Top Post Ad

भिमा! तूझ्या जन्माचा जल्लोष



 संवाद


भिमा! तूझ्या जन्माचा जल्लोष पाहून
तू ही अचंबीत झाला असशील
वारूळातून मूंग्याचे जथ्थे निघावे
तसे घराघरातून माणसांचे थवे
वेगवेगळे झेंडे घेऊन
जेव्हा तूझ्या दिशेने
बेभान होऊन तूझ्या नावाचा जयघोष करत
धावत सूटतात
तेव्हा तूलाही दचकायला होत असेल.

त्यांच्यातला आवेश पाहून
आवाजाचा दणदनाट ऐकून
तु ही क्षणभर घाबरून जात असशील.
आणि स्वतःलाच समजावत असशील
अरे! हे तर माझेच अनुयायी

आमच्यातल्या कीत्येकांना ऊभ्या आयुष्यात
तूझ्याकडून‌ काहीही घेता आलेल‌ नाही
तरी ही...
 भिमा तूझ्या जन्मामूळे म्हणत
तू दाखवलेल्या वाटेकडे
हे जथ्थे चालतच राहतात.
आपल्या भाग्योदयाच्या दिशेन

तू भोगलेल्या मरणयातना
खर तर आता कूणाच्याच
वाट्याला येत नाहीत
त्यामूळे तूला आता
विसरायला हरकत नाही
असे वाटत असतांना
कूठ तरी, काही तरी
खट्ट म्हणून होत
आणी तूझ्या प्रतिमेवर
चढलेले धूळ झटकली जाते
माणसं त्वेषान तूझा
जयजयकार करायला लागतात
कारण!सगळ्या प्रश्नांच ऊत्तर
तूच तर आहेस.
तूला न मानणा-यांनाही
तूलाच विचारावच लागत
आणि तूला मानणा-यांकडे तर
काही पर्यायच नाही.

ऊगाच कूणी तरी म्हंंटल नाही
जब तक सूरज चांद रहेगा......

माणसाच्या असण्याला
माणसाच्या नसण्याला
तूच तर अर्थ प्राप्त करून दिलास

इथल्या प्रत्येकालाच माहीत आहे
तू जर संपलास तर
माणूस संपणार आहे
माणसं श्वापदांसारखी
ऐकमेकांवर तुटून पडणार आहेत
काळोखाला आपल साम्राज्य पसरायला
काडीचाही वेळ लागणार नाही
अनमोल झालेल आयुष्य
मातीमोल व्हायला
वेळ लागणार नाही
म्हणून सांगतो भिमा
आमचा थयथयाट,आमचा दणदणाट,
आमचा गोंगाट आमचा आक्रोश 
तूला सहन करावाच लागेल
दुसर आहे तरी कोण ईथे?
आमच ऐकणार  तूझ्या शिवाय.

आम्ही कीतीही घडलो,बिघडलो
तरी आम्हाला सूधारणारा
तूच तर आहेस इथे

खूप वर्षांनी तू आम्हाला
गवसलास भिमा
हाजारो वर्षे ज्या मरण यातना भोगल्या
त्या यातनांवर फूंकर मारणारा
तूच तर आहेस.

तू दिलेली हात्यारं वापरतांना
आमच्याकडून चूका होत असतील
कदाचीत....
पण इथे चूका काय कमी झाल्यात
त्या चुकांची कींमत
आमच्या कीती पीढ्यांनी मोजली
हे तूच तर सांगीतलस आम्हाला

म्हणून सांगतो भिमा
तू आमच्याही काही चूका
आपल्या ऊदार आंतःकरणान
माफ करच एकदाचा
आणि नाचू दे आम्हाला 
बेभान होऊन... तूझ्या जन्मदीनी.


*दिपक खंदारे..... *नांदेड.*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com