नागालँड विधानसभा निवडणुकीत केंद्रीय सामाजिक न्याय्य राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाची दमदार एन्ट्री झाली आहे. दोन मतदार संघात इम्तिचोबा आणि वाय. लिमा ओनेन चँग हे दोन उमेदवार निवडून आल्याचा जल्लोष मुंबई आणि ठाण्यासह अनेक ठिकाणी पहायला मिळाला. ब-याच दशकांनंतर महाराष्ट्राबाहेर पक्षाने स्वबळावर आमदार निवडून आणले. पक्षाचे नॉर्थ ईस्टचे सेनापती विनोद निकाळजे यांच्या नेतृत्वात आणि कमाल कामगिरीमुळेच हे उमेदवार विजयी झाले असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. नागालॅंड मधील अबोई-४७, घासपानी-॥-५, पुंगरो खिपीरे-६०, सेमिन्यू-१२ या चार जागांवर रिपाईने दुस-या क्रमांकाची मते घेतली.
टूएनसंद सदर- 2 विधानसभा मतदारसंघात रिपाई चे अधिकृत उमेदवार इम्तिचोबा हे तर “नोकसेन विधानसभा” मतदारसंघात वाय. लिमा ओनेन चँग हे विजयी झाले आहेत. नागालँड मध्ये पक्षाच्या उमेदवारांनी निवडणूक 8 ठिकाणी लढली आणि त्यात 2 उमेदवार विजयी झाले. ऊस शेतकरी या निवडणूक निशाणीवर पक्षाच्या उमेदवारांनी आठ जागांवर लढविल्या होत्या. त्यातील दोन जागांवर पक्षाचे उमेदवार उमेदवार विजयी झाल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय्य राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. नागालँड मध्ये निवडून आलेले दोन्ही आमदार नागालँड मध्ये भाजप एनडीपीपीच्या युतीला सरकार स्थापने साठी पाठिंबा देतील. नागालँड सरकारमध्ये रिपाइंला सत्तेचा वाटा मिळण्यासाठी आपण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि पक्ष श्रेष्ठींना भेटणार असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.
0 टिप्पण्या