Top Post Ad

फुले दांपत्याचा पुतळा स्थलांतरीत करावा - डॉ.स्मिता मेहेत्रे


      फुले दांपत्याचा पुतळा स्थलांतरीत करावा असे निवेदन सावित्री ब्रिगेडच्या अध्यक्ष डॉ.स्मिता मेहेत्रे व इतर पदाधिकारी यांनी मनपा आयुक्त मा.राधाकृष्णन बी. यांना दिले.

         महात्मा फुलेंचा,सावित्रीआई फुलेंचा पुतळा नागपूरातील कॉटन मार्केट येथील भाजी बाजारात (मंडीत) उभारला आहे. जेथे जयंती, स्मृतीदिन हे दोन दिवस माणसे व इतर दिवस सडलेला भाजीपाला खाण्यासाठी जनावरे जमा होतात. हा फुले दांम्पत्यांचा फार मोठा अपमान असून मानवतावादी, समतावादी महापुरूषाची विटंबना आहे. फुले दांम्प्त्याचा पुतळा कॉटन मार्केटच्या भाजी मंडीतून दुसऱया जागी स्थलांतरीत करावा, आणि पुतळया सभोवतालचा परीसर सुशाभित करावा.असेही निवेदन देतांना डॉ.स्मिता निशिकांत  मेहेत्रे म्हणाल्या. 

          मा.जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांना महात्मा फुलेंच्या जयंतीची 11एप्रिल ही तारीख जिल्हाधिकारी यांनी शासकीय सुट्टी म्हणून जाहीर करावी असे निवेदन डॉ.स्मिता मेहेत्रे यांनी दिले. तसेच शासनाने शासकीय आदेश काढण्याबाबतची कार्यवाही करावी, तरच  स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मुल्ये रूजविण्यासाठी संपूर्ण आयुष्य समाजाला समर्पित करणाऱया महात्मा फुले या महामानवाला खरे अभिवादन ठरेल! असे प्रतिपादन डॉ. स्मिता मेहेत्रे यांनी केले. याप्रसंगी सावित्री ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

दोन हजार वर्षापासून (इ.स.पू.185 मनुस्मृती ते 1848) बंदी घातलेल्या शिक्षणाला महात्मा फुलेंनी 1 जानेवारी 1848 रोजी भारतातील पहिली शाळा सुरू करून आपल्यासाठी सार्वजनिक केले.सावित्रीआई फुलेंनी मुक्या माणसाला बोलणे शिकविले. अधिकाराची जाणीव करून दिली. त्यामुळे आज रिक्षा पासून अंतरिक्षा पर्यंत मजल गाठणारे आपण सर्व लेक व लेकी महात्मा फुले, सावित्रीआई फुलेंचे ऋणी आहात. 

देशातील सर्व सार्वजनिक क्षेत्रात मग ते शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, शासन, प्रशासन, न्यायमंदिर असो इत्यादीच्या आवारात प्रतीक म्हणून महात्मा फुलेंचा पुतळा ठेवणे गरजेचे आहे. असे डॉ.स्मिता मेहेत्रे म्हणाल्या. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com