Top Post Ad

देशाचं, राज्याचं आणि ठाण्याचं काय होणार?

 फेसबुक पोस्ट टाकण्यावरून ठाकरे गटातील महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटातील महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचं समोर आलं आहे. रोशनी शिंदे असं या मारहाण झालेल्या महिला पदाधिकाऱ्याचं नाव आहे. त्यांच्यावर ठाण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणात पोलिसांनी अद्यापही कोणतीही कारवाई केली नाही. 

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सरकारबद्दल नपुंसक अशी टिपण्णी केली आहे. सर्वोच्च न्यायालयानेच हे सांगितलं आहे त्याची प्रचिती ठाण्यात आली आहे. मी गँग शब्द वापरला नव्हता. पण आता ठाण्यात महिला गुंडगिरी करू लागल्या आहेत. त्यामुळे देशाचं, राज्याचं आणि ठाण्याचं काय होणार? हा ठाणेकरांपुढचा प्रश्न आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंनी यांनी आज रोशनी शिंदे यांची रूग्णालयात विचारपूस केली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पोलिस प्रशासनावर टीकास्त्र सोडलं. 

यावेळी बोलताना उध्दव ठाकरे यांनी रोशनी हात जोडून त्यांना सांगत होती की मला पोटात मारू नका तरीही त्यांना पोटात मारण्यात आलं. गयावया करणाऱ्या महिलेला अशा प्रकारे मारहाण करणाऱ्या लोकांना या ठाण्यात काय राज्यातच राहण्याचा अधिकार नाही. यांची गुंडगिरी वाढायला लागली आहे. ठाण्यात एका पत्रकाराला धमकी देण्यात आली. महिलांना मारहाण केली जातेय. त्या महिलेला आम्ही भेटलो. त्या म्हणतायत की त्यांनी अशी कोणतीही कमेंट केली नाही. त्यांच्याकडून माफी मागण्याचा व्हिडीओ करून घेण्यात आला. तोही त्यांनी दिला. तरी आणखीन महिलांना बोलवून मारहाण करण्यात आली. मला वाटतं आता या प्रकरणी फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहाण्याचा अधिकार नाही अशी खोचक टीकाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

जे काही प्रकार गेल्या काही दिवसांपासून घडत आहेत ते पाहिले तर यांना मुख्यमंत्री म्हणण्यापेक्षा गुंडमंत्री म्हटलं पाहिजे. गुंडमंत्री मी म्हणत नाही. मात्र गुंडगिरीचाच हा सगळा प्रकार आहे. ही गुंडगिरी महाराष्ट्रात कशी काय चालली आहे? आता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, त्यावेळी गुंड मंत्री असं नवं पद निर्माण करा असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे.

 शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची युवती सेना म्हणून कार्यरत असणाऱ्या रोशनी दीपक शिंदे यांना  टाटा मोटर्स कासारवडवली येथील कार्यालयातून सुटण्याच्या वेळेस  शिंदे गटाचे पूजा तिडके, माजी नगरसेविका नम्रता भोसले, प्रियांका मसुरकर, प्रतिक्षा विचारे, हर्षाली शिंदे, रोहिणी ठाकूर, अनघा पवार, सिद्धार्थ ओवळेकर व इतर १५ महिला अशा एकत्रित ऑफिसमध्ये घुसून शिवीगाळ करून मारहाण केली असल्याची तक्रार रोशनी शिंदे यांनी केली आहे. 

पक्षाच्या प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिंदे गटाचे दत्ताराम गवस यांनी अक्षेपाह पोस्ट केली असल्याने त्याला प्रत्युत्तर म्हणून मी माझे मत त्या ठिकाणी मांडले परंतु दत्ताराम गवस यांनी माझ्यावर वैयक्तिक कमेंट केली त्यावेळी मी त्यांना प्रतिउत्तर दिले, मी माझ्या कमेंट मध्ये कोठेही मा. मुख्यमंत्री साहेबांच्या बायकोचा उल्लेख केला नसतानाही मला वारंवार धमकीचे कॉल येऊ लागले. यासंदर्भात माझी चूक नसताना आणि मला भांडणे वाढवायचे नव्हते म्हणून मी सॉरी ची पोस्ट केली असताना सुद्धा असता माझ्या ऑफिसमध्ये वीस महिला एकत्र घुसून माझ्यावर जीवघेणी हल्ला केला. या झालेल्या हल्ल्याचे ऑफिस मधील सीसी फुटेज तक्रार अर्जासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कासवडवली येथे दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी सादर केले आहे सखोल चौकशी करून तात्काळ हल्लेखोरांवर एफ आय आर दाखल करून घ्यावी असे रोशनी शिंदे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारपत्रात म्हटले आहे. असे असतानाही शिंदेगटाच्या कार्यकर्त्यांकडून रोशनी शिंदे यांच्यावरच आरोपपत्र दाखल करण्यात आले असून पोलिसांनी तशी तक्रारही दाखल करून घेतली आहे. यामुळे ठाण्यामध्ये सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com