Top Post Ad

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी महाज्योतीच्या वतीने निधी


 
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्मदिन 11 एप्रिल रोजी राज्यभर उत्साहात साजरी करण्याचे नियोजन महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत  (महाज्योती)   करणयात आले असून विविध उपक्रमांद्वारे जयंती साजरी करावी, असे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी केले आहे.

            क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य केले. आजच्या आधुनिक विचारांच्या साक्षर समाज निर्मितीमध्ये त्यांचे अमुल्य योगदान आहे. यावर्षी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या संस्थेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाज्योतीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती सर्व विभाग व सर्व जिल्ह्यांमध्ये अभिनव पध्दतीने साजरी करण्याबाबत ठराव मान्य करण्यात आला आहे.

            त्यानुसार, प्रत्येक जिल्ह्यात शिक्षण विभागाच्या समन्वयाने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील प्रसंगावर चित्रकला स्पर्धा, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील प्रसंगावर रांगोळी स्पर्धा, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन व विचारांवर वकृत्व स्पर्धा, मी सावित्रीबाई बोलते किंवा मी ज्योतिबा बोलतोय या विषयांवर एकांकिका स्पर्धा, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर निबंध स्पर्धा या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी महाज्योतीच्या वतीने निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेअसे महाज्योती संस्थेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com