Top Post Ad

मी बारसूला जाणार... मला कोण अडवणार आहे?


   ६ मे रोजी मी आधी बारसूला जाणार त्यानंतर मी महाडच्या सभेला जाणार. मला कोण अडवणार आहे?  माझ्या नावाचं पत्र दाखवत आहेत. पण त्या पत्रात असं कुठे लिहिलं आहे का? की पोलिसी बळाचा वापर करा, आंदोलनकर्त्यांना ठेचा आणि रिफायनरी करा असं कुठे काही लिहिलं आहे का  ? शरद पवारांच्या अंमलाखाली गेलो असं मला रोज सांगितलं गेलं. आज उदय सामंत कशासाठी का गेले होते? बारसू बारसू रोज माझ्या नावाने करुन स्वतःचं बारसं करत असाल तर पालघरमध्ये पोलीस का घुसवले? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला. महाविकास आघाडीच्यावतीने मुंबईतील बीकेसीच्या मैदानावर आयोजित वज्रमूठ या जाहिर सभेत उध्दव ठाकरे यांनी विद्यमान सरकारवर निशाना साधला.  बारसू काय पाकिस्तानात की बांग्लादेशात नाही. हिमंत असेल तर मला अडवून दाखवा आणि तेथे जाऊन मला काय तेथील लोकांना सांगायचे आहे ते भेटून सांगणार असा निर्धारही त्यांनी यवेळी व्यक्त केला.

महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. ६३ वर्षे झाली, मराठी माणसाने आणि महाराष्ट्राने मुंबई ही आपली राजधानी मिळवली. ही आंदण म्हणून मिळालेली राजधानी नाही ही आपण सगळ्यांनी लढा देऊन मिळवलेली राजधानी आहे  १ मेच्या मध्यरात्री मी हुतात्मा चौकात गेलो होतो. आम्ही पोहचलो तोपर्यंत कुणीही तिथे पोहचलेला नव्हता. आज सकाळी गेले असतील मिंधे. क्रियाकर्म म्हणून करायचं म्हणून जायचं आणि मानवंदना देऊन यायचं. गेलेच असतील जाणार कुठे? मात्र मिंध्यांना मला एक सांगायचं आहे की या लोकांनी लढा दिला नसता तर गद्दारी करून का होईना तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाला नसता. तसंच गद्दारी करुन मिळालेल्या खुर्चीचा उपयोग फक्त बुड टिकायला करु नका, महाराष्ट्रावरचा अत्याचार सहन करू नका असं म्हणत एकनाथ शिंदेंना खडे बोल उद्धव ठाकरे यांनी सुनावले आहेत.

मोरारजी देसाई नावाचा एक नरराक्षस खुर्चीवर बसला होता. त्याने गोळीबाराचे आदेश दिले होते. तेव्हा अनेक लोक मृत्यूमुखी पडले होते. हे तुम्हाला सांगायला पाहिजे कारण मुंबई कशी मिळाली तुम्हाला समजलं पाहिजे. इमारतींमध्ये अश्रूधुरांचा मारा केला होता. अनेक महिलांचे, लोकांचे हाल झाले. आपला मराठी माणूस, मराठी रणरागिणी कुणीही शरण गेलं नाही. उलट पोलिसांना सांगितलं की आम्हाला गोळ्या घाला पण मुंबई आम्ही हातातून जाऊ देणार नाही. मला मिंध्यांना सांगायचं आहे की महिलांमध्ये जी जिद्द होती ती कणभर तरी तुमच्यामध्ये घ्या. महाराष्ट्रावरचा अत्याचार सहन करू नका.

विषय बरेच आहेत, कर्नाटकची निवडणूक रंगात आली आहे. आपले माननीय पंतप्रधान म्हणाले काँग्रेसने मला ९१ वेळा शिव्या दिल्या. मी त्यांना सांगू इच्छितो की शिव्या देण्याचं समर्थन मी करणार नाही. पण भोकं पडलेली तुमची टिनपाटं ही माझ्या विरोधात बोलत आहेत तेव्हा तुम्ही गप्प का? तुम्ही तुमच्या टिनपाटांना जी भोकं पडली आहेत त्यात बुचं घाला म्हणजे सगळं चांगलं होईल. जर तुम्ही गप्प बसलात तर आमचे लोक गप्प बसली. आम्हाला नुसती कानाला भोकं नाहीत. देवाने आम्हाला तोंडही दिलं आहे. तुम्ही गप्प बसला नाहीत तर आम्हीही बोलणार असंही उद्धव ठाकरेंनी ठणकावलं आहे.

कर्नाटकच्या निवडणूका जाहिर झालेल्या आहेत. या निवडणूकांच्या प्रचारासाठी सध्या पंतप्रधान कर्नाटकात जात आहेत. तेथील एका सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले काँग्रेसने मला १९ वेळा शिव्या दिल्या. शिव्या दिलेल्या मोजण्यासाठीही माणसे नेमलीत की काय असा खोचक सवाल करत उध्दव ठाकरे पुढे म्हणाले, तुमची जी टिनपाट माणसे इथे महाराष्ट्रात जी काही नेमली आहेत. ती जी काही भाषेत आमच्यावर आणि आमच्या घराण्यावर बोलत असतात त्या भाषेत आमचे शिवसैनिक अजूनही बोलत नाहीत. त्यामुळे त्यांना जी भोके आहेत त्यात बुच्च बसवा अशी खोचक टीका भाजपा नेत्यांवर करत मोदी यांना इशारा दिला.

आमचं सरकार असताना पर्यावरणाच्या अनुषंगाने आम्ही कांजूर मार्ग येथील जमिनीवर कारशेडचा निर्णय घेतला आणि आरेतील मेट्रोशेडला स्थगिती दिली. आता आमचं सरकार जाताच आरे येथील कारशेडच्या कामावरील स्थगिती उठविली आणि आता तेथेही कारशेड उभारणार आणि आम्ही प्रस्तावित केलेल्या कांजूर मार्ग येथील जमिनीवरही कारशेड उभारणार मग आता कुठे गेले केंद्र सरकार आणि बाकिचे याचिका कर्त्ये   बुलेट ट्रेन साठी मी जागा दिली नव्हती. कारण मुंबई आणि महाराष्ट्रातून कितीजण अहमदाबादला जाणार आहेत असा सवालही त्यांनी केला. त्यानंतर आमचं सरकार जाताच बुलेट ट्रेनच्या स्थानकासाठी डोळे झाकून जागा दिली. त्याच जागेवर आपण कोरोना काळात हॉस्पीटल उघडून अनेक मुंबईकरांवर उपचार केले याची आठवण करून दिली. आता काय हे ही मी सांगितले होते म्हणून ही जागा दिली का असा सवालही ठाकरे यांनी शिंदे गटाला उपस्थित केला.

 काही महिन्यांपूर्वी भाजपाचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यावर आलेले असताना आपणास जमिन दाखविणार असल्याचा जाहिर इशारा दिला होता. त्यानंतर शिवसेनेत फुट पडली आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्याच वक्तव्याचा धागा पकडत आज उध्दव ठाकरे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना इशारा दिला, अमित शाह तुम्ही जे म्हणाला होतात ना की जमिन दाखविल्याशिवाय राहणार नाही, मी आज येथे तुम्हाला जाहिरपणे सांगतोय की होय तुम्हाला जमिन काय असते हे दाखविल्याशिवाय हा महाराष्ट्र शांत राहणार नाही असा इशारा दिला. त्यामुळे आगामी काळात भाजपा आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील संघर्ष आणखी चिघळणार असल्याचा संकेत दिले.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com