Top Post Ad

पश्चिम रेल्वेने जागा संपादित करण्यासाठी स्थानिकांची बैठक आयोजित करावी- राजन विचारे


 पश्चिम रेल्वेने भाईंदर पश्चिमेस पाचव्या व सहाव्या लाईनच्या मार्गीकेसाठी लागणाऱ्या जागे मधील बाधित होणाऱ्या स्माईल कॉम्प्लेक्स, तिरुपती कॉम्प्लेक्स, जैन मंदिर व बंगलो यांना जागा संपादित करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या विभागाकडून नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या त्या संदर्भात खासदार राजन विचारे यांनी स्थानिक नागरिक गेल्या अनेक वर्षापासून येथे राहत आहेत यासंदर्भात रेल्वेने कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी रेल्वे प्रशासन व तेथील नागरिक यांची माझ्या समवेत बैठक आयोजित करावी जेणेकरून त्यावर तोडगा निघू शकेल असे ठणकावून रेल्वे प्रशासनाला सांगितले.  पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापकांच्या दालनात आयोजित केलेल्या बैठकीत खासदार राजन विचारे यांनी मिरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानकाच्या विकासाचा पाढा वाचला

या बैठकीला खासदार राजन विचारे यांनी त्यांच्या लोकसभा मतदार संघातील मीरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानकांच्या प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या निदर्शनास आणून दिल्या. या बैठकीसाठी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा, मुख्य रेल्वे प्रबंधक नीरज वर्मा, व त्याचबरोबर MRVC व रेल्वेचे व रेल्वे पोलीस विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.या बैठकीदरम्यान खासदार राजन विचारे यांनी सर्वप्रथम कोविड काळातही आपला जीव धोक्यात घालून काम केलेले आहे त्या सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक केले. तसेच मिरा रोड व भाईंदर या रेल्वे स्थानकात प्रवाशांना एटीव्हीएम मशीन, तिकीट खिडकी तसेच रेल्वेच्या फेऱ्यात वाढ करण्यासाठी प्रयत्न करावे.

येणारा उन्हाळा लक्षात घेता प्रवाशांना थंडगार पाणी मिळवून देण्यासाठी फलाटावरती आरो प्लांट सुरू करावे. यावर रेल्वेने पिपीच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळत नाही असे सांगितले असता खासदार विचारे यांनी रेल्वे प्रशासनाला ही सुविधा जर कंपनी आपल्या फायद्यासाठी करत नसेल तर रेल्वेने स्वतः करावे पण प्रवाशांना सुविधा मिळवून द्याव्यात अशी जोरदार मागणी या बैठकीत केली. एमआरव्हीसी MUTP 3A च्या मार्फत मिरा रोड रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यासाठी पश्चिमेकडील असलेल्या जागेवर बोरीवली रेल्वे स्थानकातील धरतीवर एलिवेटेड फलाटांची लांबी व रुंदी वाढविण्याचे काम सुरू होणार आहे याची माहिती घेतली.

या मिरा रोड रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणामुळे मिरा रोड रहिवाशांना रेल्वे स्थानकातून लांब पल्ल्याच्या गाड्याही थांबा मिळू शकेल व प्रवाशांना बोरीवली रेल्वे स्थानकात जाण्यासाठी लागणारे श्रम व वेळेची बचत होईल. भाईंदर रेल्वे स्थानकात पश्चिमेकडे बालाजी नगर दिशेवरुन येण्या - जाणाऱ्या प्रवाशांसाठी अरुंद रस्त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. शौचालयासाठी जागा उपलब्ध नसल्याने रेल्वे प्रवासी उघड्या जागेवर लघु शंका करीत असतात. त्यामुळे त्या रस्त्यावरून महिलांना शरमेने मान खाली घालावी लागते. त्यामुळे अशा या ठिकाणी इ टॉयलेटची व्यवस्था करण्यासाठी नियोजन करावे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com