Top Post Ad

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन पक्षाचा महामेळावा


  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशचा भव्य - मेळावा दिनांक ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबईत चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात आयोजित करण्यात आला आहे. या भेळाव्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी दिली. 

आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत सदर मेळाव्याबाबत अधिक माहिती देताना महातेकर म्हणाले रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केन्द्रीय राज्यमंत्री मा. रामदासजी आठवले मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शन करणार असून मेळाव्यास पालकमंत्री दिपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, खासदार पुनम महाजन, आमदार आशिष शेलार, आमदार प्रसाद लाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.  नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 2 आमदार निवडून आल्याने रिपब्लिकन पक्षामध्ये चैतन्याचे वातावरण असून रिपब्लिकन कार्यकर्ते उत्साहाने मुंबई प्रदेशच्या मेळाव्यात रिपब्लिकन पक्षाचे शक्तिप्रदर्शन घडवतील असा विश्वास यावेळी नेत्यांनी व्यक्त केला. 

या पत्रकार परिषदेस  पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. कृष्णमिलन शुक्ला, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मा. गौतम सोनवणे, मुंबई प्रदेश अध्यक्ष. सिध्दार्थ कासारे,  मुंबई प्रदेश युवक आघाडीचे अध्यक्ष सचिन मोहीते मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष. बाळासाहेब गरुड, मुंबई प्रदेश सरचिटणीस. विवेक गोविंदराव पवार, जिल्हा अध्यक्ष. साधू कटके, जिल्हा अध्यक्ष.संजय डोळसे, रमेश गायकवाड: प्रकाश जाधव, संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com