Top Post Ad

शेणात पडलेला शेंगदाणा...!!


प्रबोधनकार ठाकरे यांनी धर्माची देवळे आणि देवळांचा धर्म या ग्रंथात बुरखाधारी ढोंगी ब्राह्मणांची तुलना करतांना म्हटले आहे की, जे ब्राह्मण आम्ही पुरोगामी आहोत, सुधारणावादी आहोत किंवा सेक्युलर आहोत असा टाहो फोडतात ते शेणात पडलेल्या शेंगदाण्या प्रमाणे असतात.
शेणात पडलेला शेंगदाणा ना खाता येत ना पचवता येतं....!! अनुभव असा आहे की, ब्राह्मण समाजवादी बनतो मात्र वेळ आली की, तो त्याचे ब्राह्मण्य दाखवतोच,तो कर्मठ असतोच,समाजवादी नाही तर तो आपल्या भावकीसाठी ढोंगी बनलेला असतो.तसेच कम्युनिस्ट, पुरोगामी, सुधारणावादी, सेक्युलर ब्राह्मणांचे भारतीय इतिहासात शेकडो उदाहरणे आहेत...!!

पुष्पमित्र शुंग याने बुरखा पांघरूण बृहदथ राजाचा विश्वास संपादन करुन सेनापती पद मिळविले आणि वेळ येताच बृहदथ राजाचा भर दरबारात खुन केला...!!
पुरोगामी चळवळीला शह देण्यासाठी असे बुरखाधारी ढोंगी ब्राह्मणांनी प्रत्येक क्षेत्रात घुसखोरी केली आहे...!!
आजकाल पत्रकारितेच्या क्षेत्रात तर अशांनी धुमाकूळ घातलेला आहे...!!
निष्पक्ष पत्रकार म्हणून चाटुगीरी करणारे, पाटलाच्या ताटाखालचे मांजर म्हणून वावरणारा शेणात पडलेला शेंगदाणा महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे...!!
मी शेणात पडलेला शेंगदाणा हे बिरुद यासाठी वापरले की, स्वतः जाहिर करायचे की, मी निख्खळ आंबेडकरवादी आहे. आणि मनुवादी कॉंग्रेस पक्षाची कायम तळी उचलून धरायची हा विरोधाभास नाही का.??
आंबेडकरवादी राजकीय पक्षाला भाजपची बी टीम म्हणून हिनवायला सगळ्यात पुढे. मग तुम्ही आंबेडकरवादी कसे...???
२०१९ ला काय चाललयं प्रकाश आंबेडकरांचं..???
असा प्रश्न उपस्थित करुन शंकेचे मोहोळ ऊठविणारा शेणात पडलेला शेंगदाणा, प्रसार भारतीच्या जाहीर कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर माझे आवडते नेते आहेत अशी बनवाबनवीची विरोधाभासी भाषा वापरतो...!!
वंचित बहुजन आघाडीला जातियवादी पक्ष ठरविणारा निष्पक्ष (?) पत्रकार ,कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत नेहमीच मौन का असतो...?? असे अनेक मुद्दे आहेत की, शेणात पडलेल्या शेंगदाण्याला संधी असुनही त्याने त्यावर भाष्य केलेले नाही. आपली पत्रकारीता पाजळली नाही आणि म्हणून तमाम आंबेडकरवादी समुहाने लक्षात घ्यावे की, जातीसाठी माती खाणारे कधीच निष्पक्ष नसतात, ते निष्पक्ष असल्याचे ढोंग करीत असतात. आणि म्हणून प्रबोधनकार ठाकरे यांच्या भाषेत तो शेणात पडलेला शेंगदाणा आहे, त्याचा काही एक ऊपयोग नाही हे लक्षात घेऊन निरुपयोगी म्हणून सोडून दिले पाहिजे...!!
जातीवर जाणारा आंबेडकरवादी कसा होऊ शकतो...??

जयभीम.
@.. भास्कर भोजने

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com