काही स्त्रियांकडुन होणारा कायद्याचा गैरवापर तसेच भा.दं.वि कलम-498 ए, डोमेस्टिक व्हायलन्स अँक्ट, कलम-125 CRPC तसेच अन्य वैवाहिक कायद्यांचा होणारा दुरूपयोग आणि पुरुषांकडून देखील महिलांचा होणारा छळ ठाम्बविण्यासाठी,विवाहसंस्था अर्थात कुटुंब संस्था वाचविणे आणि विवाहव्यवस्था टिकवणे,पुरुषांच्या वाढत्या आत्महत्या ठाम्बविणे तसेच कुटुंबातील वयोवृद्ध व लहान मुलांची फरफट ठाम्बवण्यासाठी राष्ट्रीय परीवार आयोग आणि परीवार कल्याण आयोग त्वरित स्थापन व्हावा याकरिता फॅमिली वेलफेअर रिसर्च अँड ट्रेनिंग सोसायटीचे संस्थापक - सचिव ऍड. संतोष शिंदे यांनी राष्ट्रीय अध्यक्षा सौ.प्रतिभा शिंदे, उपाध्यक्ष तेजस नाईक, खजिनदार - जयेश अहिरे तसेच पवन अंभोरे, सौ.ज्योती अहिरे,सौ.सविता शिंदे या सदस्यांच्या सहभागाने अखंड भारतभर कार्यरत अशी फॅमिली वेलफेअर रिसर्च अँड ट्रेनिंग सोसायटी या सामाजिक संस्थेची नुकतीच समता दिनी म्हणजे 5 एप्रिल रोजी स्थापना केली आहे.
राष्ट्रीय समता दीन अर्थात भारताचे प्रथम दलीत उप पंतप्रधानमंत्री जगजीवन राम यांच्या जयंती दिनी फॅमिली वेलफेअर रिसर्च अँड ट्रेनिंग सोसायटीची अखिल भारतीय स्तरावर कार्यरत सामाजिक संस्थेची स्थापना केली आहे.संस्थेचा उद्देशच मुळात सर्व जाती धर्माच्या स्त्री - पुरुषांना आणि घटकांना समान न्याय या संविधानात्मक तत्वावर आधारित आहे.जेणे करून भारतीय परीवार संस्था,कुटुंब संस्था आणि विवाह व्यवस्था धोक्यात आलेली असून कौटुंबिक दहशतवाद दिवसेंदिवस जास्त प्रमाणात फोफावत आहे. त्यावर अंकुश ठेवणे आणि विवाहसंस्था वाचविण्यासाठी फॅमिली वेलफेअर रिसर्च अँड ट्रेनिंग सोसायटी सदैव कार्यरत राहून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे.
समाजातील प्रत्येक घटकाला कायदेशीर मार्गदर्शन आणि सल्ला सहाय्य पुरवणे,तसेच लहान मुलांच्या समस्या, युवा (शिक्षण,उद्योग -व्यवसाय, व्यसनमुक्ती ई.साठी ) मार्गदर्शन,व्यसनांचे उच्चाटन,शिक्षण,आरोग्य,शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न,साक्षरता प्रसार,पर्यावरणाचे महत्व,अंधश्रद्धा निर्मूलन, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न आदी समस्या युद्ध पातळीवर सोडवीण्यासाठी सोसायटीचे कार्य अविरत पणे सुरूच राहणार असून अन्य महत्वाचे उद्देश्य देखील भविष्यात सोसायटीचे आहेत. त्याकरिता लवकरच या सामाजिक संस्थेचे कार्यालय हडपसर येथे सुरू होत असून मोठ्या दिमाखात उद्घाटन सोहळा लवकरच संपन्न होणार आहे.
तरी सर्वांनी या सामाजिक कार्यात तन,मन,धनाने सहभाग घेवून होणारा कायद्याचा गैरवापर थांबवून फोफावणारा कौटुंबिक दहशतवाद समूळ उखडून टाकण्यासाठी फॅमिली वेलफेअर रिसर्च अँड ट्रेनिंग सोसायटी या आपल्या सामाजिक संस्थेचे आधारस्तंभ,मार्गदर्शक तसेच सदस्य व्हावे याकरिता तसेच कोणाच्या कोणत्याही कौटुंबिक तसेच अन्य कसल्याही समस्या असतील अश्यानी सोसायटी कडे संपर्क साधण्याचे आवाहन संस्थापक - सचिव ऍड. संतोष शिंदे यांनी केले आहे.
अँड संतोष शिंदे- मोबा नं- 7507004606
0 टिप्पण्या