Top Post Ad

महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे नाव बदला...

 


 महाराष्ट्र भूषण पुरस्कार  म्हणजे  25 लाख रुपयाचा सढळ हाताने दिलेला भरघोस  निधी होय . महाराष्ट्र भूषण म्हणजे जणू काही ब्राह्मणभूषण प़ुरस्कारच होय. महाराष्ट्रां मध्ये ब्राह्मणांशिवाय अन्य महाराष्ट्र भूषण किताब कुणालाच मिळू शकत नाही का ? बहुजन समाजात चांगले कर्तबगार माणसं असतांना त्यांच्या नावाचा साधा विचारही होत नाही त्यामुळे बहुजन समाजाने खरे तर महाराष्ट्र भूषण या पुरस्कारावरच  बहिष्कार टाकला पाहिजे .

 हा उघड उघड जातियवाद आहे.बहुजन समाजातील एकनाथ शिंदे अथवा इतर कोणीही मुख्यमंत्री असले तरी ते सुद्धा या प्रस्थापितांविरुद हतबल झालेले आहेत . सध्या तर सर्व कारभार फडणवीस पाहत आहेत . मुख्यमंत्र्याचे अधिकार उपमुख्यमंत्री वापरत आहेत . देवेंद्र फडणवीस यांना ब.म.पुरंदरे पासून ते आतापर्यंत ब्राह्मणां शिवाय दुसरे कोणी दिसतच नाही. आणि दिसणार पण नाही . पहा महाराष्ट्र भूषण किताबाचा प्रवास केंव्हापासून सुरू झाला आणि तो कोणा कोणास प्रदान करण्यात आला .

  •  1996 पु. ल.देशपांडे कला साहित्य
  •  1997 लता मंगेशकर- कला संगीत
  •  1999 विजय भटकर - विज्ञान
  •  २००१ सचिन तेंडुलकर- क्रिकेट-
  •  2002 भीमसेन जोशी- कला संगीत
  •  2003 अभय आणि राणी बंग वैद्यकीय सेवा पती-पत्नी दांपत्य 
  •  2004 बाबा आमटे -समाजसेवा
  •  2005 रघुनाथ माशाळकर -विज्ञान
  •  2006 रतन टाटा- लोकप्रशासन
  •  2007 आर के पाटील समाजसेवा
  • 2008 नाना धर्माधिकारी समाजसेवा संयुक्त आणि 2008 मंगेश पाडगावकर साहित्य संयुक्त दोघांना .
  •  2009 सुलोचना लाटकर -सिनेमा
  •  2010 जयंत नारळीकर -विज्ञान
  •  2011 अनिल काकोडकर- विज्ञान
  •  2015 बाबासाहेब पुरंदरे- साहित्य .(या नावाला महाराष्ट्रातील जनतेचा प्रचंड विरोध असताना सुद्धा नाकावर टिचुन हा पुरस्कार देवेंद्र फडणवीस यांनी दिला ).
  •   2021 आशा भोसले कला -संगीत
  •  2023 दत्तात्रय उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी - समाजसेवा .( हा पुरस्कार देण्यासाठी फडणवीस -शिंदे सरकारने हजारो लोकांना तळपत्या उन्हात बसवले व त्यात बहुजन समाजाचे 13 लोक उष्माघाताने बळी पडले यांस सरकारच जबाबदार आहे .)

 1996 ते 2023 पर्यंत महाराष्ट्र भूषण पुरस्कार एकूण 18 लोकांना प्रदान करण्यात आला आहे .
 त्यापैकी रतन टाटा आणि आर के पाटील ही दोनच नावे वेगळी आहेत .
 पारसी,मराठा, असे दोन नावे सोडली तर सर्व पुरस्कार विजेते हे ब्राह्मण समाजातीलच आहेत .

 म्हणजे एकूण  18 महाराष्ट्र भूषण  पुरस्कारापैकी सोळा पुरस्कार हे केवळ आणि केवळ ब्राह्मण समाजामध्ये दिले जात असतील तर या पुरस्काराचे खरोखर नामांतर करुन ते ' ब्राम्हण भुषण पुरस्कार ' असेच केले पाहिजे, या पुरस्काराचे स्वरूप म्हणजे महाराष्ट्र सरकारने खुल्या हाताने दिलेली भरघोस ब्राह्मणांसाठीची देणगीच होय असेच म्हणावे लागेल . या पुरस्कार दिलेल्या व्यक्तींचे सामाजिक योगदानाचे मूल्यमापन केल्यास व त्यांचा इतिहास पाहिला असता ते सर्व त्यांचे त्यांचे क्षेत्रात दिग्गज व श्रेष्ठ असले तरी त्यांनी केलेले काम हे स्वतः साठी पैसा अथवा मोबदला घेतल्याशिवाय केलेले नाही  आणि मोबदला घेऊन केलेले कार्य कितीही उच्च दर्जाचे असले तरी भूषणावह नक्कीच नाही ,फक्त अभिमानास्पद आहे, अशांनाही महाराष्ट्र भूषण व भारत रत्न पुरस्कार प्रदान केला जाणार जात असेल तर ज्यांनी समाजाच्या उद्धारासाठी ,प्रगतीसाठी ,शिक्षणासाठी ,न्यायासाठी ,स्वत:च्या घरावर, संसारावर तुळशीपत्र ठेऊन दिवसरात्र वंचित ,दलीत ,शोषीत बहुजन समाजातील लोकांकरीता प्रस्थापित सवर्ण लोकांविरुद्ध लढा देऊन केलेले कार्य जाणूनबुजून दुर्लक्षित केले जात असल्याचे पदोपदी दिसुन येते .हेच खरे महाराष्ट्र भूषण व भारतरत्न पुरस्काराचे मानकरी असतांना देखील नको त्यांना पुरस्कार प्रदान केला जातो हि खरी शोकांतिका म्हणावी लागेल .

 म्हणजे या महाराष्ट्रांमध्ये कला,संगीत, साहित्य, क्रीडा, विज्ञान, समाजसेवा व राजकीय या क्षेत्रात काम करणारे ब्राह्मणांच्या शिवाय दुसरे अन्य कोणी असूच शकत नाहीत का ? साहित्य,विज्ञान,शास्त्रज्ञ,संशोधक,संगित,क्रिकेट,व इतर सर्व खेळ या क्षेत्रांमध्ये दलित बौद्ध ,आदिवासी, ओबीसी व इतर समाजातील लोक नाहीत का ? ब्राह्मणाच्या शिवाय अन्य कोणी लायकच नाहीत का ?

 याचे उत्तर आहे होय ! नक्कीच आहेत !

 परंतु 2008 साली नाना धर्माधिकारी यांना पुरस्कार दिला जातो तर 2023 ला पुन्हा धर्माधिकारी कुटुंबात म्हणजे दत्तात्रय उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी याच्याचं कुटुंबात  दोन वेळा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जातो .  एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी, सांस्कृतिक कार्यमंत्री सुद्धा ओबीसी (कोमठी समूह ) ,पण मुख्यमंत्री कोणी असो महाराष्ट्र भूषणचा पंचवीस लाखाचा पुरस्कार हा मात्र ब्राह्मणांच्या घरातच दिला गेला जातो . याचा अर्थ असा की मुख्यमंत्री जरी बहुजन, मराठा व वंचित समाजाचा असला तरी लाभ मात्र सांस्कृतिक दहशतवादाखाली ब्राह्मण समूहातील लोकांनाच दिला जातो . हे एक उघडे नागडे सत्य आहे . अजूनही बहुजन मराठा आणि ओबीसी समाजातील लोक अथवा राजकारणी नेते मंडळी हे वैदिक ब्राह्मणांच्या आणि सनातनी लोकांच्या नियंत्रणामध्ये, त्यांच्याच दहशतीमध्ये काम करत असल्याचे सिद्ध होत आहे .

 या महाराष्ट्रात मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा प्रथम महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले , डाँ बाबासाहेब आंबेडकर,शाहु महाराज आणि अण्णा भाऊ साठे यांना दिला जाऊ शकला असता,पण याबाबतीत आवाज ऊठवेल कोण ? यातील मोठी शोकांतिका अशी आहे की डाँ बाबासाहेब आंबेडकर यांना भारत रत्न पुरस्कार त्यांच्या निधनानंतर २५ वर्षांनी दिला जातो , परंतु महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना अद्याप पावेतो दिला जात नाही याला जातीयवाद म्हणणार नाही तर अजून काय म्हणणार . महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील समाजसेवक, साहित्यिक, वैज्ञानिक,महान विचारवंत डाॅ. आ. ह. साळुंखे सर , प्रा. मा.म. देशमुख सर, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पी. बी. सावंत साहेब , माजी न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील साहेब , कडूबाई खरात , अजय अतुल , नरेंद्र जाधव ,पवार ,लक्ष्मण माने व यासारखी किंवा मिलिंद,आनंद शिंदे सारखी माणसे , शेकडो मागासवर्गीय समाजातील विद्ववान साहित्यिक ,अथवा कलाकार यांच्या डोळ्यांना दिसत नाहीत का ? हे उघडे वास्तव आहे .

 म्हणून महाराष्ट्र भूषण या पुरस्काराचे नामांतर करून त्याचे नव्याने नामांतर " ब्राह्मणभूषण पुरस्कार" असेच ठेवले पाहिजे . म्हणून वरील प्रमाणे हा तपशील दिला गेला आहे. पटत असेल तर विचार करा. पटत नसेल तर मूग गिळून शांत रहा सनातनी वैदिकांच्या दहशतीखाली .

अनंतराव सरवदे सेवानिवृत्त तहसीलदार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com