सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सौं.सोनाली धीरज बुंदे जागतिक महिला दीनाचे निमित्त रायगड जिल्हा सतत काही नवीन काम करणाऱ्या सौं सोनाली धीरज बुंदे यांचे कार्य उल्लेखनीय आहे.सह संचालिका मिशन IAS,प्रिंसिपल लिटिल हार्ट्स प्री स्कूल उरण आदी विविध पदावर सोनाली बुंदे कार्यरत आहेत.द्रोणागिरी भूषण, कुलाबा जीविन गौरव पुरस्कार प्राप्त सोनाली बुंदे या संपूर्ण भारतात 1 रुपया मध्ये IAS चे प्रशिक्षण देणाऱ्या भारतातील पहिल्या महिला आहेत.डॉ पंजाबरावं देशमुख मिशन IAS अकॅडमीच्या त्या सह -संचालिका आहेत.सोनाली यांचा 2005 पासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सुरु झाला. मुलींना नेहमी वेगळी वागणूक का मिळते ह्या वर त्यांनी लेख लिहले. समाजासाठी खूप काही करायचे आहे ह्या भावनेने त्या असंख्य स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन शिबिर भरवितात.आजपर्यंत अनेक ठिकाणी त्यांनी एमपीएससी, यूपीएससीची तयारी करणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना निशुल्क मार्गदर्शन केले.गरीब मुलांना शिक्षणाची मदत कशी करता येईल यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.सक्षम स्त्रीजात कशी बनवतात येईल ह्यासाठी वेग वेगळे उपक्रम त्या राबवितात. स्वतः च्या आयुष्यात खूप संघर्ष पाहिला असल्यामुळे, इतर स्त्रीला, मुलांना कशी मदत करता येईल ह्याकडे त्या जातीनी लक्ष देतात. लीगल एड कॅम्प त्या घेतात. हेल्थ चेकअप कॅम्प साठी त्या नेहमी अग्रेसर असतात.किती तरी मुलांचे समुपदेशन त्या निशुल्क करतात. मानसिक आणि शारीरिक सक्षम पिढी त्यांना बनवायची आहे त्यासाठी त्या कार्य करत असतात.
शिक्षण क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व भाग्यश्री पाटील उरण तालुक्यातील कोप्रोली गावा मधील महिला सौ.भाग्यश्री आतिश पाटील या गेली १० वर्ष लहान मुलांचे प्ले ग्रुप चालवण्याचे कार्य करीत आहेत.त्यांच्या या कार्याबद्दल संबधित मुलांच्या पालकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत असतो. त्या एक उत्तम वास्तू तज्ञ, ज्योतिषी सुद्धा आहेत. २०१९ मध्ये महिला बचत गटाच्या अंतर्गत समुह संसाधन व्यक्ती (CRP) म्हणून नियुक्ती झाल्यानंतर कोप्रोली गावात मोठ्या प्रमाणात बचत गटाची स्थापना करण्यात आली आहे. महिलांना बचत गटाचे महत्त्व काय आहे याबाबत महिलांना प्रबोधन करण्याचे कार्य त्या उत्तमरीत्या करीत आहेत. त्याचप्रमाणे ग्रामस्वच्छता,आरोग्य विषयक विविध कार्यक्रम घेऊन महिलांमध्ये चांगल्या विचाराची शिकवणूक देण्याचे कार्य करीत आहेत. दि.८ मार्च २०२३ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त गावामध्ये महिलांसाठी विविध सांस्कृतिक तसेच क्रीडात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गावातील महिलांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात.तसेच महिलांचे प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी नेहमी पुढाकार घेतला आहे त्याचप्रमाणे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक समस्या सोडवण्यासाठी उत्तम कार्य करीत आहेत.
सर्पमित्र श्रावणी वानखेडे. सर्पमित्र श्रावणी वानखेडे ही विंधने, तालुका उरण जिल्हा रायगड येथील रहिवाशी असून गेल्या 2 वर्षा पासून केअर ऑफ नेचर या पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी संस्थे मध्ये कार्यरत आहे.श्रावणी वानखेडे या निसर्ग प्रेमी, पर्यावरण प्रेमी आहेत. निसर्गातील प्राणी पशु पक्षी यांचे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.सापांना पकडून त्यांना त्यांच्या मूळ आदिवासात मुक्त करण्याचे धाडसी काम श्रावणी करत आहे. एक स्त्री असून देखील ती हे काम न घाबरता निस्वार्थी वृत्तीने करत आहे.तरी काही लोक बोलतात मुली हे करू शकणार नाही ते करू शकणार नाही पण ह्या मुलीने जगाला दाखून दिले की मुली पण कमी नाहि. कॉल आल्यावर जेवता ताटावरून निघून जाणारी ही निसर्ग प्रेमी श्रावणी साप पकडायला जाते तेंव्हा साप विषारी आहे की बिन विषारी आहे याचा अजिबात विचार करत नाही.कोणताही विचार न करता ती सर्प पकडायला जाते.तर आत्ता पर्यंत तिने 69 सापाला त्यांच्या मूळ आदिवासात मुक्त केले आहे.त्यात काही विषारी सापे सुद्धा होती.तर काही बिन विषारी पण होती.महीलांसाठी खूप मोलाची गोष्ट आहे की एक मुलगी अस काम करत आहे. पुरुष या क्षेत्रात कार्यरत आहेत पण महिला सुद्धा या क्षेत्रात मागे नाहीत हे श्रावणी वानखेडे यांनी दाखवून दिले आहे.
समाजसेवी व्यक्तिमत्व राजश्री मुंबईकर. असं म्हणतात कीं प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनात अनेक भूमिका निभावत असतो ! पण काही व्यक्तीमत्व अशी असतात की त्यांना काही विशेष उपजत कला गुण अवगत असतात त्यातलंच एक नावं एक अष्टपैलू व्यक्तिमत म्हणजेच सौ.राजश्री राजेंद्र मुंबईकर उरण - गावठाण येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक आदर्श शिक्षिका म्हणून कार्यरत असून उरण,पनवेल,कर्जत शिक्षक पतपेढीच्या दोन वर्ष चेअरमन आणि पाच वर्षे उपचेअरमन पद भुषविणाऱ्या त्या एक उत्तम नाट्य कलाकार आहेत, एक उत्तम गायिका आहेत,एक सामाजिक कार्यकर्त्या आणि निसर्गावर प्रेम करणा-या निसर्गप्रेमी ,सर्पमित्र देखील आहेत,!एक आदर्श गृहिणी म्हणून अनेक भूमिका निभावून दहा अंगाने काम करत स्वाभिमानाने समाज्यात आपलं अस्तित्व निर्माण करणारी ही सावित्रीची लेक !.खऱ्या अर्थाने सौ.राजश्री ( राणीताई ) मुंबईकर यांना त्यांनी रंगभूमीवरील साकारलेल्या दमदार अभिनया करिता अर्थात २००८ मध्ये संपूर्ण रायगड जिह्यात गाजलेलं प्रख्यात आगरी साहित्यिक एल.बी.पाटील लिखित सुप्रसिद्ध नाटक एस.ई.झेड. या नाटकात केलेल्या दमदार अभिनया करिता राज्य स्तरीय नाट्य स्पर्धेच्या १४ नाटकांमधून त्यांना महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने त्या कालचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले होते आणि ह्याच नाटकाच्या माध्यमातून जनतेत झालेली जनजागृती आणि लोकांनी दिलेला सेझ विरोधी अभूतपूर्व प्रचंड लढा या मुळे उरण,पेण,पनवेल या तीन तालुक्यात होऊ घातलेला सेझ हद्दपार झाला. त्याच सोबत शिक्षण क्षेत्रात काम करत असतानां गरीब गरजूवंत विद्यार्थ्यांच्यां व आदिवासी विद्यार्थ्यांच्यां शिक्षणाकरिता केलेल्या उल्लेखनीय कार्यासोबतच आपले पती सामाजिक कार्यकर्ते राजू मुंबईकर यांच्या खांद्याला खांदा लावत सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या या समाजसेविकेला सिने अभिनेते मयुरेश कोटकर यांच्या शुभहस्ते मनसे महिला महोत्सव उरण रायगड येथे विशेष सेवा पुरस्कार या मानाच्या पुरस्काराने सन्मानीत देखील करण्यात आले.
0 टिप्पण्या