Top Post Ad

हा तर सत्ताधाऱ्यांनी रचलेला सामाजिक सलोखा बिघडवण्याचा डाव

 


ज्याची या देशावर सत्ता आहे तेच आज जन आक्रोश रॅलीच्या माध्यमातून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा डाव खेळत आहेत. यामुळे  समाजाची सामाजिक बांधीलकी नष्ट होऊ  शकते, अशी भीती समाजवादी पक्षाचे अबु आझमी यांनी व्यक्त केली.  जन आक्रोश रैलीला पर्याय म्हणून सद्भावना रैलीचे आयोजन करण्यात येणार आहे याबाबत माहिती देण्यासाठी आज मुंबईतील मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी एस.आय.ओ.महाराष्ट्र संघटनेचे प्रमुख इसम हमी खान सामाजिक कार्यकर्ते विश्र्वास उटगी, डॉ.सलीम खान, अॅड राठोड, आदी मान्यवर उपस्थित होते गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्र राज्यभर 'हिंदू जन आक्रोश मोर्चा' या नावाने मोर्चाची मालिका आयोजित करण्यात आली आहे. या रेलींनी 'लव्ह जिहाद' 'लैंड जिहाद', 'जबरदस्तीचे धर्मांतर' इत्यादी मुद्द्यांवर अबु आझमी यांनी चिंता व्यक्त केली.  मुस्लिम समाजावर आर्थिक बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच या रॅलीमध्ये मुस्लिम समाजाला लक्ष्य करून द्वेषपूर्ण भाषणे देण्यात आली आहेत. मात्र मुस्लिम समाज नपुंसक झाल्याप्रमाणे शांत पहात आहे, याबद्दल आझमी यांनी चिंता व्यक्त केली. 

या रॅलीमागे एक हेतू असला तरी त्यांचा समाजावर होणारा परिणाम कमी करता येणार नाही. अशा प्रकारच्या रॅली या जातीय हिंसाचार भडकवण्याचे प्रमुख कारण असल्याचे नोंदवले गेले आहे. हे कृत्य घटनात्मक मूल्ये आणि आपल्या समाजाचे प्रतीक असलेल्या बंधुत्वाच्या भावनेच्या विरोधातही जातात. तसेच लव्ह जिहाद'चा मुद्दा जी उजव्या विचारसरणीच्या गटांकडून सातत्याने उपस्थित केला जात आहे. तो मुस्लिमाविरुद्ध द्वेष भडकवण्याचा डाव आहे. सर्वोच्च न्यायालय आणि अनेक उच्च न्यायालयांनी अनेक प्रसंगी निरीक्षण नोंदविले आहे की लव्ह जिहाद ही कल्पनाशक्ती आहे आणि 'लव्ह जिहादच्या दाव्यांचे समर्थन करणारा कोणताही पुरावा नाही. मात्र तरीही या गटांकडून त्यांचा अजेंडा पुढे नेण्यासाठी आणि समाजात फूट निर्माण करण्यासाठी त्याचा वापर केला जात असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते विश्र्वास उटगी यांनी व्यक्त केले.

"आम्ही मानतो की द्वेष आणि फुटीरतेच्या अशा आक्रमणासमोर आपले मौन केवळ अनैतिक नाही तर अपवित्र देखील आहे. या फुटौर मोहिमेद्वारे एका समाजाला आवाहन केले जात आहे. जे किंबहुना सर्व धार्मिक आदर्शाच्या विरोधात आहे. धर्माची खूप रचनात्मक भूमिका असते. आपला समाजात एकता निर्माण करण्यासाठी आणि सौहार्द वाढवण्यासाठी विधायक संवाद आणि चर्चा होणे गरजेचे आहे. द्वेषयुक्त भाषण आणि हिंसाचार याला पर्याय असू शकत नाही." असे मत एस. आय.ओ.चे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष मा. एहतेसाम हामी खान यांनी सांगितले.

फुटीरता आणि द्वेषाच्या या मोहिमेला तोंड देण्यासाठी एस.आय.ओ. दक्षिण महाराष्ट्र झोन तर्फे एक विचार मंथन करण्यासाठी "जन आक्रोश नाही जन सद्भाव" या शीर्षकाद्वारे विविध समुदायामधील दरी भरुन काढणे आणि विविध समाजात विश्वासाचे आणि सामंजस्याचे वातावरण निर्माण करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. प्रेम आणि एकतेच्या या संदेशाला प्रोत्साहन देण्यासाठी एस. आई. वो विविध जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषदा, इफ्तार पार्टी आणि इतर उपक्रमांची मालिका आयोजित करेल. अशी माहिती एहतेसाम हामी खान यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com