Top Post Ad

गुंडांमार्फत जुन्या शाखा बळकावण्याचे षडयंत्र ?


  आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शाखा बळकावणाऱ्या मिंढे गटाला योग्य समज द्यावी तसेच समाजामध्ये कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी याची दक्षता घ्यावी अशी मागणी ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांना पत्राद्वारे करण्यात आली त्यावेळी खासदार राजन विचारे, लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, सचिव संजीव कुलकर्णी, ठाणे युवा सेना अधिकारी किरण जाधव, सहप्रवक्ता तुषार रसाळ, चंद्रभान आझाद, महिला आघाडी रेखा खोपकर, समिधा मोहिते, महेश्वरी तरे, विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रमिला भांगे, वैशाली शिंदे, उप शहर  संघटक भारती गायकवाड इत्यादी उपस्थित होते.

मी अधिकृतपणे सांगतो आम्ही कुठल्याही संपत्तीवर दावा करणार नाही. कायद्यानुसार शिवसेना विधीमंडळ कार्यालय आम्हाला मिळालं, निवडणूक आयोगाचा निर्णय मेरिटवर झालाय. त्यावर आक्षेप घेणे चूक आहे. आम्ही शिवसेना आहोत. त्यामुळेच आम्ही विधीमंडळाचे कार्यालय ताब्यात घेतले. मात्र कोणत्याही मालमत्तेवर, प्रॉपर्टीवर आम्हाला दावा करायचा नाही. आम्हाला कोणत्या गोष्टीचा मोह नाही. आम्ही कोणत्याही मालमत्तेवर दावा करणार नाही असं विधान एकनाथ शिंदे यांनी पुणे येथे एका कार्यक्रमात केले. मात्र जुन्या शिवसेना शाखांचा ताबा घेण्याचे कारस्थान सुरु झाले असल्याचे निदर्शनास येताच ठाण्यामध्ये या विरोधात मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. 

ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांना दिलेल्या पत्रामध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासून ५६ वर्षामध्ये महाराष्ट्रात अनेक शिवसेना शाखा व कार्यालये सुरु आहेत. त्यापैकी ठाण्यामध्ये हि गेल्या अनेक वर्षापासून ठाणे शहराच्या विविध भागामध्ये शिवसेनेच्या कार्यालये (शाखा) कार्यान्वयित आहेत. त्यापैकी काही शाखांची मालकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे तर काही पक्ष कार्यालायची मालकी खाजगी मालमत्ता धारकांकडे असून सदर मालमत्तेचा ताबा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे. असे असताना सुद्धा मिंधे गटाकडून सातत्याने जोर जबरदस्तीने पोलीस बळाचा वापर करून पक्ष कार्यालये (शाखा) बळकावण्यात आलेल्या आहेत. 

पक्षाशी द्रोह करण्याऱ्या गटाच्या पात्र अपात्रतेचा व नुकताच निवडणूक आयोगाने चुकीच्या घेतलेल्या निर्णयाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख मा.  बाळासाहेब ठाकरे यांनी उद्घाटन केलेल्या जुन्या शाखा बळकावण्याचे षडयंत्र गुंडांमार्फत रचले जात आहेत. समाजामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मिंधे गटाला पोलीस यंत्रणेने प्रोत्साहन न देता   योग्य समज द्यावी. अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी मिंधे गटाची व पोलीस खात्याची राहील असे पत्रामध्ये म्हंटले आहे.

----------------------------------------------


शिवसैनिकांना का म्हणाले होते बाळासाहेब...
जसं मला सांभाळले तसं उद्धव आणि आदित्य ला सांभाळा... याच उत्तर आज मिळालं!
त्यांनी शेवटचा आदेश शिवसैनिकांना दिला,आमदार खासदार यांना हा आदेश का नाही दिला..?याच उत्तर आज मिळालं.
दैवी पुरुष असणाऱ्या बाळासाहेबांना माहीत होतं... आपल्या पाठीमागे आपलेच काही गद्दार आमदार आणि नेते हे सत्तेसाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना एकटे पाडतील...
त्यांना माहीत होतं शिवसेना हा पक्ष भाजपच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न होईल तेव्हा उद्धव ठाकरे यांना एकाकी पाडलं जाईल...शिवसेनेच्या जोरावर पैसा कमावलेले ,ठेकेदार झालेले आमदार,नगरसेवक स्वतःला पक्षा पेक्षा मोठं समजतील...घरातील माणसं देखील विरोधात जातील..
कारण,शिवसेना हा विचार पुढे नेताना दिल्ली समोर झुकायचे नाही ही शिकवण फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे हेच पाळताना दिसत होते... शिवसेनेचा खरा शत्रू हा भाजप आहे.त्यांचा सेनेच्या मतांवर डोळा आहे.काँग्रेस राष्ट्रवादी हे शिवसेनेची मते घेऊ शकत नाहीत ती हिंदुत्ववादी मते फोडण्याचे काम भाजप करेल...म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना साद घालत शिवसैनिकांवर जबाबदारी टाकली होती...उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना साथ दया...!
ते असं म्हणाले नाहीत आमदारांना साथ दया...ते असं म्हणाले नाहीत भाजपला साथ द्या! त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सोबत राहण्याची ही जबाबदारी आमदार आणि नेत्यांवर दिली नाही तर ही जबाबदारी त्यांनी सामान्य शिवसैनिकांवर दिली...
आज बाळासाहेब ठाकरे यांचा शेवटचा आदेश पाळण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे.
चला संपूर्ण देशाला आणि बीजेपीला दाखवून देऊया...हा मराठी माणूस,बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक हा फक्त आणि फक्त बाळासाहेबांचा आदेश पाळतो...
भलेही नेते गेले...,भाजपने पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिले असेल...पण शिवसैनिक मातोश्री सोबत प्रामाणिक राहील आणि या गद्दारांना त्यांची जागा दाखवेल!
काही झालं तरी बाळासाहेबांचा शेवटचा शब्द पडू द्यायचा नाही, शेवटचा आदेश तंतोतंत पाळायचा ही जबाबदारी आपली शिवसैनिकांची आहे!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com