Top Post Ad

चला नव्याने कर्नाटक बघू या... बसवरील जाहीरातीने मुंबईकर संतापले


 ज्या महाराष्ट्राला मुंबई मिळाली आहे, त्या मुंबईमध्ये मराठी माणसाच्या तोंडावर छाताडावर बसून मुंबई महापालिकेने स्वत:च्या बसेसवर जाहिरात केली आहे, चला नव्याने कर्नाटक बघू या. हा मराठी माणसांचा, महाराष्ट्राचा अपमान आहे. सरकारने याची नोंद घ्यावी. जसं तुम्ही 12 तासात अतिक्रमण काढलं, तसं 12 तासात बेस्ट बसवरच्या जाहिराती काढा. नाही तर ज्या बसवर या जाहिराती आहेत, त्या बस मराठी माणूस फोडेल, असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार  जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.  

गुढी पाडव्याच्या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या माहिममधली अनधिकृत मजार आणि सांगलीतल्या अनधिकृत मशिदीचा मुद्दा उपस्थित केला होता. कारवाई झाली नाही तर माहिममधल्या त्या मजारीशेजारी गणपतीचं मंदिर बांधू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. राज ठाकरेंच्या या इश्रायानंतर प्रशासनाने दोन्ही ठिकाणचं अनधिकृत बांधकाम पाडलं. या मुद्यावरून आता जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला नवा अल्टिमेटम दिला आहे.  

मुंबईतील बेस्ट बसेसवरील कर्नाटक सरकारच्या जाहिराती काढल्या नाहीत तर संतप्त जनता बसेस फोडेल असा इशारा राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय.. सभागृहाबाहेर विविध मुद्यांवर बोलतांना त्यांनी हा इशारा दिला. बेस्ट बसवर 'चला कर्नाटक नव्याने पाहुया' अशा प्रकारच्या जाहिराती लावण्यात आलेल्याच्या मुद्यावरून आव्हाडांनी टीका केली. एकीकडे सीमाभागात राहण्राया मराठी बांधवांवर अत्याचाराची मालिका सुरू असून त्याच कर्नाटकाला छाताडावर बसवण्याचं काम सरकार करत असल्याची टीकाही आव्हाडांनी केलीये. यावेळी बोलतांना त्यांनी मनसेवरही टीका केली. मुंबईला डान्सबार म्हणणं चुकीचं असल्याचंही आव्हाड म्हणाले आहेत.  

 दरम्यान माहिमचं मझार प्रकरण आणि राज ठाकरेंची सभा ही क्रिप्टेड मॅच होती.असे स्पष्ट मत आव्हाड यांनी व्यक्त केले. हे बघा माझ्या हातात एक पत्र आहे. हे पत्र जिल्हाधिक्रायांचं आहे. यामध्ये त्यांनी पोलीस बंदोबस्त कधी घ्यावा याची तारीख 23 मार्च लिहिलेली आहे. वरची तारीख 22 हाताने लिहिली आहे. याच दर्ग्याबाबत हिंदूहृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे असताना सामनात पहिल्या पानावरही ही बातमी छापून आली होती असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.  

“य्ह्ना राज ठाकरेंना कुणीतरी सांगितलं होतं तुम्ही असं बोला, मग परवा सकाळी ही मझार पाडण्यात येईल. मग सगळं श्रेय तुम्हाला मिळेल आणि तुमची हवा होईल. माझ्या हातातला पेपर त्याची साक्ष देतो आहे. क्रिप्टेड सभा म्हणजे क्रिप्ट लिहून दिलं जातं. पिक्चर वगैरे काढताना क्रिप्ट लिहून देतात ना तू हे घे आणि वाच. मग डायलॉग बोलण्याची एक स्टाईल असते. त्यासाठी एक कागद द्यावा लागतो तो हा कागद &ंञ्च्ह्ण असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.  

जितेंद्र आव्हाड यांनी हा आरोप केल्यावर कोण आहे क्रिप्ट रायटर असं त्यांना पत्रकारांनी विचारलं. त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, स्क्रीप्ट रायटरही मीच सांगायचा, बोलणाराही मीच सांगायचा मग तुम्ही काय करणार असा प्रतिप्रश्न पत्रकारांना केला.  

राज ठाकरेंच्या भाषणाने काही होत नाही. त्यांच्या भाषणाने कुणी भडकत नाही, भडकवतही नाही. सगळ्या मराठी माणसांना कळलंय आता राज ठाकरेंबाबत. राज ठाकरे हे महाराष्ट्रातले सर्वात गोंधळलेले राजकारणी आहेत. पटकन कधीतरी शिंदेंच्या बाजूने बोलतात. कधी टीका करतात, कधी यांच्यावर टीका कधी त्यांच्यावर टीका करतात. तुम्हाला घरातल्या गप्पा मारण्यासाठी शिवाजी पार्क मैदान कशाला असाही प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे.  

माहीमच्या समुद्रात अनधिकृतपणे दुसरा हाजीअली दर्गा बांधत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केला होता. त्याबाबतची चित्रफितही दाखवली होती. ही मजार अनधिकृत असून ती तोडण्यात यावी. हे बांधकाम तोडले नाही तर आम्ही तेथे सर्वात मोठे गणपतीचे मंदिर उभे करु, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर सरकारी यंत्रणा कामाला लागल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाने रात्रीच आदेश काढून हे बांधकाम पाडून टाकण्याबाबत पावले उचलली. सकाळी आठ वाजता पोलीस आणि पालिकेच्या जी उत्तर विभागाच्या पथकाची मदत घेत हे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1