शिवसैनिकांना कोणतीही लढाई ही नवीन नाही, आपल्या सारखे कट्टर व निष्ठावंत शिवसैनिक सोबत असतील तर महाराष्ट्रावर आलेले हे संकट गेल्याशिवाय राहणार नाही. आपल्या हक्काचा आमदार, खासदार व आपल्या हक्काचा मुख्यमंत्री पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या साथीने निवडून द्यायचा आहे. अशी भावना विनायक राऊत यानी व्यक्त केली. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवगर्जना अभियाना अंतर्गत आज मिरा भाईंदर जिल्हा शाखेच्या वतीने मिरारोड येथे आयोजित करण्यात आलेला शिवगर्जना मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कसबा विधानसभेमध्ये झालेल्या निवडणुकीचा संदर्भ देऊन मतदार राजाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले. येणाऱ्या काळामध्ये सन्माननीय न्यायालयाचा निकाल कोणाच्याही बाजूने लागला तरी आपल्या सर्वांना एकत्रितपणे लढायचे आहे असे आवाहनही राऊत यांनी यावेळी उपस्थित शिवसैनिकांना केले. जिंकेपर्यंत लढायचे हा निर्धार मनाशी बाळगून असंख्य शिवसेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने ही सभा मोठया उत्साहात पार पडली.
0 टिप्पण्या