{NCERTच्या अभ्याक्रमातून जातिव्यवस्था, ही ब्रिटीशांच्या आगमनानंतर भारतात आली असं रेटून खोटं सांगायचं किंवा अकबर-दाराशुकोव्ह सारख्यांच्या सर्वधर्मसमभावाचं मोठेपण दडवून ठेवायचं किंवा मोगलांनी भारतात राजकीय-सुसंघटितपणा (Political Unity) आणला, भारतीय समाजमानसाला समृद्ध करणाऱ्या नूतन स्थापत्यकला-पाककला-संगीत-काव्य-महसूली करसंरचना रुजवल्या, हे ऐतिहासिक-सत्य, आपला 'जातधर्म-विद्वेषा'चा ॲजेंडा पुढे नेण्यासाठी खुबीने वगळून टाकायचं, म. गांधींविषयक (विशेषतः, महात्म्याच्या हत्येच्या संदर्भातील) भाजपाई विद्वेषी-शोषक-हिंसक विचारसरणीला धडका देणारा महत्त्वाचा गाभा वगळायचा... असे जे इतिहासाच्या सत्यकथनाशी प्रतारणा करण्याचे अनेकोनेक, अत्यंत संतापजनक व घातकी उद्योग, सध्याच्या भाजपाई शासनाने चालवलेत, त्याचा धि:क्कार करावा, तेवढा थोडाच... यासंदर्भात, 'धर्मराज्य पक्षा' व्यासपीठावरुन खालील महत्त्वपूर्ण लेख आम जनतेसमोर पेश करीत आहोत, धन्यवाद!}
"मै कब्र से बोलूंगा".... म. गांधी
"हे मेरे पिता, तुम्हारी आत्मा को कभी शांति न मिले... तू दुनिया में जहाँ जहाँ भी असत्य और अन्याय का दौर चला हो, वहाँ वहाँ तू इस 'अशांति' तहत पुनर्जन्म ले और ऐसी असत्य से भरी, अत्याचार-शोषण करनेवाली निर्मम व्यवस्था को चुनौती देकर असत्य, अन्याय और शोषण को दूर करे!" सरोजिनी नायडू
भारतीय-अध्यात्मात मृतात्म्याला 'शांति' लाभणं; म्हणजे, मोक्षप्राप्ति होणं आणि पुनर्जन्म टळणं, ज्याचा दुसरा अर्थ मानवजातीला पुन्हा कधिही त्या महात्म्याचा लाभ न होणं, असा आहे. तसंच, सुखात लोळणं म्हणजे, परमेश्वराला स्वभावतः विसरुन जाणं... म्हणूनच, सरोजिनी नायडूंसारखंच अगदी आगळंवेगळं मागणं, महाभारतात कुंतीनं वासुदेव श्रीकृष्णाकडे मागितलं होतं, म्हणाली, "कृष्णा, मला आयुष्यात सुख नको, दुःख दे... जेणेकरुन मला तुझं सतत स्मरण राहील!"
महाभारताचं उदाहरण मुद्दाम यासाठी दिलं की, ज्या महाभारतात कृष्णाने गीता सांगितली... ती गीता, प्रसंगोपात्त 'परित्राणाय साधुनाम्, विनाशायच दुष्कृताम्', अशा आवश्यक हिंसेचा मोहदेखील टाळून (डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील याच 'गांधीवादा'तील 'अहिंसे'चाच आपल्या जनआंदोलनात प्रभावी अवलंब केला होता) म. गांधी तहहयात शब्दशः जगले!
त्यामुळेच, राम-कृष्ण या अवतारी पुरुषांसारखं मोठेपण म. गांधींना लाभलं; एवढंच नव्हे तर, लोकांनी त्यांना गौतम बुद्धाच्या पंक्तिला नेऊन बसवलं आणि पाश्चात्य देशांमधून तर, १९३१ सालापासूनच म. गांधींना कितीतरी विनंतीपत्रं, आर्जवं यायला लागली होती की, "इंग्लंडसह आमच्या 'अशांत' युरोपीय भूमिला तुमच्यासारख्या 'देवदूता'ची नितांत गरज आहे... तेव्हा तुम्ही भारत सोडून आमच्या भूमित या, आम्ही तुमच्यात पुनर्जन्म घेतलेला 'येशू' पहातोय!" या सर्व मागण्यांना विनम्र नकार देत हा भारतीय महात्मा म्हणाला होता, "प्रथम माझा, मी हाती घेतलेला भरतभूमितला 'सत्याचा प्रयोग' सफल तर होऊ देत; मग, मी तुमच्याकडे येतो!"
दुर्दैवाने तसं होणं नव्हतं... इथलाही प्रयोग सुफळ संपूर्ण होण्याआतच एका नथुराम गोडसे नावाच्या अधमवृत्तीच्या महापातक्यानं आमच्या महात्म्याचा क्रूर बळी घेतला!
गोळ्या झाडणारा हात नथ्थ्याचा असला तरी, त्याची ही असली विखारी विचारधारा घडवणारा 'काळा मेंदू'... केवळ देशघातकीच नव्हे; तर, 'अखिल मानवतेचा वैरी' असलेल्या व 'हिंदुत्वा'चा फसवा-बनावट कैवार घेणाऱ्या एका 'सांस्कृतिक-संघटने'चा होता. या तथाकथित सांस्कृतिक पण, अधम प्रवृत्तीच्या कारणे, जग 'सत्य आणि न्याय' प्रस्थापनेसाठी आयुष्य पणाला लावणार्या एका महान शांतिदूताला, अहिंसेच्या प्रेषिताला मुकला खरा; पण, त्या महापापी नथ्थ्याच्या अग्निशस्त्रातील तीन गोळ्यांनी तो संपण्याएवढा लहान किंवा क्षुद्र कधिच नव्हता... म्हणूनच तर मारला गेल्यानंतर वधस्तंभावर चढवला गेलेल्या येशूख्रिस्तासारखा प्रचंड वेगाने अवकाशाएवढा तो मोठा झाला, अवघ्या विश्वात फैलावला!
...आणि म्हणूनच, सूर्यावर थुंकणारी या देशातील विषारी पिलावळ, त्याला आता NCERT च्या पाठ्यपुस्तकातून मिटवू पहातेय... त्यांच्या अकलेची कीव करावी तेवढी थोडीच! म. गांधीच्या मोठेपणाच्या पुढे, भाजपाई-पिलावळ ही, 'किस झाड की पत्ती' होत, हे वैश्विक सत्य आहे! म्हणूनच, तर देशाचे पंतप्रधान विदेशात अनेक वेळा गेले, जेव्हा जेव्हा गेले, तेव्हा तेव्हा त्यांना, ना तिथे नथुराम कुठे दिसला, ना सावरकर... दिसला तो हातात काठी घेतलेला 'गांधीबाबा' आणि ध्यानस्थ गौतम बुद्ध!
जबरदस्तीने जिंकलेल्या भूभागातून जेव्हा, एखाद्या परकीय सैन्याला एतद्देशीय फौजांच्या कडव्या प्रतिकारानंतर माघार घ्यावी लागते... तेव्हा, ते परकीय, जाता जाता त्या प्रदेशाची जाळपोळ-विध्वंस करुन जातात, स्थानिक स्त्रियांवर सर्रास बलात्कार करुन जातात... तोच प्रकार, या NCRTE च्या अभ्यासक्रमातून म. गांधींविषयक (विशेषतः, महात्म्याच्या हत्येच्या संदर्भातील) महत्त्वाचा गाभा वगळण्यात घडताना दिसतोय.
२०२४ची लोकसभा-निवडणूक आपण हरणार तर आहोतच; तेव्हा, जाता जाता भारताच्या इतिहासाची, सर्वसमावेशक संस्कृतीची मोडतोड करुन आणि भारतीय समाजमानसावर 'वैचारिक बलात्कार' करुन जाऊया... हाच एकमेव घृणास्पद विचार, मुसोलिनीची 'काळी टोपी' परिधान करत 'नथ्थ्या'चा पुरस्कार करणाऱ्या, वर्णवर्चस्ववादी-शोषक 'जथ्थ्या'चा दिसतो... तूर्तास एवढेच !!!
...राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)
0 टिप्पण्या