त्रिरत्न बौद्ध महासंघाचा ५६ वा वर्धापनदिन मुंबईतील चुनाभट्टी येथील महाक्रांती बौद्ध महाविहारात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त ज्येष्ठ धम्मचारी बोधीसेन यांचे अनमोल असे प्रवचन झाले. चेअरमन धम्मचारी ज्ञानकिर्ती, दानकिर्ती, संमतबंधू यांनी संघाविषयी, तसेच ज्येष्ठ धम्मचारी बोधीसेन यांच्या धम्मसेवेच्या ४० वर्षे समर्पित जीवनाची ओळख उपस्थितांना करून दिली.
संघाची स्थापना ७ एप्रिल १९६७ रोजी लंडन येथे भन्ते संघरक्षित यांनी केली. तो संघ जवळ जवळ ५५ राष्ट्रामध्ये ज्ञानदानाचे काम करीत आहे. बौद्ध धम्म प्रचार प्रसाराचे कार्य करीत असल्याचे सांगून आपणांस जगातील बौद्ध बांधवांशी बंधूंभाव जोपासण्याची गरज आहे. कारण ती आपली जबाबदारी आहे. या संघाची ओळख १९७९ रोजी वरळी येथील जापानी बौद्ध विहारात धम्माच्या कार्यक्रमात भन्ते संघरक्षित, धम्मचारी विमलकिर्ती, लोकमिञ आले असता झाली. आणि १९८०- ८१ पासून आजतागायत धम्म प्रचार प्रसार सुरू आहे. या काळात अनेक दु: खद घडल्या. त्यात मुलीचा अपघात असो, पत्नीचे पक्षघाती आजारपण असो, अथवा १० वर्षिय नातवाचे निधन असो, इतकेच काय तर माझे आजारपण असो या साऱ्या दु; खावर मात धम्माच्या धम्मबळाने करू शकतो आणि करीत आहे अशा आठवणी धम्मचारी बोधिसेन यांनी सांगितल्या.
. धम्मचारी दानकिर्ती, व धम्ममिञ सावंत यांनी धम्मगीते गायली आणि मैञी गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
सुरेश गायकवाड- पत्रकार ९२२४२५०८७३
0 टिप्पण्या