त्याने (अदानी) एक दुकान घेतले, दुकानाची किंमत 20 लाख आहे, पण त्याने बँकेला दाखवले की, माझ्या दुकानाची किंमत 20 कोटी आहे.. तिथे रोजचे एक कोटी उत्पन्न आहे. या मूल्यावर बँकेने त्याला 10 कोटींचे कर्ज दिले. नंतर त्याने पैसे दिलेच नाहीत. बँकेने दुकान विकले असते तरी 20 लाखच मिळाले असते, त्याला 9.80 कोटी मिळाले. बँक कोर्टात जाईल...दावा ठोकेल की, बॅंकेची फसवणूक झाली..मग तो (अदानी) म्हणेल की, ही बँकेची चूक होती.. त्यांनी चौकशी करायला हवी होती... तपास 30-40 वर्षे चालेल, मग अदानी 100 वर्षांचा होईल.
अदानीमुळे बँक कोसळल्यावर भारतीय जनतेची आयुष्यभराची कमाई स्वाहा होऊन जाईल. बँकेत खाते व ठेव सर्व जनतेची असते...बॅंक जनतेच्या ठेवीचे व्याज पैसे कर्जाच्या व्याजावरुन देते... घरून देत नाही. तुम्ही आयुष्यभर जे पैसे कमावले आहे, त्याच पैशासाठी तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. या अशा घोटाळ्यांमुळे मोदी सरकारमध्येच अनेक बँका बुडाल्या आहेत. नीरव मोदी,चोकसी सारखे अनेक बॅंक बुडवे सरळसरळ भाजपाचे नाव घेऊन सांगतात की,भाजपच्या सर्व लोकांनी कमिशन घेऊन मला कर्ज मिळवून दिले होते...
अदानीला अनेक बँकांनी २ लाख कोटींचे कर्जही दिले आहे. ज्यामध्ये SBI, बँक ऑफ बडोदा हे प्रमुख आहेत. आजपर्यंतच्या ६५ वर्षांच्या इतिहासात एलआयसीने एक रुपयाही गमावला नव्हता. पण आज पहिल्यांदाच LIC ला 24 तासात 18 हजार कोटींचा तोटा झाला आहे, कारण LIC ने मोदी या महापुरुषाच्या आदेशानुसार अदानी कंपनीत 74 हजार कोटींची गुंतवणूक केली होती. भारतीय बॅंकाकडून भरमसाठ २ लाख कोटी कर्ज घेणारा भारतातील सर्वात श्रीमंत कसा होऊ शकतो...कर्जदार हा तर भिकारी व याचक तो श्रीमंत कसा ठरवला जाऊ शकतो... मिडिया व सरकार जाणूनबुजून मुद्दामहून हे घडवून आणतंय... देशातील जनतेचा पैसा एकाच माणसाला देऊन त्यात टक्केवारी ,कमीशन खाऊन देशात कृत्रिम महागाई निर्माण करुन सरकार जनतेला होरपोळून काढतेय...
सावधान भाजपा व मोदी देश विकायच्या तयारीत...देश कंगाल होण्याच्या अवस्थेत जातोय...सावध व्हा... आण्णा हजारे आंदोलन, बाबा रामदेव व ईव्हीएम या जोरावर भाजपाने मस्तमौल सरकार बनवलेत...
-----------------------------
"२००२ ची गुजराथ दंगल असो अथवा असो, अदानी समुहाची 'पोलखोल'... या सगळ्यासाठी विदेशी-मिडीयाला मरमर मेहनत घेऊन जातिवंत 'शोधपत्रिके'द्वारे रहस्यभेद करावे लागतात...!!!" मग, भारतातला 'मिडीया' (राणा अय्यूब, आकार पटेल, रवीशकुमार, द वायर, द हिंदू, दीपक शर्मा, अशोक वानखेडे यासारखे सन्माननीय अपवाद वगळता) काय झोपा काढतोय की, सरकारी-जाहिरातबाजीच्या पैशाचा मादक धूर हुंगत शरीर ताणून तो पहुडलाय? भारतीय 'गोदी-मिडीया'वाले अयोध्येच्या राममंदिरात 'टाळ्या' वाजवायला गेलेत की, 'करोना'ची नवी लाट रोखण्यासाठी 'थाळ्या' वाजवायला?? ...या सगळ्यांनाच, विशेषतः अर्णव गोस्वामी, रजत शर्मा, नाविकाकुमार सारख्या मेंदू राजरोस भाड्याने देणार्या पत्रकार-संपादकांना थोडीतरी 'जनाची नाही तर, निदान मनाची' लाज वाटली पाहीजे!
या सगळ्यांपेक्षा कामाठीपुरा-फोरासरोडवरच्या वेश्या खूपच बर्या! त्या फक्त, त्यांचा 'देह' विकतात... सत्ताधारी 'भाजपाई' लोकांच्या इशाऱ्यावर नाचणार्या, या सगळ्या बेईमानी लोकांसारखा टीव्हीवर 'हिंदू-मुस्लिम' करत अथवा 'हिंदुत्वा'ची नौटंकी करत... मेंदूसकट 'देश' विकत नाहीत !!!...जाता जाता, "जे राजकीय 'नेते' या सगळ्या विदेशी संस्थांनी केलेल्या पोलखोलबाबत सुस्पष्टपणे रोखठोक भूमिका घेत, मोदी-अदानींवर टीकास्त्र सोडत तुटून पडतील (उदा. राहुल गांधींसारखे) ते जातिवंत 'नेते'... बाकी, मूग गिळून रहाणारे इतर कुणीही, हे 'अभिनेते'..." ही खूणगाठ भारतीय जनतेनं मनात बांधून ठेवावी!
...राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)
--------------------------------
नाथन अँडरसन आणि त्याच्या हिंडेंनबर्गमधील टीमने खूप संशोधन केले. खूप चांगली आकडेमोड आणि विश्लेषण केले; म्हणून, फक्त अदानी समुहातील कंपन्यांचे शेअर्स कोसळले नाहीत... तो एक भाग झाला. बौद्धिक/चमकदार विश्लेषण तर, अनेकजण करतात... त्याचा कोठे दरवेळी इम्पॅक्ट पडतो? अदानी समूहाच्या शेअर्स/रोख्यांना शॉर्ट करुन विकण्याची वित्तीय ताकद हिंडेंनबर्ग हेज फंडाकडे आहे. उद्या हिंडेंनबर्ग फंडाची बेट उलटी पडली म्हणजे, शेअर्स फारसे पडले नाहीत; तर, त्यातून येणारे नुकसान सोसायची जोखीम क्षमता आहे. यामुळे शेअर्स पडत आहेत/पडतील, फक्त बौद्धिक विश्लेषणाने नाही पडणार! अँडरसनने फक्त खूप चांगला 'इक्विटी-रिपोर्ट' लिहिला असता; तर, अदानीने त्याला कचऱ्याच्या कुंडीत किंवा श्रेडरमध्ये घातले असते. त्या रिपोर्टला असणाऱ्या हेज फंडाच्या बँकिंगमुळे अदानी नर्व्हस आहे.
तरुण मित्रांनो,
कोणत्याही क्षेत्रात रहा, नुसता अभ्यास/नुसत्या भूमिका/नुसत्या चर्चा एवढ्यातच मर्यादित रिंगणात राहू नका! तुमच्या विचारांच्या मागे भौतिक ताकद कशी उभी राहील, हेसुद्धा बघा... इतर देणार नाहीत तर, सर्व प्रकारची भौतिक ताकद कमवा !!!
....संजीव चांदोरकर (२८ जानेवारी-२०२३)
0 टिप्पण्या