छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि उप अधिष्ठाता निलंबित ?


   छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत त्याला कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईच नव्हे तर निलंबन करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठा.म.पा.आयुक्त अभिजित बांगर यांना दिले,  या प्रकरणी  कळवा रुग्णालयातील असुविधा आणि अनास्थेसाठी जबाबदार ठरवून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा आणि उप अधिष्ठाता डॉ. सुचितकुमार कामखेडकर यांच्या निलंबनाचे तात्काळ आदेश  ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले  ठाण्याच्या इतिहासात राज्य सरकारने प्रथमच एवढा निधी ठाणे महापालिकेस दिला आहे. त्याचा व्यवस्थित विनियोग केला जावा. लोकांचा पैसा लोकांसाठीच्या सुविधांसाठी खर्च झाला पाहिजे. त्या सुविधा गुणवत्तापूर्ण असाव्यात. रस्ते, प्रकल्प यात दर्जा राखला जात नसेल तर कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कारवाई करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिले. 

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 'लेट्स रिड इंडिया फाऊंडेशन' यांच्या सहकार्याने करण्यात आलेल्या वाचनालयासह ठाणे महापालिकेने केलेल्या विविध प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.  या वाचनालयाची रचना, त्याची मांडणी आणि त्यातील पुस्तके ही सगळी कल्पना नाविन्यपूर्ण आहे, ही अतिशय चांगली कल्पना आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले. वाचन संस्कृती वाढवणारा हा उपक्रम पाहून आनंद झाला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी नोंदवली. वाचनालयाच्या या उपक्रमाचा विस्तार करण्याचा महापालिकेचा मनोदय असल्याचेही ठा.म.पा. आयुक्तांनी सांगितले.

 भारत सरकार, महाराष्ट्र शासन, ठाणे महानगरपालिका आणि ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण व भुमिपूजन सोहळ्यास खासदार श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, परिवहन सभापती विलास जोशी, आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवडे, माजी नगरसेवक आणि नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित होते.

 प्रास्ताविक भाषणात, 'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' या अभियानातंर्गत खड्डेमुक्त ठाणे, कचरा कुंड्यांपासून मुक्ती, शौचालय सुधारणा आणि सौदर्यीकरण ही कामे सुरू झाली आहेत. ३१ मेपर्यंत ठाणे शहरात आणखी बदल दिसतील आणि ठाणेकरांना सुखद अनुभव मिळेल, अशी ग्वाही आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

...थेट नवीन घरात!             ठाण्यातील धोकादायक इमारती हा आपल्या चिंतेचा विषय आहे. म्हणून त्यावर राज्य सरकारने क्लस्टरची योजना आणली आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्यांनी संक्रमण शिबिरांची भीती बाळगू नये. मोकळ्या जागांवर इमारती बांधून नागरिकांना थेट नवीन घर देण्याचा प्रयत्न आहे. त्याबद्दल कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच, या कामांतील बहुतेक सगळे अडथळे आता दूर झाले आहेत. त्यामुळे तातडीने कामाला सुरूवात करूया, अशा सूचना आयुक्त बांगर यांना दिल्या.

नवीन रेल्वे स्थानकाचा लाभ ठाणेकरांना-              ठाणे ते मुलुंड दरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकासाठी मनोरुग्णालयाची जमीन मिळण्यातील स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली आहे. त्यामुळे नवीन स्थानकाचा मार्ग मोकळा झाला आहे. या स्थानकामुळे मूळ ठाणे स्थानकावरील ताण कमी होईल आणि लाखो ठाणेकरांना त्याचा लाभ मिळेल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

कंटेनरमधील शौचालये हायवेवरही...            वागळे इस्टेटमध्ये तात्पुरत्या स्वरुपात बांधण्यात आलेल्या कंटनेरमधील शौचालय या संकल्पनेचे मुख्यमंत्री महोदयांनी कौतुक केले. अशाप्रकारची शौचालये हायवेलगत उभारून नागरिकांची गैरसोय टाळता येईल, अशी सूचनाही  त्यांनी केली. नागरिकांनीही शहरातील स्वच्छतेसाठी जबाबदारीने वागावे, असे आवाहनही त्यांनी केले.

लोकार्पण आणि भूमीपूजन              कोपरी खाडी किनारा विकास प्रकल्प, गावदेवी भूमिगत वाहनतळ, कळवा खाडी किनारा विकास प्रकल्प, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नव्याने तयार करण्यात आलेल्या सुसज्ज अशा प्रसुतीगृहाचे व वाचनालयाचे उद्घाटन, तसेच ब्लड डोनेशन व्हॅन, नातेवाईकांसाठी रात्र निवारा, अक्षयचैतन्य संस्थेतर्फे रुग्णांसाठीच्या मोफत भोजन कक्षाचे लोकार्पण मुख्यमंत्री  शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याशिवाय, वागळे इस्टेट येथील रोड नं. २२ च्या वाहतूक बेटाचे सुशोभीकरण, ३९१ कोटींच्या रस्ता मजबुतीकरण प्रकल्पांचे भूमिपूजन,  परिवहन सेवेत दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बसगाड्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री  शिंदे यांच्या हस्ते करण्यात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1