Top Post Ad

केईम हॉस्पिटलसमोर टॅक्सीवाल्याची मनमानी....



 केईम हॉस्पिटल समोर टॅक्सी वाल्याचा पेशंटला घेण्यास नकार
भोईवाडा पोलिस आणि वाहतूक पोलिसांनीही तक्रार घेतली नाही

मुंबई/ परळच्या केईएम् रुग्णालयात रोज 5 हजाराहून अधिक रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात पण उपचार घेऊन घरी जाण्यासाठी किंवा दुसऱ्या रुग्णालयात जाण्यासाठी जेंव्हा त्यांना टॅक्सीची गरज असते तेंव्हा केम हॉस्पिटल समोर जे टॅक्सी वाले उभे असतात ते भडे नाकारतात केवळ लांबचे भाडे असेल तरच घेतात त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होते

    रविवार दिनांक 22 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता सुजाता जाधव ही गुडघे आणि कंबर दुखीच्या त्रासावर उपचार घेण्यासाठी पतीसह के ई एम मध्ये आली होती तिथे उपचार घेऊन ती टिबी हॉस्पिटल येथील आपल्या घरी जाण्यासाठी निघाली होती पण जवळचे भाडे असल्याने टॅक्सी वाल्याने त्यांना नेण्यास नकार दिला भाडे नाकारणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि हॉस्पिटल जवळ भाडे नाकारणे हा तर त्याहीपेक्षा मोठा गुन्हा आहे .

दरम्यान सुजाता जाधव यांचे पती बापू जाधव यांनी सदर घटनेची फिर्याद नोंदवण्यासाठी भोईवाडा पोलिस ठाणे गाठले पण तिथे ड्युटीवर असलेले ठाणे अंमलदार आव्हाड यांनी त्यांची फिर्याद नोंदवून घेण्यास नकार दिला आणि हा विषय आमच्या अखत्यारीत येत नाही तुम्ही वाहतूक पोलिसांकडे जावा असे सांगितले त्यानंतर जाधव हे भारतमाता सिनेमा जवळ असलेल्या वाहतूक चौकीत गेले पण तिथेही त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही.हा सर्व प्रकार संतापजनक आहे 

हॉस्पिटल जवळ रुग्णाचे भाडे नाकारणाऱ्या टॅक्सी वाल्या विरूद्ध पोलिस तक्रार घेणार नसतील तर मग त्यांनी जायचे कुठे ? म्हणूनच या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेऊन कोणत्याही हॉस्पिटल समोर रुग्णांना टॅक्सीतून नेण्यास नकार देणाऱ्या टॅक्सी वाल्यांवर केवळ भाडे नाकरल्याबद्दल दंडात्मक कारवाई न करता त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा तसेच जाधव यांची तक्रार घेण्यास नकार देणाऱ्या भोईवाडा पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकारी आणि वाहतूक पोलिसांवर कारवाई व्हायला हवी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com