विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राच्या वतीने 23 एप्रिल रोजी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहामध्ये संविधान सन्मानात संविधान सन्मानार्थ स्त्री हक्क परिषद आयोजित करण्यात आली होती परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक आणि धुळे विद्रोही साहित्य संमेलना अध्यक्ष उर्मिला ताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले तर अध्यक्ष स्थान डॉ वंदना महाजन यांनी भूषविले
याप्रसंगी बोलताना उर्मिला ताई पवार म्हणाल्या आजच्या सांस्कृतिक दहशतवादी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर संविधान केंद्री स्त्रियांची हक्क परिषद आयोजित करणे ही ऐतिहासिक बाब आहे लोकशाही टिकवण्यासाठी संविधान मार्गदर्शक आहे
बीज भाषण करताना प्राध्यापक प्रतिमा परदेशी म्हणाल्या एकविसाव्या शतक हे जाति स्त्री शोषणाचं स्त्रीदाच्या शतक बनविण्याचा किंवा वयाचे शतक बनवण्याचा मनसुबा असणारे असणाऱ्या शक्ती आक्रमक झाल्या आहेत भारताचे संविधान व्यक्तीची प्रतिष्ठा स्वातंत्र्य अभिव्यक्ती आणि या सोबतच परमत सहिष्णुता प्रधान करते परंतु या संविधान संस्कृतीला छेद देणारी विषमतावादी मूल्य संस्कृती डोके वर काढत आहे हे रोखण्याची सर्वाधिक ताकद क्षमता कष्टकरी बहुजन स्त्रियांमध्ये आहे म्हणून या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे
या स्त्री हक्क परिषदेत संविधान संस्कृतीची मूलभूत मांडणी प्रा. आशालता कांबळे यांनी केली त्यांच्या सोबत शमीभा पाटील व प्रा. सिंधू रामटेके यांनी सहभाग नोंदविला प्रेमाला जाती धर्माचे कुंपण या विषयावरील परिसंवादात सरीता पवार ,कल्पना मळीये व दिपाली तेंडुलकर यांनी भूमिका मांडली प्रा. सई ठाकूर यांनी अध्यक्षस्थान भूषविले समारोपाच्या खुल्या सत्रात भारतीय स्त्रीमुक्ती दिन, एकमय राष्ट्रसंत कल्पना, लव आझाद, शिक्षण धोरणाचे परिणाम या विषयावर शोधनिबंध सादर करण्यात आले. अध्यक्षस्थान डॉ. श्यामला गरुड यांनी भूषविले ,तर माधुरी शिंदे,सुरेखा पैठणे,सिध्दार्थ साठे,पुंढलीक तायडे यांनी निबंधावर मांडणी केली .परिषदेचे सूत्रसंचलन वृशाली दिशा,पोर्णिमा गणवीर,Adv.अनुराधा नारकर ,Adv. जयश्री कांबळे यांनी केले.माता रमाबाई सांस्कृतिक मंच दामुनगर, कांदिवली यांनी समता गीते सादर केली.
परिषद यशस्वी करण्यासाठी सुदीप कांबळे ,अतुल खरात ,दिपाली तेंडोलकर, उमेश कांबळे,गौतम सांगळे, विलास कांबळे ,जयपाल खरात ,विनोद खरात ,जयश्री कांबळे,पोर्णिमा गणवीर यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या