मुंबई महापालिका प्रभाग क्र. १६१ साकीनाका परिसरात सुरु असलेल्या भुमाफियाच्या भ्रष्टाचार आणि दादागिरी विरोधात मनपा/ पोलिस प्रशासनामध्ये तक्रार अर्ज देऊनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही उलटपक्षी तक्रार दाखल करणाऱ्यालाच घर तोडण्याची नोटीस महानगर पालिकेने बजावली असल्याची माहिती झुल्फिकार काझी यांनी दिली. आज मुंबईतील मराठी पत्रकार संघात याबाबत त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.
वॉर्ड क्र. १६१ मध्ये सि. टी. एस. क्र. ३२३ बी, नारायण कंपाऊंड, भानुशाली मैदान, १० फुट रोड, साकिनाका, मुंबई - ७२ या ठिकाणी अफझल चौधरी व मुन्ना था इसमांनी मनपाच्या मालकी जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केलै तसेच सदर बांधकामाला महापालिकेने बेकायदेशिर जलजोडणी व विद्युत जोडणी दिली
तसेच या बांधकामावर मनपा एल विभागामार्फत ०२ वेळा धातरमातर निष्कासनाची कारवाई करून बांधकामधारकाला पुन्हा सदर बांधकाम करण्याचा चान्स दिला. बांधकामधारकाने पुन्हा अनधिकृत बांधकाम केल्यांतर त्यांचेवर एमआरटीपी अंतर्गत अद्याप कारवाई करण्यात आली नाही. वॉर्ड क्र. १६१ मध्ये सि.टी.एस. क्र. ३२३ बी, नारायण कंपाऊंड, भानुशाली मैदान, १० फुट रोड, साकिनाका, मुंबई ७२ या ठिकाणी सांग्रीला को. ऑप. हौ. सोसायटीमधुन सि.टी. एस. ३२३ एफ भानुशाली मैदानाकडे जाणारा रस्ता सांग्रीला को. ऑप. हौ.सोसायटीवाल्यांनी गेट लावुन बंद केले.
या सर्व भ्रष्टाचाराविरोधात तक्रार केल्याप्रकरणी माझ्या ४० वर्ष जुन्या घराला तोडण्याची नोटीस महानगरपालिकेने बजावली आहे असा आरोप झुल्फिकार यांनी केला. म्हाडा चांदिवली पोलिस ठाणेमध्ये अफझल चौधरीने पोलिसांसमक्ष माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली तसेच मी यापूर्वी माझ्या मालकी हक्काच्या मिळकतीमध्ये प्रेस कॉन्फरेन्स घेण्याचा प्रयत्न केला परंतु अफझल चौधरी व जितु गजरा यांनी माझ्या जागेमध्ये घुसून तोडफोड केल्याप्रकरणी तक्रार देऊनही स्थानिक पोलिसांमार्फत कोणतीही कारवाई केलेली नाही. अफझल चौधरी व जितु गजरा हे मला खोट्या केसमध्ये अडकविण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोपही झुल्फिकार यांनी केला. याबाबत महापालिकेने तात्काळ कारवाई न केल्यास न्यायालयात दाद मागण्यात येईल असा इशाराही झुल्फिकार यांनी दिला.
0 टिप्पण्या