Top Post Ad

पुन्हा एकदा करेक्ट कार्यक्रमाला सुरुवात


 बाळासाहेब ठाकरे ह्यात असताना आणि त्यांच्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत २५ वर्षे युतीत राहिल्यानंतर या २५ वर्षात उध्दव ठाकरे आणि त्यांच्या समर्थक आमदार, त्यांच्यासोबत असलेले अधिकारी, कार्यकर्त्ये यांची माहिती भाजपाच्या करेक्ट कार्यक्रम टीमने गोळा करून ठेवली. ज्यावेळी उध्दव ठाकरे यांनी भाजपाची साथ सोडली त्यावेळी या टिमकडून त्या घोटाळ्यांची माहिती उघड करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे सुरुवातीला प्रताप सरनाईक, संजय राऊत, आनंदराव अडसूळ, भावना गवळी यांच्या करेक्ट कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर राहुल शेवाळे यांचेही एक प्रकरण मध्यंतरी उघडकीस आले. त्यावेळी शेवाळे यांनी शिंदे गटात सहभागी होणे पसंत केले. 

त्यामुळे ज्या पध्दतीने उध्दव ठाकरे यांचे कुटुंबियांवर संशयाच्या भोवरा फिरवण्यात आला. त्याच पध्दतीने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील व्यक्तींची माहिती सागर बंगल्यावर पोहोचवली गेली आहे. भविष्यात एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट जर भाजपापासून लांब जायला लागला तर याच घोटाळ्यातील कागदपत्रे बाहेर काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गटाचा करेक्ट कार्यक्रम करण्याची रणनीती सागर बंगल्यावर आखली गेली आहे. तसेच आता यामागे मंत्रीमंडळ विस्ताराचे कारणही असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या गटाने मंत्रीमंडळातील बऱ्याचशा जागा तशेच महामंडळातही अधिक जागा मागण्यास सुरुवात केली असल्याने हा करेक्ट कार्यक्रम हाती घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेतील नंबर दोनचे नेते राहिलेले विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारकीच्या काळातील तसेच  नगरविकास मंत्री म्हणून काम करत असतानाच्या काळात शिंदे यांच्या जवळच्या व्यक्तींनी आणि समर्थकांनी केलेल्या कामांची माहिती गोळा करण्यास भाजपाची टिम कामाला लागली असल्याची चर्चा मंत्रालयात सुरु झाली असून त्यासाठी भाजपाची खास टीम हा या करेक्ट कामगिरीवर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

मीरा-भाईंदरचे तत्कालीन आयुक्त बालाजी खतगांवकर यांनी पालिकेच्या सेवेत असलेल्या एका कंत्राटी इंजिनिअरला कायम करतो असे सांगत शिवसेनेच्या माजी राज्यमंत्र्यांच्या एका पीए मार्फत ७ लाख रूपये घेतल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्या प्रकरणाची लोकायुक्तांसमोर सुनावणी झाली. तरीही बालाजी खतगांवकर यांच्यावर नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी त्याच्यावर कारवाई कऱण्याऐवजी त्याला ताफ्यात समाविष्ट केले. या व अशा अनेक कामगिरींची माहिती भाजपची खास टीम जमवत आहे. 

एमएमआरडीएच्या मेट्रो-६ प्रकल्पातील १३५ प्रकल्पबाधितांच्या बोगस नावांचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या प्रकल्पात सहभागी असलेल्या दलालांची शोधमोहिम करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या टीमने सुरु केली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे समर्थक गटात सध्या सहभागी झालेल्या काही मुंबईतील आमदारांच्या आणि मंत्र्याशी संबधित असल्याची माहिती पुढे येत आहे. याशिवाय ठाणे जिल्ह्यातील विविध महानगरपालिका आणि रिअल इस्टेटमधील काही म्होरक्यांची आणि त्यासाठी मदत करणाऱ्या लोकांची यादी तयार करण्याचे कामही या टीमकडून करण्यात येत आहे. त्यामध्ये पूर्वी एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात असलेले मात्र त्यांच्यातील हेवेदाव्यामुळे दुखावलेले अनेक जण सध्या सागर बंगल्याच्या संपर्कात येत असल्याचे दिसून येत असून या दुखावलेल्या व्यक्तींकडूनच अनेकदा सागर बंगल्यावर घोटाळ्याची कागदपत्रे पोहोचविली जात असल्याची चर्चा रंगली आहे.

विशेष म्हणजे यासह अनेक महत्वाच्या घोटाळ्यातील आणि व्यक्तींची नावे, समृध्दी महामार्ग घोटाळ्यातील काही कागदपत्रेही भाजपा नेत्याच्या सागर बंगल्यावर पोहोचविली गेले असून त्यातून कमाविण्यात आलेल्या पैशांची माहितीही या टीम कडून गोळा करण्यात येत आहे.  त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आणि प्रशासनावर घट्ट पकड केली असून त्यांच्याच आदेशानुसार सरकार सध्या निर्णय घेत असल्याचे सांगण्यात कुजबूज मंत्रालयात सुरु झाली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com