Top Post Ad

हा दुजाभाव व जातीयभेद नाही का .... गरीबाचे सरकार आपले सरकार

 


*गरीबाचे सरकार आपले सरकार महाराष्ट्र विकासाचे सरकार म्हणनारे मुख्यमंत्री मा एकनाथजी उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस मागासवर्गिय विद्यार्थी यांना कधी भेट देणार हा दुजाभाव जातीभेद नाही का ?**राष्ट्रवादीचे नेते समाजभूषण उत्तमराव गायकवाड **

बार्टीने पाञ ठरविलेल्या ८६१ मागासवर्गिय विद्यार्थ्यांना २०२१पासून  संशोधन करण्यासाठी फेलोशिप मिळावी म्हणून ४७ दिवसापासून आझाद मैदान येथे आंदोलनास बसले आहेत ईतर घटका प्रमाणे आम्हा पाञ विद्यार्थ्यांना सरसकट मिळावी म्हणून धरणे आंदोलन करित आहेत राज्यातील विविध महाविद्यालयातील आर्थिकदृष्ट्या गरीब घरातील मोलमजदूरी उसतोड विटभट्टी शेती ईत्यादीवर कामकरणार्याची ही मुले आहेत यांची राहण्याची सोय नाही खाण्याची सोय नाही ५ च्या नंतर फूटपाथवर झोपावे लागते तेथेही पोलीस उठवितात काही विद्यार्थी rpi नेते भागवत कांबळे यांच्या आँफिस मध्ये रहातात तर काही मुले मुली पुज्य भदंन्त गौतम महाथेरो यांच्या  धम्मभूमी विहार कल्याण येथे राहात तर काही फूतपाठ तर काही दादर येथील आंबेडकर भवन येथे रहातात एवढी दैन्य अवस्था या पि एच डी साठी संशोधन करणाऱ्या विद्यार्थी यांची अवस्था आहे 

गरिबाचे सरकार आपले सरकार शेतकरी कष्टकरी कामगाराचे सरकार म्हणारे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंञी यांना भेटायला वेळ नाही कित्येक वेळा प्रयत्न केला हा दुजाभाव व जातीयभेद नाही असा प्रश्न समाजभूषण व जेष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस नेते  उत्तमराव गायकवाड यांनी गरीबाचे सरकार चालविणारे यांना विचारला आहे 

आर्थिक संकल्पिय अधिवेशनात अनेक आंदोलनकर्ते यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंञी भेटतात याच विद्यार्थ्यांच्या रास्त मागणी साठी हे का भेटू शकत नाहीत हा सरळसरळ जातीयावाद आहे एवढेच नाही तर मातंग आणि मांग गारुडी समाजाच्याशिष्ठमंडळासही ते भेटू शकले नाहीत काल सारथीच्या विद्यार्थ्यांना आंदोलन न करिता उपमुख्यमुंञी भेटू शकतात तर ४७ दिवसापासून आझाद मैदानावर धरणे आंदोलनास बसलेल्या मागासवर्गिय विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी वेळ नाही असेही समाजभूषण उत्तमराव गायकवाड यांनी म्हटले आहे

२०२१ मध्ये मागासवर्गिय विद्यार्थी यांच्या मुलाखती चाचण्या घेऊन पी एच डी उच्च शिक्षणासाठी ८६१ विद्यार्थी यांची निवड केली परंतु २०० विद्यार्थी यांनाच फेलोशिप देण्यात येईल असे सामाजिक न्याय सचिव सुमंत भांगे यांनी सांगून टाकले बाकी ६६१ विद्यार्थी यांना शासकीय फंड नाही म्हणून देता येत नाहीचे कारण सांगितले मग बार्टी सारख्या मराठा समाजासाठी सारथी तर ओ बी सी समाजासाठी महाज्योतीकाढली त्यांना माञ २०२१ पासून सरसकट फेलोशिप जाहिर केली यांना कसा पैसा आहे त्यांना दिली आमच्यावरच का दुजाभाव जातीयभेद काअसा,सवालही विद्यार्थी करित असल्याचे उत्तमराव गायकवाड यांचे म्हणने आहे

आझाद मैदानावरील विद्यार्थी यांचे आंदोलन हे सामाजिक झाले आहे आंबेडकर समाजातील विविध राजकीय संघटना राजकीय नेते यात उतरलेले आहेत आंदोलन वेगळ्या भावनिक मुद्यावर जावू शकते विद्यार्थी यांच्या तबेदी बिघडत आहेत अपंग विद्यार्थी महिला यांचे मोठे हाल होत आहेत याचा सामाजिक उद्रेक कधीही होऊ शकतो याची जाणीव ठेवून सरकारने मध्यम मार्ग काढून विद्यार्थी यांना सरसकट फेलोसिप जाहीर करावी असि विनंतीही उत्तमराव गायकवाड यांनी केली आहे कारण गेले ४७दिवस या विद्यार्थी यांचे हाल मी पहात आहे यांना सहकार्य करित आहे आधार देत आहे 

*अधिवेशन काळातच हे आंदोलन सुरु असताना सत्ताधारी ते विरोधी पक्षातील अनेक आमदारांनी विधानसभा विधानपरिषेदेत सरकारचे लक्ष वेधले आहे तर विधानसभा उपाअध्यक्ष यांनी सर्व संबंधित आधिकारी मंञी विद्यार्थी काही आमदार सामाजिक कार्यकर्ते यांची आपल्या दालनात बैठक घेऊन सरकारने हा प्रश्न त्वरीत सोडवावा विद्यार्थी बरोबर चर्चा करावी असेही निर्देश दिले आहेत*

*तर विधानपरिषद सभापती निलमताई गोरे यांनी सभागृहात निवेदन केले सरकारने विद्यार्थी यांची भेट घ्यावी मंञी यांनी मैदानावर जाण्याचे निर्देशही दिले पण त्यांचेही आदेशाला केराची टोपली मुख्यमंत्री*

*उपमुख्यमांञी दाखविली आणि गरीबाचे आपले सरकार किती भेदाभाव करणारे जातीयवादी आहे हेच दाखविले असा गंभी आरोपही समाजभूषण उत्तमराव गायकवाड यांनी केला आहे

आझाद विधानपरिषद विरोधी पक्ष नेते  सर्व पक्षीय वरिष्ठ आमदार विविध राजकीय सामाजिक नेते विद्यार्थी संघटना सामाजिक संघटना यांचे पदाधिकारी भेट देवून गेले आणि आपला पाठिंबा देवून गेले या सर्वांचा आदर करुन सरकारने हा प्रश्न राज्यात न चिघळता कायदा सुव्यवथा न बिघडता लवकारात लवकर सोडवावा कारण हे आंदोलन सामाजिक होऊ पहात असून आंबेडकरी समाजातून पाठिंबा मिळत आहे या पाठिंब्यामुळे विद्यार्थी यांना 149 ची नोटीसा देत असून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करित आहे असे उत्तमराव गायकवाड यांनीआपल्या प्रसिधी पञकात म्हटले असून विद्यार्थी यांचे काही बरेवाईट झाल्यास सामाजिक उद्रेक झाल्यास सरकारच जबाबदार असेल असाही ईषारा दिला आहे

*समाजभूषण उत्तमराव गायकवाड **

*जेष्ठ नेते राष्ट्वादी काँस*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1