Top Post Ad

मराठी भाषा प्रश्नी सर्व सरकारांनी फक्त उपचारांची धुळफेक केली ! -सुकृत खांडेकर


मराठी भाषा अखेर जनभाषा झालीच नाही.किती सरकारे आली गेली आणि किती ठराव झाले.परंतु आजपर्यंत पाठपुरावा करण्याच्या नावावर फक्त उपचारांची धूळफेकच होत राहिली‌.म्हणूनच  मराठी भाषा टिकविण्यासाठी आता सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठविला पाहिजे,असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांनी केले.

   जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रच्या विद्यमाने  प्रभादेवी येथील पु.ल.देशपांडे कला अकादमी सभागृहात श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आणि मराठी भाषा गौरव दिन संपन्न झाला.या प्रसंगी पत्रकार सन्मान सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष नारायण पांचाळ होते.संघटनेचे उपाध्यक्ष के.रविदादा यांनी प्रास्ताविक केले. सरचिटणीस हेमंत सामंत ,सचिव नामदेव काशिद, खजिनदार दिलीप पटेल, संघटक सतिश साटम आदि मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी संघटनेचे मुंबई अध्यक्ष राजेंद्र साळसकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

   सुकृत खांडेकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी त्या काळी प्रथम मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आवाज उठविला आणि तमाम मराठी माणूस एकवटला.हे असे काही तरी घडले पाहिजे,तरच मराठी माणूस खडबडून जागा होईल. आज एका बाजूने मराठी शाळा बंद होत आहेत.मराठी शिक्षक बेरोजगार होत आहेत.पण दुसऱ्या बाजूने उर्दू, मळ्यालम, बंगाली इत्यादि बिगर मराठी शाळा चालू होत आहेत.यातून प्रादेशिक वाद नकोय.पण मराठी भाषेचे, मराठी अस्मितेचे पुढे काय होणार?असा प्रश्न करून सुकृत खांडेकर म्हणाले,आपला मुलगा स्पर्धेत मागे पडू नये म्हणून घरोघरी दूध टाकणारे,पेपर टाकणारेदेखील आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत टाकण्यासाठी धडपडत आहेत. कॉलेज मधील मराठी विभाग बंद होत आहेत.असे झाले तर मग  मराठी भाषेचे संवर्धन कसे होणार? असा संतप्त सवाल करून ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांनी आता आत्मचिंतन करुन आवाज उठविण्याचे आवाहन केले.

   याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष नारायण पांचाळ म्हणाले, मराठी भाषा संवर्धन आणि समृद्धीसाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करु, पण पत्रकारावरील हल्ल्याच्या प्रश्नावर आम्ही सरकारने निश्चित निर्णय घेईपर्यंत कदापी गप्प बसणार नाही.        

      या प्रसंगी निर्भीड पत्रकार, उद्योगरत्न,समाजरत्न,   समाजवैभव पुरस्कार इत्यादी विविध क्षेत्रातील  उल्लेखनीय कार्य केलेल्या अशा एकूण ३४ मान्यवरांना ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर ,संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष नारायण पांचाळ व उपाध्यक्ष के.रविदादा तसेच संघटनेचे मुंबई अध्यक्ष राजेंद्र साळसकर आदीं मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 

प्रतिथयश उद्योजक संतोष गुजर,विलास त्रिंबककर,प्रसिद्ध वास्तू सल्लागार श्रीमती संगीता मिश्रा,प्रसिद्ध ऑथर मोटीव्हेशनल स्पीकर, करिअर काऊन्सिलर , माईंड अँड मेमरी ट्रेनर, डॉ.मनोहर भोईर, युनायटेड मराठी इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रेसिडेंट तसेच बेस्ट चेंबर ऑफ कॉमर्स पुरस्कार विजेता ॲड. शिवांगी झरकर, उदय पवार, विलास त्रिंबककर यांचा उद्योगरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

 इंग्रजी दैनिक स्प्राऊट्सचे संपादक उन्मेष गुजराथी, प्रसिध्द व्यंगचित्रकार प्रदिप म्हापसेकर, दै.प्रजासत्ताक जनताचे संपादक सूबोध शाक्यरत्न, पत्रकार काशी म्हादे, आनन शिंपी, रमेश चव्हाण, नामदेव काशीद, सोनल खानोलकर यांना निर्भिड पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले.

 नितीन कोलगे, अमोल टाकळे (रत्नागिरी) ,हणमंत कुंभार ,(सातारा ) दिपक घाडीगावकर (मुंबई) यांना समाजरत्न पुरस्काराने त्याचबरोबर विक्रम यादव, बॉम्बे ब्लड ग्रुप(सांगली) व सरिता नाईक, सारथी फाऊंडेशन, (भाईदर) आणि सोनिया गिल, परिवर्तन बालविकास संस्था(ठाणे), करिश्मा वैभव सावंत(मुंबई) स्वराज्य फाऊंडेशन आदि संस्थांना समाजवैभव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्र संचालन अमोल टाकळे  यांनी केले.  

 जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने देण्यात येणारा "उद्योग रत्न" पुरस्कार स्वीकारताना सुप्रसिध्द वास्तूशास्त्र सल्लागार श्रीमती संगीता मिश्रा.






 जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने देण्यात येणारा "उद्योग रत्न" पुरस्कार स्वीकारताना सुप्रसिध्द ऑथर मोटिव्हेशनल स्पीकर व करिअर काऊन्सिलर तसेच माईंड अँड मेमरी ट्रेनर डॉ.मनोहर भोईर हे दिसत आहेत.






जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने देण्यात येणारा "उद्योग रत्न" पुरस्कार स्वीकारताना युनायटेड मराठी इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रेसिडेंट तसेच बेस्ट चेंबर ऑफ कॉमर्स पुरस्कार विजेत्या ॲड. शिवांगी झरकर ह्या दिसत आहेत.





जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने देण्यात येणारा "समाज रत्न" पुरस्कार स्वीकारताना सोनिया गिल, परिवर्तन बालविकास संस्था (ठाणे),

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com