सध्या देशात सर्वसामान्य गोरगरीब जनतेची मते गृहीत धरून दबावाचे राजकारण केल्या जात आहे. मतपेटीच्या माध्यमातून सत्तेची पोळी भाजल्या जात आहे. संविधानाची पायमल्ली केल्या जात आहे. संविधान बाजुला ठेवून हम करे सो कायदा केला जात आहे. कोणत्याही प्रकारची परिक्षा न देता शासकीय यंत्रणेत सचिव पदावर भरती केल्या जात आहे. हा सर्व प्रकार जनतेला उघडया डोळयांनी पहावा लागत आहे. सक्षम पर्याय नसल्यामुळे या राजकारण्यांची चलती आहे. देशात आज सर्वत्र दूषित वातावरण असून देशाची वाटचाल अराजकतेकडे सुरू आहे. कारण देशाची सत्ता सध्या गुराख्याच्या हातात आहे. असा आरोप महाराष्ट्र विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. अण्णाराव पाटील केला. त्यामुळे अशा लोकांकडून काय अपेक्षा करणार? असे मत त्यांनी आज मुंबईतील मराठी पत्रकार संघात प्रसिद्धी माध्यमांशी साधतांना व्यक्त केले.
शोषित पिडीत सामान्य समाज घटकांची मते घेऊन आतापर्यंत सत्ता भोगणाऱ्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बी.जे.पी. शिवसेना या पक्षांनी लोकशाहीची घराणेशाही निर्माण केली आहे. वेगवेगळ्या मार्गानी सत्ता हस्तगत करुन महाराष्ट्राची लुट केली आहे. सत्तेसाठी जाती धर्माचा वापर करून जनतेला फसवण्याचे काम केले आहे. हे चारही पक्ष शेतकऱ्यांच्या नावाने खोटे प्रेम दाखवून शेतकऱ्याचे संसार उध्दवस्त करण्याचे काम पिढ्यान पिढ्या चालु आहे. आज.समाजातील वंचित घटकांना.आत्तापासून दूर ठेवण्यात आले आहे .हे जाणीव पूर्वक होत आहे. वंचित गोर गरीब यांच्या विकासाच्या केवळ पोकळ घोषणा करण्यात राजकीय पुढारी आणि त्यांचे पक्ष धन्यता मानतात..या घटकाच्या विकासाबाबत कोणालाही आस्था.नाही.
श्रमिक.मजूर शेतकरी. बेरोजगार महिला आणि तरुण अशा घटकांबाबत ही मंडळी आजही उदासीन आहेत. आरोग्य आणि शिक्षण या मुलभूत हक्कापासून वंचित राहावे लागत आहे. हेच सर्व सामान्य जनतेचे दुर्दैव आहे. त्यासाठी सर्व जाती धर्माला एकत्र करुन लहान मोठया जाती-जातीची युती करू आणि राज सत्तेची शेती करु.. .या घोषवाक्यातुन अनेक पक्ष संघटना व सामाजिक काम करणाऱ्या समाज संघटना एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राज सत्तेसाठी एक सक्षम आघाडी करून पर्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून त्याची सुरुवात झाली आहे सामील व्हा सन्मान मिळेल असे आवाहनही पाटील यांनी यावेळी केले.
रिपब्लिकनचे गजानन शिरसाट, महाराष्ट्र विकास आघाडीचे अँड नदेश अंबाडकर, अॅड. अनिरुध येचाळे, समनक जनता पार्टीचे संपत चव्हाण, भा. प्र. जा. सुराज्य पक्षाचे दशरथ राऊत, आझाद समाज पार्टीचे सुनिल वाकेकर, नेताजी काँग्रेस पार्टीच्या रंगा शेट, भारतीय रिपब्लीकन पार्टीचे संजय बोरकर, भारतीय फोरवर्ड ब्लॉक पक्षाचे डॉ. नवले, वंचित समाज इन्साफ पार्टीचे डॉ. अशरफ शेख, सैनिक शेतकरी आघाडीचे मनोज डांगे, मानहित लोकशाही पक्षाचे बालाजी घुमाडे, भारतीय मानवतावादी पार्टीचे दयानंद सोहनी, शिवशक्ती सेनच्या करुना धनंजय मुंडे आदी पक्षानी या आघाडीत आपला सहभाग नोंदवला आहे तर
महाराष्ट्र गोपाळ समाज संघटनेचे कालापाड रामकृष्ण, फकीरादल मातंग समाज संघटनेचे सतिश कसबे, महाराष्ट्र कामगार रुद्र सेनेचे जनार्धन काशिनाथ चव्हाण, विश्व कल्याण विकास संघटनेचे किसकिंदा पांचाळ, गोवारी समाज संघटनेचे नंदकुमार गोवारी, स्व जमीन हक्क परिषद भारतचे डॉ. विनोद मोरे, भारत सेवा संघाचे सुनिल गोखीडे, क्रांती ज्योती ब्रीगेडचे नंदेश अंबाडकर, मानव सेवा मंडळाच्या अनुपम पदया, भारतीय लोकसत्ता संघटनाच्या वैशाली मोहिते / कदम, यशवंत सेनेचे माधव गडदे, भारतीय लोकसत्ता संघटना आदी संघटनांनी देखील आघाडीला आपला पाठिंबा जाहीर केला असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
0 टिप्पण्या