Top Post Ad

मराठी भाषा दिन साजरा करणारे भामटे ?

 

   महाराष्ट्र राज्याच्या राजधानीत मराठी माणसाचे व मराठीचे भाषेचे ह्रदय सम्राट यांनी त्यांच्या मनसे सैनिकाकडून मराठी भाषा दिन खूप उत्स्फूर्तपणे रोडवर स्टेज बांधून साजरा करत होते. काहींना त्यांचे खूप कौतुक वाटत होते. तर तेव्हा माझा सारख्यांना खूप दुःख वाटत होते.या भामट्यांना मराठी भाषा दिनाचा एवढा मनापासून आदर असता तर यांनी मुंबईतील महानगरपालिकेच्या मराठी शाळा बंद पडू दिला असत्या काय?. कारण या महानगरपालिकेच्या मराठी शाळेत बहुसंख्येने मराठी भाषा बोलणाऱ्या मराठी माणसांची मूलमुलीच शिकत होती नां!.परंतु ती संपूर्ण मराठा, मागासवर्गीय समाजातील विद्यार्थी होते म्हणून यांनी महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केले नाही. असे लिहले तर चुकीचे ठरणार नाही. बाकीच्या वेळी कानाखाली खाल्ल्याळ खटाक आवाज काढणारे मानसिक वैचारिक गुलाम सैनिक मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या मराठी शाळा बंद केल्या तेव्हा कोणत्या बिळात बंद होते. हे जाहीरपणे विचारण्याची हिंमत मुंबईत मराठी माणसात,पत्रकार,संपादकात राहिली आहे काय?.

      महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पाडण्यात येत आहेत. आणि गांवागांवात इंग्रजी माध्यमाच्या प्री प्रायमेरी के जी,सिनियर के जी शाळा भांडवलदारी उद्योग सुरू करण्यात आले आहेत.ते माय मराठी भाषा व माणसाला मारून इंग्रजी भाषेच्या मॉमचे गोड कौतुक करून स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. त्यामुळेच ग्रामीण भागातील मातृभाषा मराठी गुन्हेगार ठरविली जात आहे. यांची जाणीव मराठी भाषा व मराठी माणसाच्या ह्रदय सम्राटांना त्यांचे मनसे सैनिकांना नाही काय?. भारत माता की जय म्हणणारे कसे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात हे मराठी हिंदूंना कसे काय दिसत नाही.

      साडेतीन टक्के लोक जी तथाकथित प्रमाण मराठी भाषा बोलतात त्या भाषेने अस्सल मराठी बोली भाषेला जवळजवळ संपवलेच आहे. पाठ्यपुस्तकांतील प्रमाण भाषेमुळे वर्‍हाडी,झाडी, अहीराणी,माणदेशी,नागपूरी,कोष्टी,वंजारी भाषेसह तर अनेक बोलीभाषा आता केवळ घराच्या भिंतीआड बोलल्या जाणाऱ्या भाषा तेवढ्या शिल्लक आहेत. त्याचं बोली भाषेत सर्वांसमोर बोलले तर याचं मराठी भाषा दिनाचे गोडवे गाणाऱ्यांच्या तोडून त्याला गावठी म्हटल्या जाते.तरीही आम्हाला ब्राह्मणी प्रमाण मराठी भाषेचा अभिमान बाळगायला सांगितले जाते.असे सांगणाऱ्या सर्व राजकारण्यांची,  सनातन्यांची मुले मात्र विदेशात शिकत आहेत.

      महाराष्ट्रात मुंबई,पुणे,नाशिक,मनमाड,औरंगाबाद नागपूर जिथे जिथे सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे जेव्हा जेव्हा शाळा, कॉलेजच्या विरोधात आंदोलने झाली तेव्हा तेव्हा तिथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुढे आली.मराठी भाषा असणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांना राज्य व केंद्रांच्या शैक्षणिक सवलती बंद करण्यात आल्यावर तेव्हा मराठी भाषा दिनाचे गर्व सांगणारे मराठी ह्रदय सम्राट त्यांच्या संघटना आणि यांचे वैचारिक गुलाम सैनिक मराठी भाषा असणाऱ्या मराठा,मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या पालकांच्या सोबत उभे राहिले नाही.मुंबई,पुणे,औरंगाबाद,नागपूर नाशिक येथे शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील येणाऱ्या विद्यार्थ्यांना काय वागणूक दिली जाते. यांचा कधी कोणी विचार केला आहे काय?. मराठी भाषा बोलण्यात आणि लिहण्यात फरक असला की ग्रामीण भागातील विद्यार्थी नापास होतो.कारण पेपर तपासणारे शुद्ध मराठी बोलणारे असतात.

    मराठी भाषा गौरव दिन व राज्यभाषा मराठी दिन "महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४" नुसार महाराष्ट्र राज्याची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे घोषित झाले. "मराठी भाषा गौरव दिन" दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे जेष्ठ कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी १९१२ जन्म झाला होता.यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी २०१३ रोजी रोजी घेण्यात आला.

     मराठी राजभाषा दिन,मराठी दिन हा १ मे रोजी साजरा करण्यात येतो. १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्या दिवसापासून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला. म्हणून १९९७ पासून १ मे हा दिवस 'राजभाषा मराठी दिन'म्हणून साजरा करण्यात यावा असा शासनाने निर्णय घेतला. दिनांक १० एप्रिल १९९७ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाद्वारे हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्यातील मराठी भाषा आणि मराठी माणसावर प्रेम व्यक्त करण्याची यांची पद्धत समजून घेतले पाहिजे. म्हणजे महाराष्ट्र राज्याची मराठी भाषा हे कुसुमाग्रजांच्या जन्मापासून झाली. ते सर्व देश मान्य करतो मग महाराष्ट्राचा जाणता राजा शिवछत्रपती यांची जन्म तारीख तीस बत्तीस वर्षांनी इतिहास संशोधक विचारवंत्यांच्या समितीनी १९ फेब्रुवारी हीच रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करावी असा महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाद्वारे हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला होता तो अजूनही मराठी भाषा आणि मराठी माणसांचे हृदय सम्राट आणि त्यांचे वैचारिक गुलाम सैनिक शासन निर्णय मान्य का करीत नाही?.

    छत्रपती शिवाजी महाराज मराठी नव्हते काय?. त्यांची भाषा मराठी नव्हती काय?.त्यांच्या नंतर महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले,भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे,जेधे,जवळकर हे मराठी माणसं नव्हते त्यांची भाषा मराठी नव्हती?. राजर्षी शाहू महाराज,   डॉ.बाबासाहेब आंबेडकर,डॉ.पंजाबराव देशमुख हे मराठी माणसं नव्हती काय?. त्यांची भाषा मराठी नव्हती काय?. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले असे खूप गौरवाने सांगितले जाते. त्यांनी आपल्या मातृभाषेला गौरव प्राप्त करून दिला असे म्हटले जाते.परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात मराठी मातृभाषा वापरल्या जात होती असे इतिहास सांगतो.

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी रशियात छत्रपती शिवाजी महाराज पोवाडा व गिरणी कामगारांच्या जीवनावरील "माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होते कायली" लावणी किंवा फकडं कोणत्या भाषेत गायिली होती.शाहीर अमर शेख,शाहीर गवाणकर,शाहीर साबळे संयुक्त महाराष्ट्र सत्याग्रह आंदोलने यात जनजागृती करणारी भाषा मराठीच होती. व प्रबोधनकार ठाकरे यांची भाषा मराठीच होती म्हणजे हल्ली मराठी भाषा दिन साजरा करणारे भामटे ?. खरा इतिहास लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्र राज्य व मराठी,मराठी भाषा आणि मराठी माणूस जातीमुळे गौरविण्यात येतो. आता तरी महाराष्ट्रातील मराठी माणसाने जागे झाले पाहिजे,मराठी भाषा मराठी शाळा वाचल्या तर मराठी माणूस वाचेल अन्यता महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी माणूस उपरा ठरणार आहे.मराठी भाषा दिन साजरा करणारे भामटे ?. परप्रांतीय बिल्डर,ठेकेदार भांडवलदार यांना मदत करून आपल्याच घरादारावर जेसीबीचा नांगर फिरवतील. मराठी माणसा जागा हो छत्रपतीचा मावळा हो!. जात,धर्म,पंथ विसरून स्वराज्य निर्माण करण्याचा धागा हो. आज महाराष्ट्र राज्यात जे राजकारण सुरू आहे, ते भविष्यात मराठी माणसाच्या महाराष्ट्र राज्याला काय वागणूक देतील यांचा अंदाज मांडणे खूप चिंताजनक असेल एवढे मात्र शंभर टक्के सत्य आहे.

  • सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९.भांडुप मुंबई, 
  • अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना, संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न M-8108658970
click here 👉- join Our WhatsApp group:
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com