- *विद्यार्थी संघटना संयुक्त समिती*
- चलो आझाद मैदान..! चलो आझाद मैदान..!
- दिनाक १२ एप्रिल,२०२३. सकाळी १०.३० वाजता.
*बार्टीच्या ८६१ संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळालीच पाहिजे* *संशोधनासाठी सन २०२१ मध्ये प्रवेश घेतलेले अनुसुचित जातीतील संशोधक विद्यार्थी यांना फेलोशिप पासुन वंचित ठेवून संशोधनाची - शिक्षणाची संधी शासन, प्रशासन त्यांच्याकडून हिरावून घेत आहे.* बार्टीकडे अर्ज केलेले व सर्व पात्रता अटी पूर्त केलेले फेलोशिप साठी पात्र असलेले संशोधक विद्यार्थी दिनांक २० फेब्रुवारी, २०२३. पासुन आझाद मैदान येथे त्यांच्या न्यायिक व हक्काच्या फेलोशिपच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करीत असून १२एप्रिल, २०२३. पर्यंत ५१ दिवस होतील; परंतु आजपर्यंत शासनाने विद्यार्थ्यांच्या न्यायिक मागण्यांची गंभीर दखल घेतलेली नाही. आझाद मैदान येथे धरणे आंदोलनास बसलेल्या संशोधक विद्यार्थ्यांची मागणी न्यायिक असून, महाराष्ट्र भरातील सर्व विद्यार्थी संघटना एकत्र येवून "विद्यार्थी संघटना संयुक्त समीती" यांच्या वतीने दिनांक १२/४/२०२३ रोजी सकाळी १०.३० वा. आझाद मैदान येथे भव्य धरणे आंदोलन पुढील मागण्यांसाठी आयोजित करण्यात आले आहे.
*प्रमुख मागण्या*
१) बार्टी मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृती (BANRF- 2021) अंतर्गत सर्व ८६१ संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट अधिछात्रवृती (फेलोशिप) मंजूर करण्यात यावी.
२) UGC च्या fellowship Guidelines नुसार बार्टी मार्फत BANRF 2019-20 च्या संशोधक विद्यार्थ्यांना m.phil To PHD. साठी नियमित पाच वर्षे अधिछात्रवृती देण्यात यावी.
3) UGC च्या fellowship Guidelines नुसार बार्टी मार्फत BANRF -2018 च्या PHD संशोधक विद्यार्थ्यांना पाच वर्षे अधिछात्रवृती देण्यात यावी.
शिक्षण आमचा मूलभूत अधिकार आहे.
सरसकट फेलोशिप मिळालीच पाहिजे.
शिक्षण आमच्या हक्काचे.
आपले विनीत,
*विद्यार्थी संघटना संयुक्त समिती*
0 टिप्पण्या