दाखवा व मतदान ओळखपत्र व आधार कार्ड घेऊन जा, हा मार्ग अमलात आणला जातो. मागील विधानसभा निवडणुकीत एका मतदार संघात अशा 20 हजार मुस्लिम मतदारांना प्रत्येकी 2000 देण्यात आले असल्याची चर्चा बरीच रंगली होती. अशा प्रकारे बाजारात अगदी माफक किमतीत उपलब्ध असलेला हा मते कुजविणारा कच्चा माल योग्य प्रकारे नष्ट किंवा निष्प्रभावी केल्याशिवाय इथल्या व्यवस्थेला अर्थात बामणीशक्तीला नेस्तनाबूत करता येणार नाही. हेच खरे अस्तिनितले साप आहेत. यांना वेळीच ओळखून त्यांना ठेचले तर येणारा काळ बहुजनांचा अर्थात भारतीयांचाच असेल यात शंका नाही.
0 टिप्पण्या