Top Post Ad

धर्माधिकारी... श्री सदस्य... वास्तव

         मृत नाना धर्माधिकारी (स्व किंवा कैलासवासी म्हटलेले नाही)यांनी आपल्या घरी बैठक सुरू केली,त्यांनी दासबोध ग्रंथाचा वापर करून निरूपण करावयास सुरुवात केली,त्याच बरोबर भविष्य ,कुंडल्या बघणे आणि लग्न जुळत नाहीत,पैसे टिकत नाहीत,घरातील कौटुंबिक अडचणी या वर शांती व विधी सुरू झाले,भोळी भाबडी जनता गुरफटत गेली,

             मग गावोगावी बैठकांचे सत्र सुरू झाले,जो गावातील श्रीमंत माणूस त्यालाच बैठकीचे सर्वाधिकार देऊन त्याचाच घरी बैठक होत असते,कोणा गरीबाच्या घरी कधीच बैठक होत नाही, बैठकीत मी खोट बोलणार नाही ,दारू पिणार नाही ,वगैरे सुविचारांचे पारायण केले जाते.बैठकीला आलेच पाहिजे असा दंडक आहे,ओळीने तीन बैठकांना अनुपस्थित राहिल्यास त्या श्री सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले जाते,बैठक दुपारी संध्याकाळी रात्री केव्हाही असते,बैठकीत बसून बसून कित्येक लोक झोपतात,ज्याची पारायण कर्ता म्हणून नेमणूक केलेली असते तो बडबडत असतो,झोपले तरी चालते,पण बैठकीला यायलाच पाहिजे,

       हे श्री सदस्य कपाळाच्या मध्यभागी कुंकू लावतात आधी चिकट पदार्थ लावून वर कुंकू लावतात,म्हणून यांना डबल टिकली म्हणून संबोधले जाते.हे कुंकू आप्पांच्या कडूनच घ्यावे लागते,त्याचे लाखो रुपये महिन्याला मिळतात,दुसरे कुठले कुंकू चालत नाही,प्रत्येक श्री सदस्यांनी कुंकू लावलेच पाहिजे,तो श्री सदस्य आहे याची ही ओळख आहे. कित्येक लोक बैठकीला जातात व घरी येतांना मस्तपैकी पिऊन येतात, बैठकीला नवरा जातोय व दारू पितो म्हणून बायको इज्जत जायला नको म्हणून गप्प बसते. 

           प्रत्येकाच्या घरी नाना धर्माधिकारी, त्यांच्या पत्नी व आपासाहेब धर्माधिकारी यांचे फोटोची फ्रेम लावलेली असते,त्यांना मोठी स्वारी,छोटी स्वारी अस म्हटलं जातं,दररोज फक्त त्यांचीच पूजा केली जाते.बैठकीला जाऊन दारू सुटेल हा भ्रम असून खोटी आकडेवारी प्रसिद्ध केली जाते.त्या मुळे भक्त मंडळी वाढत जाते,घरातील लोक दारू सोडण्यासाठी जबरदस्तीने बैठकीला पाठवतात.व स्वतः ही जातात,शाळेतील लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत ही सर्व माणसे बैठकीला हजेरी लावतात.त्या मुळे सदस्यांची संख्या वाढत जाते

          यात जास्त करून राजकारणी लोकांचा हात आहे,ते पण डबल टिकली लावून बैठकीला जातात,किंवा बैठका आपल्या घरी बोलावतात, त्या मुळे त्यांनी कांहीही केले,भ्रष्टाचार केला,काळे धंदे केले तरी कोणीही बोलत नाही,व एकगठ्ठा मते मिळतात,आज नाशिक ,पुणे,कोल्हापूर कित्येक ठिकाणी ज्या डॉक्टरांचे व वकिलांचे धंदे चालत नाहीत ते सर्व धंदे सोडून आठवड्यांतून एक दिवस बैठकीला जातात.डबल टिकली लावतात त्या मुळे त्यांच्या धंद्याना बरखत आलेली असून ते आता चिंतामुक्त आहेत,सगळी फिक्स गिऱ्हाईक मिळालीत ,

           लग्न जमवायचं असेल तर भक्त पूर्वी नानांकडे आता आप्पासाहेबांकडे जातात,आप्पा विचारतात आपल्यापैकी आहे का?म्हणजे डबल टिकलीवाला असल्यास हो म्हणायचे नसेल तर नकार द्यावयास सांगायचं.जमीन,वाडी, वावर विकायचा असेल तर आप्पांकडे जाऊन विचारतात,मग ती सर्व जमीन किंवा नारळसुपारीची बाग ते स्वतःच विकत घेतात, ते पण बक्षीस पत्र तयार केले जाते,त्या मुळे आज त्यांच्याकडे सुमारे 1650 एकर जमीन आहे आणि ती पण सर्व भक्तांनी आप्पा ना बक्षीस दिली.त्या मुळे आर्थिक व्यवहारात चतुराई दाखवून पैसे कुठुन आणले हे दाखवायला नको,हे देवभक्त ,समर्थभक्त!!!

       यांचा बागमला येथे पेट्रोलपम्प आहे,तेथे CNG पंप आहे.अलिबागला CNG पम्प नाही,त्या मुळे या पँपावर खूप गर्दी असते,बाहेर रस्त्यावर कार्स ची लाईन लागलेली असते,त्या मुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो,त्या मुळे खाजगी बस व एस टी बस यांचा अपघात होऊन ड्रायव्हरला पाय गमवावे लागले होते. असे खूप  अपघात होतात पण कोणीही कांही बोलू शकत नाही, पोलीस सुद्धा गप्प बसतात.राजकीय दबाव प्रचंड असल्याने शांत बसल्याशिवाय पर्याय नसतो.त्यांना रेवदांड्याला भेटायला येणारी मंडळी येथेच गॅस पेट्रोल भरते.महत्वाचे म्हणजे अलिबाग रायगड जिल्ह्याची राजधानी असून गेल्या पाच वर्षांपासून CNG पँपाची मागणी करून सुद्धा त्यांना राजकीय दबाव व धर्माधिकारी स्वारीचे राजकीय वरिष्ठांशी असलेले साटेलोटे या मुळे तेथे सीएनजी पम्प करावयास परवानगी दिली जात नाही.स्थानिक लोक तडफडत असून सुद्धा यांच्यापुढे कोणीही बोलू शकत नाही.

         आज रेवदंडा- चौल परिसरात त्यांचे आलिशान कित्येक बंगले आहेत।.प्रचंड बक्षिस स्वरूपात घेतलेली शेती आहे.अफाट करोडो रुपयांची संपत्ती आहे, त्यांच्या शेतात वाडीत भक्त मंडळी लावणी कापणी मळणीची मोफत कामे करत असतात.श्रीमंत भक्त मोठ्मोठया भेटी देत असतात. दर शनिवारी पिरांचे देऊळ सागमला  येथे श्रीमंत श्री सदस्यांची संध्याकाळी बैठक असते मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, सारख्या आलिशान गाड्यामधून रिच लोक येतात,तेथे धंद्याच्या गोष्टी होतात,

          नानांना,  आप्पाना महाराष्ट्र्र भूषण पुरस्कार ,डॉक्टरेट मिळलेली आहे,सर्व पक्षाचे नेते त्यांना भेटायला येतात,कोणाला मतदान करायचे ते ते सांगतात,आज एकनाथ शिंदे डबल टिकली लावून ठाणे येथील पंचवीस हजार एकगठ्ठा  मते मिळवतात.त्यांचा पराभव होणे त्या मुळे दुरापास्तच आहे.         धर्माधिकारी परिवारातील छोटी स्वारी सचिन धर्माधिकारी हे पिऊन टाईट असतात आणि आम्ही दारू सोडवतो असा खोटा दावा करतात.या पुढे ते हे सांभाळतील म्हणून आप्पानी खारघर येथे नुकतेच सांगितलं होतं           यातील पंचवीस टक्के माहीती सांगण्यात येत आहे,पाण्यावर तरंगणाऱ्या बर्फाप्रमाणे यांची कळलेली माहिती विशद केली बाकी तीन चथुर्थांश अजून दडलेली आहे,

          नानांच्या स्मारकासाठी 50  एकर गायचरणाची जमीन खासदार सुनील तटकरे यांनी मिळवून दिली होती,शरद पवार यांनी नारळ फोडला होता पण स्थानिक गावकऱ्यांनी विरोध केल्याने ते स्मारक बोंबलले.        नाना म्हातारपणी वेडेपिसे झाले होते त्यांना लांब फार्महाऊस  वर ठेवले होते,आणि कोणी भेटायला गेले की सांगायचे नाना तपश्चर्या करीत आहेत,          त्यांच्या मृत्यूनंतर दहन केले त्याची राख सर्व सदस्यांनी पुड्या बांधून घरोघरी नेली,ती संपली म्हणून स्मशान भूमीतली दुसऱ्या प्रेतांची राख सुद्धा लगेच संपली.

असे आहे धर्माधिकारी कथानक !!!!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com