Top Post Ad

पॅन कार्ड आधार कार्ड link... १००० रुपयाचा दंड

आयकर विभागाकडून ३१ मार्च पर्यंत पॅन कार्ड आधारकार्डाशी लिंक करण्याची मुदत देण्यात आली होती मात्र अद्यापही अनेक नागरिकांकडून या दोन्ही ओळखपत्र एकमेकांशी लिंक करण्यात आलेले नसल्याने ३१ मार्च पर्यंत असलेली आता ३० जून पर्यंत वाढविण्याचा निर्णय आयकर विभागाने घेतला असून यासंबधीचे पत्रकही आयकर विभागाकडून जारी करण्यात आले. 

ज्या व्यक्तींनी आधार कार्ड पॅनशी लिंक केले नसेल त्या व्यक्तीचे पॅन कार्ड १ जुलै २०२३ पासून अवैध ठरणार आहे. तसेच पॅन कार्ड जोडले गेले नसल्याने कोणताही कर परतावा करदात्यास परत मिळणार नाही. त्याचबरोबर पॅन जोडले गेले नसल्यास कर परताव्यावरील रकमेवरील व्याज सदरच्या करदात्याला मिळणार नाही. टीडीएस आणि टीसीएसही जास्तीच्या दराने कपात करणार असा इशाराही आयकर विभागाने करदात्यांना दिला आहे. याशिवाय पॅन कार्ड जोडले गेले नसल्याने एक हजार रूपयांचे दंडही आकारण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती आयकर विभागाने आपल्या प्रसिध्द पत्रकानव्ये दिली.

---------------------------------

 पॅन कार्ड आधारशी लिंक करा नाहीतर उपाशी रहा... पण १००० रुपये लिंक करायची फी भरा.... मनाला वाटेल असा कायदा काढतात. आयकर विभागाने याबाबत जनजागृती केली पाहिजे.... सर्व सामान्य जनतेची लूट करणे बरं  नाही.. गाव खेड्यातील लोकांना याबद्दल माहिती आहे का याची खात्री करून घेतली पाहिजे.. त्यांना पॅन कार्ड आधार शी कसे लिंक करायचे हे तरी कळणार आहे का याचा विचार केला पाहिजे. अहो  स्मार्ट फोन वापरणारे सर्वच लोक काही सुशिक्षित शिकलेले असतील हा गैर समज काढून टाकला पाहिजे. 

आपल्या देशाची लोकसंख्या १५० कोटी इतकी आहे त्यातील आत्ता पर्यंत फक्त ५० कोटी लोकांनी पॅन कार्ड आधार शी लिंक केले आहे. म्हणजे अजून भारतात १०० कोटी लोक बाकी आहेत. विचार करा एक व्यक्ती कडून १००० रू आकारण्यात येणार आहे. मग १०० कोटी जनता गुणिले १००० रुपये म्हणजे सरकार ला एक लाख कोटी रुपये म्हणजे १००,००,००,००,००० यातून मिळणार आहेत . प्रशासन लोकांच्या तोंडाचा घास हिरावून घेत आहे. मुख्यमंत्री महोदय आणि बाकी सगळे पक्षाचे आमदार खासदार अजून झोपले आहेत. हा मुद्दा वापरा पुढच्या वर्षी निवडणूक आहे . नाहीतर एक काम करा इडी , आयकर विभाग, अजून काही खाती असतील तर या  सर्व सामान्य मध्यम वर्ग आणि गाव खेड्यात राहणाऱ्या लोकांवर चौकशीचे आदेश द्या.. भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार मोठ मोठ्या जाहिरात प्रसिद्ध करत आहेत...कदाचित ही जाहिरात करण्यासाठी विसरले ........असे वाटते.... कृपया कोणीतरी त्यांना आठवण करून द्या.... जागो ग्राहक जागो.

स्वतःच्या हक्कासाठी लढा...... अरुणा नारायण  (अहमदनगर)

--------------------------------

आधार कार्डाचे नुतनीकरण करा...

एकाबाजूला केंद्र सरकारने आधार कार्ड आणि पॅनकार्ड एकमेकांशी संलग्नित करण्याचे आवाहन करत ३१ मार्च पर्यंत असलेल्या मुदतीत ३० जून पर्यंतची वाढ करण्याचा निर्णय आयकर विभागाने जारी केला. आता या सगळ्या घडामोडीत राज्य सरकारने ज्या नागरिकांनी आधार कार्ड काढून १० वर्षे झालेली आहेत. त्या सर्व नागरिकांनी त्या आधार कार्डाचे नुतनीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  ज्या नागरिकांच्या आधार कार्डला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून पत्ता किंवा अन्य अनुषंगिक तपशील अद्ययावत केलेला नाही, अशा सर्व नागरिकांनी आधार कार्डला ओळखीचा पुरावा व पत्त्याचा पुरावा अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यानुसार संबंधित सर्व नागरिकांनी आधार कार्ड अद्ययावत करून घ्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले केले.

आधार क्रमांक हा व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा म्हणून उदयास आला आहे. विविध शासकीय योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर केला जात आहे. या योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी सर्व नागरिकांना आधार डाटा वैयक्तिक तपशीलासह अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांच्याकडून प्राप्त निर्देशानुसार आधार कार्ड अद्ययावत करण्याची कार्यवाही करावयाची आहे. प्राधिकरणाच्या २३ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या परिपत्रकानुसार माय आधार (My Aadhaar) (एसएसयूपी) पोर्टलद्वारे ऑनलाइन आधार कागदपत्र अद्ययावत करण्यासाठी १४ जून २०२३ पर्यंत मोफत सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधार कार्डची कागदपत्रे अद्ययावत करण्यासाठी जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर ५० रुपये एवढे शुल्क आकारण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी www.uidai.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी भोसले यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com