Top Post Ad

मोदी आडनावाचे सगळे चोर का असतात? राहुल गांधी यांची खासदारकी रद्दबातलचे आदेश

 


मोदी आडनावाचे सगळे चोर का असतात? अशी उपरोधिक टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०१९ साली कर्नाटकातील निवडणूक प्रचारादरम्यान केली. याप्रकरणी गुजरातमधील भाजपाचे माजी आमदार पुनरेश मोदी यांनी सुरत न्यायालयात दाद मागितली. त्यावर न्यायालयाने राहुल गांधी यांनी दोन वर्षाची शिक्षा ठोठावली. मात्र न्यायालयाच्या निकालाविरोधात अपिल करण्यासाठी एक महिन्यासाठी जामीन मंजूर केला. परंतु न्यायालायाच्या निकालाची तात्काळ दखल घेत  केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने २४ तासाच्या आतच लोकसभेचे सहसचिव पीसी त्रिपाठी आणि जनरल सचिव उत्पल कुमार सिंग यांच्या सहीने लोकसभा सचिवांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्दबातलचे आदेश जारी केले  

 राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा प्रयत्न भाजपा मागील काही दिवसांपासून करत होते. हे सर्व जाणीवपूर्वक व ठरवून केलेले असून खासदारकी रद्द करण्याचा भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा निर्णय हा लोकशाहीचा खून आहे, मागील ९ वर्षापासून केंद्रातील मोदी सरकार फक्त नीरव मोदी, ललित मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्यासारख्या भ्रष्ट लोकांसाठी काम करत आहे, तर राहुल देश वाचविण्यासाठी लढत आहेत. देशातील जनतेचे करोडो रुपये घेऊन हे भ्रष्ट उद्योगपती देशाबाहेर पळाले. या भ्रष्टाचाराविरोधात राहुल गांधी यांनी सातत्याने आवाज उठवला. यामुळेच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा आता सर्वत्र रंगली आहे.

 लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यान त्यांना 2024 ला होणारी सार्वत्रिक निवडणूक लढवता येणार नाही. याचा फटका असा की काँग्रेस आणि पर्यायाने यूपीएला पंतप्रधान पदासाठी दुसरा चेहरा पाहावा लागणार आहे. त्यासोबतच राहुल गांधी यांना शासकीय निवासस्थानही सोडावं लागणार आहे.  सुरत न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपिल करून शिक्षेला स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाकडून करण्यात येत आहे. 

खासदारकी रद्द केल्यावर, मी भारताच्या आवाजासाठी लढत असून त्यासाठी मला जी किंमत मोजावी लागेल त्यासाठी मी तयारी आहे, असं  राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.  यासंदर्भात बोलताना काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, आम्ही कायदेशीर लढा आणि राजकिय लढाई एकदमच लढू असा इशाराही दिला. 

राहुल गांधी आणि फैजल यांना लोकसभेचे खासदार म्हणून अपात्र ठरवणे हे संविधानाच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे. लोकशाही मूल्यांना छेद दिला जात आहे. हे निषेधार्ह आणि संविधान ज्या तत्त्वांवर आधारित आहे त्याच्या हे सर्व विरोधात आहे. आपल्या लोकशाही संस्थांचं रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र उभे राहण्याची  गरज असल्याचं म्हणत शरद पवार यांनी सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. आपली राज्यघटना प्रत्येक व्यक्तीच्या न्याय्य न्यायाच्या अधिकाराची हमी देते. विचार स्वातंत्र्य दर्जा आणि संधीची समानता आणि प्रत्येक भारतीयाच्या सन्मानाची खात्री देणारा बंधुभाव जोपासते, असंही शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

लोकसभा सचिवांनी राहुल गांधी यांची वायनाडची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वड्रा यांनी ट्विट करत म्हणाल्या, नरेंद्र मोदीजी, तुमच्या चमच्यांनी एका शहिद पंतप्रधानाच्या मुलाला देशद्रोही, मीर जाफर असे संबोधले, तर तुमच्या एका मुख्यमंत्र्याने थेट राहुल गांधी यांचे वडील कोण ? असा प्रश्न उपस्थित केला याची आठवण नरेंद्र मोदी यांना करून दिली.  काश्मीरी पंडीतांच्या रिती रिवाजानुसार एका मुलाने वडीलांच्या मृत्यूनंतर पगडी परिधान करत आपली परंपरा कायम ठेवली. संसदेत संपूर्ण परिवार आणि काश्मिरी पंडित समाजाचा अपमान करत वह नेहरू नाम क्यों नही रखते… असे म्हणालात. त्यावेळी कोणत्याही न्यायाधीशाने तुम्हाला दोन वर्षाची शिक्षा सुनावली नाही. तुम्हाला संसदेने अपात्र ठरविले नाही अशी संतप्त सवाल प्रियंका गांधी यांनी थेट मोदींना केला. तसेच राहुल गांधी यांनी सच्चा देशभक्ताप्रमाणे अदानीकडून करण्यात येत असलेल्या लूटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नीरव मोदी, मेहुल चोक्सी वर प्रश्न उपस्थित केला. तुमचे मित्र अदानी हे काय देशाची जनता आणि संसदेपेक्षा मोठे झाले का? की त्यांच्याकडून करण्यात येत असलेल्या लुटीबाबत प्रश्न विचारला म्हणून तुम्ही बावचळले का? असा खोचक सवालही प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला.

चोराला चोर म्हणणं हा आपल्या देशात गुन्हा ठरला,”  चोर देश लुटणारे आजही मोकाट आहेत व राहुल यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचे हे सरळ सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे. पण तरीही लढत राहू.” अशा तिखट शब्दात उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचे समजताच त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले. महाविकास आघाडीने या घटनेचा निषेध करत सभात्याग केला व विधानभवनच्या पायऱ्यावर काळ्या फिती लावून भाजप प्रणित मोदी सरकारचा धिक्कार केला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते अजय चौधरी, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्यासह मविआचे आमदार उपस्थित होते.

अदानी-मोदींच्या संबंधावर लोकसभेत जाब विचारला. केंब्रिज विद्यापीठातील विधानावर राहुल गांधी यांनी माफी मागावी म्हणून विरोधक मागणी करत होते पण राहुल गांधी यांना लोकसभेत बोलूही दिले नाही. इंग्रज राजवटीत सरकारविरोधात बोलल्यानंतर कठोर शिक्षा दिली जायची, तीच पद्धत भाजपा सरकार आज वापरत आहे. राहुल गांधींचा चौकशीच्या नावाखाली आधी ईडीच्या कार्यालयात १०-१० तास छळ केला. शेवटी ते भाजपाच्या दडपशाहीला भीक घालत नाहीत हे दिसल्याने त्यांची खासदारकी रद्द केली. याचा आम्ही निषेध करतो, भाजपा सरकार व मोदी सरकारचा धिक्कार करतो आणि आगामी काळात आम्ही भाजपाविरोधात रस्त्यावर उतरुन आणखी तीव्र संघर्ष करु.  असा घणाघाती हल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय हा लोकशाहीवरील हल्ला आहे. भारत जोडो यात्रेनंतर भारतीय जनता पक्ष राहुल गांधी यांना जास्तच घाबरू लागला आहे. लोकसभेत राहुल गांधी यांनी अदानी-मोदी संबंधाचा मुददा उपस्थित केला होता, त्यातूनच भाजपाने सुडबुद्धीने कारवाई केली आहे. केंब्रिज विद्यापीठातील विधानावर लोकसभेत बोलू दिले नाही, त्यांचा माईक बंद करण्यात आला. देशाची वाटचाल लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे चालली आहे याचा हा पुरावा आहे. स्व. इंदिरा गांधी यांनी अशाच प्रकारच्या व्यवस्थेचा सामना केला होता आता राहुल सुद्धा त्याच व्यवस्थेचा सामना करत आहेत. पण या अत्याचारी व्यवस्थेला तोंड देत इंदिरा गांधी यांनी जनता पक्षाचा पराभव करत पुन्हा देशाच्या पंतप्रधान झाल्या. राहुल गांधीसुद्धा भाजपाचा पराभव करून देशाचे पंतप्रधान होतील असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com