Top Post Ad

प्रत्येकाला स्वत:चा ग्राहक वर्ग मिळवून देण्याचे काम टिंगटाँग अॅप द्वारे होणार

 मराठी माणसाने सर्वच क्षेत्रात उभं राहणे काळाची गरज - खा.अरविंद सावंत


आज मला आनंद होत आहे की, एक मराठी मुलगा ज्यानं डिजीटल प्लॅटफॉर्मवर एक नवीन व्यावसायिक अॅप तयार केलं. ज्यामधून अनेक मराठी मुलांना रोजगार मिळू शकतो. कारण आज नोकऱ्यांची स्थिती काय आहे ? कारखाने कसे बंद होत आहेत. याबाबत आता नव्याने सांगणे नाही. म्हणून स्वत:च्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे. मात्र स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी देखील कुठेतरी मार्ग हवा असतो. आपल्या व्यवसायाला ग्राहक वर्ग हवा असतो. आज प्रत्येकाकडे असणाऱ्या कौशल्याचं मार्केटींग कसं करायचा हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. आणि याच प्रश्नाचं उत्तर उदय पवार यांनी दिलं आहे. तुमच्या कौशल्याचं मार्केटींग टिंगटाँग करेल.  प्रत्येकाला स्वत:चा ग्राहक वर्ग मिळवून देण्याचे काम टिंगटाँग अॅप द्वारे होणार आहे. ज्याप्रमाणे कुठल्याही आजारावर एकच रामबाण उपाय त्याचप्रमाणे कुठल्याही कामाचा एकच मार्ग टिंगटाँग अप्लिकेशन असे गौरवोद्गार खासदार अरविंद सावंत यांनी काढले. 

आज  "टिंग-टाँग ऑनलाइन" च्या नव्या ॲपचं लोकार्पण करण्यासाठी शिवसेना नेते मा. खासदार अरविंद सावंत,  कामगार सेनेचे अजित साळवी, सिने-नाट्य कलाकार, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते


प्रत्येक समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न या अॅपद्वारे करण्यात येईल असा विश्वास आज उदय पवार या नवउद्योजकांने दिला आहे. नोकऱ्या सुरक्षित करण्याचे काम करता करता कामगार सेना मराठी माणसांशी जोडली गेली.  मराठी माणसाच्या घरी समृद्धी आली पाहिजे. त्यांचा उत्कर्ष व्हायला पाहिजे. त्याचा शैक्षणिक व आर्थिक उत्कर्ष सुद्धा व्हायला पाहिजे. याच भावनेतून आज एक मराठी युवक व्यापाऱी क्षेत्रात उभा राहात आहे. त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्याचे मनोधैर्य वाढवावे या भावनेनेच आज मी या ठिकाणी आलो असल्याचेही सावंत म्हणाले,  ज्याच्याकडे आपलं स्वत:चं कौशल्य असेल त्यांनी त्यांनी या टिंगटाँग अॅपवर जाऊन आपली नोंदणी करावी, त्यांना शंभरटक्के रोजगार दिल्याशिवाय टिंगटाँग राहणार नाही असे आश्वासन आणि टिंगटाँगचे सर्वेसर्वा उदय पवार यांना त्यांच्या कार्यात उज्वल यश प्राप्त होवो अशा शुभेच्छा खासदार सावंत यांनी दिल्या. 

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना उदय पवार म्हणाले, माझं स्वप्न होतं की जो मध्यमवर्ग आहे जो छोटा मोठा व्यवसाय करतो. त्याला एक डिजीटल प्लॅटफॉर्म मिळावा. या छोट्या उद्योगसमुहाला एक मोठा ग्राहकवर्ग मिळावा यासाठीच्या विचारातून या टिंगटाँग अॅपची निर्मिती झाली.  डिजीटल मार्केटींग मध्ये अशा प्रकारच्या अनेक अॅप उपलब्ध आहेत. मात्र त्या संपूर्णपणे व्यवसायिक स्वरुपाच्या आहेत. आपण आपल्या या अॅपच्या माध्यमातून सामाजिक अभिसरण देखील जपणार आहोत. प्रत्येकाला त्याच्या कौशल्यावर आधारीत ग्राहक वर्ग मिळायलाच हवा असा कटाक्ष आपल्या अॅपचा असेल. त्यासाठी व्यावयासिकांकडून आम्ही दिवसाला केवळ एक रुपया इतकंच शुल्क आकारणार आहोत. यामुळे हा अॅप व्यावसायिकतेपासून खूप दूर असल्याचे आपल्या लक्षात येईल. भविष्यात फ्रॅन्चाईजच्या माध्यमातून या अॅपचं जाळ अधिक विस्तारित करण्याचा देखील प्रयत्न करण्यात येणार आहे. जेणेकरून अधिकाधिक लोकांना याचा फायदा होईल. या कार्यक्रमाला आणि माझ्या प्रत्येक कार्यात माझ्या पाठिशी सदैव उभे असणारे खासदार अरविंद सामंत वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी राहिन असे उदय पवार म्हणाले.

"टिंग-टाँग ऑनलाइन" ॲप हे बोटाच्या स्पर्शावर हजारो सेवा आणि सेवादाते यांचे पर्याय वापरकर्त्यांना उपलब्ध करून देते. तेही अगदी विनामूल्य. उदा. घरकामगार, प्लंबर, वायरमन, संगणक पुरवणारे तसेच दुरुस्त करणारे, वॉटरप्रूफिंग करणारे, विविध अभ्यासक्रम शिकवणारे असे हजारो पर्याय केवळ चुटकीसरशी उपलब्ध करून देणारं एकच ॲप आहे ज्याचं नाव आहे "टिंग-टाँग ऑनलाइन". https://play.google.com/store/apps/details?id=com.tingtongonline 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com