थिरानी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय वर्तकनगर ठाणे येथील उप मुख्याध्यापक चंद्रभान इंगळे आज सेवानिवृत्त झाले, 29 वर्षाच्या गौरवशाली सेवा कालखंडात शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगती साठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले, थिरानी महाविद्यालयात झालेल्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात त्यांच्या गौरवशाली कार्याचा आढावा घेत महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सहकारी प्राध्यापक वर्ग तसेच वर्तकनगर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डी.व्ही. जोशी आदींसह अनेक मान्यवरांनी त्यांच्याबद्दल आपले विचार व्यक्त केले. त्यांना भावी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाकरिता विशेष उपस्थिती म्हणून सरांच्या मातोश्री खास गावाहून या सोहळ्यास आल्या होत्या. याबद्दल सर्वत्र कुतूहल होत होते.
शिवसेना प्रवक्ते चिंतामणी कारखानीस, शिवसेना ठाणे प्रमुख प्रदीप शिंदे, महिला संघटक ठाणे जिल्हा रेखा खोपकर, उपजिल्हा संघटक अॅ़ड आकांक्षा राणे, उप शहर प्रमुख वसंत गव्हाले, प्रा, जगन्नाथ बावा, शशिकांत धेंडे सर, वंचित आघाडीचे जयंत बैले, माजी नगरसेवक दिलीप बारटक्के, मुख्याध्यापक प्रबुद्ध निलंगेकर, अफजल भाई पठाण, शीख समाजाचे पप्पू अठवाल बिल्लू भाई, अवतारसिंग, काँग्रेस नेते मार्कस लोंढे, भोला पाटील, संजय शिंदे, संतोष, रेखा जाधव, प्रकाश कांबळे, शिबू, बाळू उघडे, चंद्रभूषण विश्वकर्मा, धर्मणाथ,विश्वकर्मा, विभाग प्रमुख महागिरी संजय भोई, ठाणे सह प्रवक्ते तुषार रसाळ,युवा अधिकारी कोपरी पाचपाखाडी शिवसेना राजेश वायाल, शाखा प्रमुख सूर्यवंशी आदी अनेक मान्यवर या कार्यक्रमाकरिता उपस्थित होते
यावेळी अनेक मान्यवरांनी प्रा.इंगळे सरांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला.
असंख्य गरजू विद्यार्थ्यांना शालेय प्रवेश मिळवून देणे, शैक्षणिक साहित्याची मदत मिळवून देणे, जातीचे आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळवून देवून शिष्यवृत्ती मिळवून देणे, त्यांच्या कौटुंबिक आणि सामाजिक समस्यांचे निराकरण करणे, उच्च शिक्षणासाठी तसेच विविध प्रकारच्या नोकऱ्या आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करणे आणि देशासाठी नीतीने वागून उत्तम भारताचा नागरिक आपल्या सोबतचा विद्यार्थी कसा घडेल या बाबतीत त्यांचा कटाक्ष होता.
उत्तम इंग्रजी भाषा अध्यापन, विविध शास्त्रीय सोप्या पद्धतीने मांडणी, विविध उदाहरणे देत त्यांनी इंग्लिश ची भीती घालविली,संभाषण कला आणि सुंदर लिखाणामुळे त्यांचे शेकडो विद्यार्थी देश विदेशात उच्च पदावर कार्यरत आहेत आणि सतत संपर्कात असतात हे विशेष आहे, अत्यंत शिस्तप्रिय आणि प्रेमळ शिक्षक म्हणून ते ओळखले जातात.भ्रष्टाचाराचा कडवा विरोध, विज्ञाननिष्ट , पुरोगामी आणि लोकशाही समृद्ध करणाऱ्या क्रांतिकारी धोरणांचा पुरस्कार आणि आग्रह धरीत विविध सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते घडविण्याची आझाद सर म्हणजे एक कार्यशाळा आहे.
फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव असल्यामुळे ठाणे शहर आणि संपूर्ण महाराष्ट्रात मोठा मित्र परिवार त्यांना लाभलेला आहे ग्रामपंचाती ते मंत्रालय मुंबई किंवा दिल्ली असो कुणाचे कोणतेही काम अडले तर आझाद सर म्हणजे हक्काचा मदतगार म्हणून उपयोगी व्यक्ती अशी त्यांची ओळख आहे, नोकरीच्या व्यतिरिक्त असंघटित क्षेत्रातील कामगार, घरेलु कामगार, कचरा वेचक महिला,हॉटेल, बेकरी, वर्कशॉप मधील कष्टकरी, रिक्षाचालक,बांधकाम मजूर यांच्या हक्क आणि अधिकारांसाठी त्यांनी गेली 25वर्षे शासनासोबत संघर्ष करीत न्याय मिळवून दिलेला आहे. लॉकडाऊनच्या गंभीर स्थितीत मजुरांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आणि ती मिळवून दिली, हजारो बांधकाम कामगारांसाठी शासकीय बोर्डात नोंदणी करून घेतली, सुरक्षा साधनांचे किट वाटप केले, विमा मिळवून दिला, त्यांनी स्थापन केलेल्या बहुजन असंघटित मजदुर युनियन च्या कार्याची दखल घेवून महाराष्ट्र सरकारने त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध समित्यांवर काम करण्याची संधी देवून गौरव केलेला आहे. सद्या ते प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेवर अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
आजपासून चंद्रभान इंगळे खऱ्या अर्थाने आझाद झाले.... असच या प्रसंगी म्हणावं लागेल....
0 टिप्पण्या