Top Post Ad

पृथ्वीला महाविनाशापासुन वाचविण्याचा संकल्प करावा

पृथ्वीला महाविनाशापासुन वाचविण्याचा संकल्प करावा.

पृथ्वीचा दीवसेंदीवस ह्रास होत आहे. यामुळे ऑक्सिजनची मात्रा कमी होत आहे ही घटना करोना महामारीच्या रूपाने आपण उघडल्या डोळ्यांनी पहाली. यामुळे जगात लाखोच्या संख्येने जिवीत हानी सुध्दा झाली.याकरीता पृथ्वीला वाचवाण्यासाठी सर्वांनी "संकल्प"करण्याची गरज आहे.जगात पृथ्वी सुरक्षित रहावी या उद्देशाने 1970 पासून "जागतिक पृथ्वी दीवस"साजरा करण्यात येतो.प्लास्टीक पासुन होणारे प्रदुषण व पृथ्वीला निर्माण होणारा धोका यावर मोठ्या प्रमाणात कार्यक्रम राबविण्यात आले व अनेक देशांनी प्लास्टीक पासुन होणारे प्रदुषण टाळण्याचा प्रयत्न केला व अनेक देश प्लास्टीकच्या प्रदुषणापासुन मुक्त झाले.भारतानेही पृथ्वी संरक्षणासाठी व प्रदुषण दुर करण्यासाठी प्लास्टीकवर बंदी घातली आहे.

सध्याच्या परीस्थितीत जगातील वाढती लोकसंख्या पृथ्वीतलावरील मोठे संकट आहे. यामुळे हवेतील ऑक्सिजनची मात्रा दिवसेंदिवस कमी होतांना दिसुन येते.कारण जगातील वाढत्या लोकसंख्येमुळे जंगलसंपदा छीन्न-विछीन्न झाल्याचे दीसुन येते. त्याचप्रमाणे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोठ्या प्रमाणात कारखाने दीसुन येतात.यामुळे संपूर्ण जगात स्थलप्रदुषण,वायुप्रदूषण व जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होतांना दिसते. कारखान्यांचा विस्तार जगातील सर्वच देशांनी वाढविला आहे. यामुळे पहीला प्रहार जंगलसंपत्तीवर केलेला आहे. मानवाच्या अतिरेकामुळे पृथ्वीतलावर भुकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, सुनामी, महाप्रलय,महामारी,साथीचे रोग,अती पाउस,अती उष्णता,अती थंडी अशाप्रकारचे विनाशाकडे नेणाऱ्या घटना दीवसेंदीवस वाढतांना दीसत आहे.

ह्या संपूर्ण घटना मानवाने पृथ्वीवर अत्याचार केल्यामुळे दीसुन येतात. 21 व्या शतकात मानव इतका सामोरं गेला आहे की अनेक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अत्याधुनिक हतियार,अनुबॉम्ब बनविण्याच्या शर्यती लागलेला आहेत.आतातर "बायोवेपन्स" म्हणजे जैविक हतीयार बनविण्याची शर्यत लागली आहे.यामुळे पृथ्वी "तहस-नहस" होवू शकते.आज संपूर्ण जग उत्पादन वाढविण्यासाठी जैविक खतांचा वापर करीत आहेत यामुळे पृथ्वीतील शक्ती व ऑक्सिजन दिवसेंदिवस कमी होतांना दिसते.सध्याच्या परीस्थितीत चिन जैविक हतीयार बनविणारा देश बनलेला आहे.चिन असा देश बनला आहे की नेहमीच तो जैविक हतीयाराचे वेगवेगळे परीक्षण करीत असतो.2019 मध्ये चिनने "कोरोणा व्हायरसचे" परीक्षण करून मानवजातीसोबत "खुनी तांडव" केल्याचे दिसून आले.

आज संपूर्ण जग पृथ्वीला वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे तर चिन "पृथ्वीचा सर्वनाश" करतांना दिसतो.आज मानवाने जंगल संपत्तीची हत्या केल्यामुळे नदी-नाले,तलाव, विहिरी मोठ्या प्रमाणात आटलेले दीसतात.यामुळे दीवसेंदीवस पृथ्वीच्या तापमानात व हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे दिसुन येते.त्याचप्रमाणे ग्लोबल वॉर्मिगमुळे सुध्दा पृथ्वीचे संतुलन डगमगायला लागले आहे.पृथ्वीवरील जंगलसंपदा कमी झाल्यामुळे व छोटे-मोठे तलाव आटल्यामुळे हिंसक पशु व जंगलातील इतर पशू (वाघ, बिबट्या,अस्वल,हरीण,बंदर) यांना जंगलात योग्य आहार व पाणी मिळत नसल्यामुळे शहराकडे धाव घेतांना दीसतात हा अत्यंत चिंतेचा आणि गंभीर विषय आहे.अशा अनेक कारणांमुळे पृथ्वीचा ह्रास होत आहे व जंगली प्राण्यांचा जिवन धोक्यात आलेले आहे.

यावर उपाय शोधण्यासाठी जागतिक स्तरावर अनेक योजना राबविल्या जातात.त्यातुनच 1970 मध्ये विंसकॉन्सिन सीनेटर गेलॉर्ड नेल्सन यांनी "22 एप्रिल हा जागतिक पृथ्वी दीवस" साजरा करण्याची संकल्पना साकार केली आणि तेव्हापासून 22 एप्रिल हा जागतिक पृथ्वी दीवस म्हणुन साजरा केल्या जातो.आज जगात 200 हुन अधिक देश आहेत या देशांच्या तुलनेत लोकसंख्येचा विचार केला तर 1000 कोटींच्या वर लोकसंख्या आहे.त्यामुळे संपूर्ण देशांनी पृथ्वीला वाचविण्याच्या उद्देशाने 22 एप्रिलला प्रत्येक व्यक्तीने एकतरी झाड लावायला पाहिजे.कारण आपण उघड्या डोळ्यांनी करोना महामारीच्या काळात ऑक्सिजनचा तुटवडा पहाला आहे.परंतु नैसर्गिक ऑक्सिजन टिकवून ठेवण्यासाठी जंगल वाचवीले पाहिजे, वृक्षारोपण केले पाहिजे,ज्यांच्या परीसरात जागा नसेल अशांनी एखाद्या कुंडलीमध्ये झाड लावुन "पृथ्वी दीवस" साजरा करायला पाहिजे.

त्याचप्रमाणे जंगल तोडीमुळे जंगलातील प्राणी शहराकडे भटकतात त्यांच्यासाठी जगातील संपूर्ण देशांनी जंगलामध्ये छोटे-छोटे तलाव बांधुन जंगली प्राण्यांचे प्राण वाचवुन संगोपन करायला हवे.कारण मानवाच्या अनेक चुकांमुळे अनेक जंगली पशु-पक्षी व महत्त्वपूर्ण औषधीयुक्त वृक्ष लुप्त होत आहे.या पृथ्वीतलावर प्रत्येक प्राण्याचे व वृक्षांचे असणे आवश्यक आहे.कारण प्रत्येक पशु-पक्षी एकमेकांवर अवलंबून असतो त्याचप्रमाणे प्रत्येक वृक्ष महत्वाची भुमिका बजावीत असते.जगातील "गिधाड" हा पक्षी अत्यंत महत्त्वाची भुमिका बजावीत असतो.मेलेल्या प्राण्यांचे मांस खाणे "गिधाड"चे काम असते.त्यामुळे अशुद्ध परीसर शुद्ध होतो.परंतु दु:खाची बाब ही की वायुप्रदूषण व जलप्रदूषण यामुळे गिधाडांची संख्या नाहीच्या बरोबरीत दीसते.

त्यामुळे पृथ्वीवर मानवजातीचे असने जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच जंगलातील संपूर्ण पशु-पक्षी यांचे सुध्दा जिवन तेवढेच महत्त्वाचे आहे.तेव्हाच पृथ्वी सुरक्षीत राहील.मानवजातीने स्वत:च्या स्वार्थापोटी "पृथ्वीची राखरांगोळी" केली आहे.पुढे चालुन महाभयानक परीणाम सर्वांनाच भोगावे लागतील आणि आज आपण गेल्या दोन वर्षांत करोना महामारीच्या रूपात भोगले सुध्दा आहे आणि आता रशिया -युक्रेन युध्दामुळे तिसऱ्या महायुद्धाचे संकट पृथ्वीवर ओढवल्याचे दिसून येते.आज मानवजातीने पुर्वेपासुन तर पश्र्चिम पर्यंत उत्तर पासुन तर दक्षिण पर्यंत,आकाश-पाताळा या संपूर्ण ठीकाणी मोठ्या प्रमाणात प्रदुषणाचे जाळे पसरविले आहे.यामुळे आज "पृथ्वी माता" सुध्दा भयभीत आणि चिंतेत आहे म्हणूनच आज आपल्याला कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासत आहे.

आज मानवाची रक्षा करण्याकरीता पृथ्वीला वाचविण्याचा "संकल्प" जगातील संपूर्ण राष्ट्रांनी घ्यायला पाहिजे.आज वृक्षलागवडच पृथ्वीला वाचवु शकते.कारण आज जगात जंगलांचे संगोपन होत नसल्याने मोठ्या प्रमाणात वनवे लागतांना दिसतात व यामुळे मोठ्या प्रमाणात जंगल संपदा नष्ट होत आहे.त्याचप्रमाणे देशात व जगात दिवसेंदिवस आगीच्या सुध्दा घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहे.याचे मुख्य कारण म्हणजे वाढते तापमान यामुळे पृथ्वीचे संतुलन डगमगत आहे हे नक्की.याला कुठेतरी थांबवायला पाहिजे. वृक्ष लागवडीमुळे पावसाचे पाणी जमीनीमध्ये मुरेल व पावसाचे पाणी सरळ समुद्र किंवा नद्यामध्ये न जाता पृथ्वीच्या पोटात जाईल.यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मोठी मदत मिळेल व उष्णतेचे प्रमाण कमी होईल.यामुळे विहीरी, तलाव व नदी-नाले नेहमी जलमग्न राहील.आज मानवाने पाण्यासाठी सरळ पाताळात प्रवेश केला आहे.

म्हणजेच आज मानवाने पाण्यासाठी जमिच्या आत 700 फुट खोलवर जाऊन बोरवेलच्या सहाय्याने आपण देवलोकातील (पाताळातील) पाणी शोषीत आहोत.मानवाची जमीनीतील पाण्याची क्षमता फक्त 50 ते 60 फुटांपर्यंत आहे.परंतु मानवाचा अतिरेक हा विध्वंसाकडे किंवा विनाशाकडे न्यायला काहीच वेळ लागणार नाही.कारण मानवाच्या हातात सर्वच काही आहे.परंतु मानवाला अजुन पर्यंत निसर्गावर नियंत्रण ठेवता आले नाही.नैसर्गिक आपदासमोर मानव नेहमी हतबल होतांना दिसतो.वनवा लागले, महाप्रलय येणे,हीमकडा कोसळने, उष्णतामान वाढने,भुकंप येणे,सुनामी येणे ह्या संपूर्ण गोष्टी मानवाने स्वत:हुन ओढवलेल्या आहेत.यामुळे जगात दरवर्षी मोठ्या प्रमाणात जिवीत हाणी व वित्तीय हानी होतांना आपण पहातो.यामुळे आज संपूर्ण जगाने एकत्र येऊन पृथ्वीला वाचविण्याचा "संकल्प" केला पाहिजे.

पृथ्वीला वाचविने म्हणजे "महायुध्द" जिंकण्यासारखेच आहे हे महायुध्द जिंकण्यासाठी जगातून सर्वच स्तरातुन प्रयत्न व्हावयास पाहिजे.आज संपूर्ण जग कठीण घडीतुन प्रवेश करीत आहे.संपुर्ण मानवजातीपुढे तीन प्रश्न उभे ठाकले आहे एक आहे पृथ्वीचे रक्षण, दुसरे म्हणजे वैश्विक महामारी पासुन सुटका आणि तिसरे म्हणजे तिसऱ्या महायुद्धापासुन जगाला विचविणे याबाबी तेव्हाच शक्य होवू शकते जेव्हा मानवजात खरी मानुसकी दाखवेल. कारण दीवसेंदीवस समुद्राच्या पाण्याची पातळी वाढुन पृथ्वीवरील जमिनीचा भुभाग कमी होतांना दिसतो. याकरीता ग्रामीण भागातून शहराकडे येणारा लोंढा थांबवीला पाहीजे व सरकारने शेतीला सर्वतोपरी प्रथम प्राधान्य द्यायला पाहिजे.यामुळे पृथ्वीचे रक्षण होईल व खऱ्याअर्थाने "पृथ्वी दीवस"मानल्या जाईल."पृथ्वी मानवजाती के लिये मेहमान है, मालक नहीं" ही बाब मानवजातीने लक्षात ठेवली पाहिजे व पृथ्वीचे रक्षण केले पाहिजे.

सध्याच्या परिस्थितीत पृथ्वीवर तिसऱ्या महायुद्धाचे संकट ओढवतांना दिसत आहे.कारण युक्रेन युद्ध पहाता अमेरिका, रशिया, चीन, उत्तर कोरिया, जापान,इराण,इराक, इजरायल,ब्रिटन एकमेकांच्या विरोधात अनुबॉम्बच्या किंवा अत्याधुनिक मिसाईलच्या धमक्या देतांना दिसतात.यामुळे पृथ्वीचा विनाश केव्हाही होवू शकतो याला ताबडतोब थांबायला हवे.पृथ्वी दिनाच्या निमित्ताने मी सर्वांना आग्रह व विनंती करतो की  नैसर्गिक ऑक्सिजन वाढविण्यासाठी जंगल तोड थांबवायला हवी व मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडीवर भर द्यायला हवा यामुळे "गुरांना चारा व सर्वांना शुद्ध हवा आणि शुद्ध ऑक्सिजन" मिळण्यास मोठी मदत मिळेल व पृथ्वी वाचेल.पृथ्वी सुरक्षित तर संपूर्ण जीवसृष्टी सुरक्षित हा मुलमंत्र जगातील संपूर्ण देशांनी जपायला हवा.                          .

रमेश कृष्णराव लांजेवार                            

माजि विद्यापिठ प्रतिनिधी, नागपूर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com