माझ्या प्रिय भावंडांनो,
खाली एक यादी देत आहे , ती वेळ काढून शांतपणे वाचावी ,आपले डोळे उघडावेत ,ज्यांचे उघडले आहेत त्यांनी याबाबत काही हालचाल करावी, कोणत्याही जाती धर्म किंवा प्रांत या बाबत माझ्या मनात कसलेच किल्मिश नाही ,सत्य झाकता येत नाही म्हणून प्रांताच्या नावाचा उल्लेख आला आहे !! आता आपण यादी पाहू, ही यादी गुन्हेगारांची यादी आहे ,पण यांच्या हातात चाकु ,तलवारी ,बंदुका किंवा बॉम्ब नाहीत. हे 'सुशिक्षित' आहेत ' सुसंकृत' गुन्हेगार आहेत !! या लोकांनी दिवसाढवळ्या आपल्या देशाच्या तिजोरीवर दरोडा टाकला आहे .
सन्नी कारला
आरती कारला
संजय कारला
वर्षां कारला
सुधीर कारला
जतीन मेहता
उमेश पारीख
कमलेश पारीख
निलेश पारीख
विनय मित्तल
एकलव्य गर्ग
चेतन जयंतीलाल
नितीन जयंतीलाल
विनय मित्तल
दीप्ती चेतन
साविया शेठ
राजीव गोयल
अलका गोयल
ललित मोदी
रितेश जैन
हितेश पटेल
मयुरिबेन पटेल
आशिष भाई
मेहुल चॉकशी
निरव मोदी
निशाण मोदी
पुष्पेश बैडिया
आशिष जोबानपुरा
विजय मल्ल्या
हे ऐकूण 28 लोक आहेत काळाच्या ओघात यात अजूनही भर पडली असेल, परंतु याच लोकांच्या भाऊबांधाकडे मेडिया गहाण पडला असल्याने ,आपल्याला बाकी नावे कळणार सुद्धा नाहीत ,फक्त अदानी चे नाव अलीकडे चर्चेत आहे .
यांनी देशाचे म्हणजे सामान्य माणसांचे एकूण 10,00,000 कोटी रुपये लुटले असून हे पळून गेले आहेत .
या लोकांची काही खास वैशिष्ट्ये आहेत
* यातला विजय मल्ल्या सोडता बाकी सगळे गुजराथी आहेत
* यातला एकही sc/st /Nt/vjnt /OBC नाही
*यातला एकही शेतकरी /कामगार /कारागीर /छोटा व्यापारी किंवा नोकरदार नाही
*यातला एकही मुस्लिम /ख्रिस्ती /बौद्ध/शीख वगैरे नाही
* यातला कुणीही अर्बन नक्षल /खलिस्तानी नाही
खरे तर हे लोक आहेत तरी कोण??आणि एवढा मोठा दरोडा टाकून हे बाहेर उजळ माथ्याने फिरतात तरी कसे ??
कारण सोपे आहे ,यांनी संसदे पासून ग्रामपंचायत पर्यन्तच्या सगळ्या यंत्रणा विकत घेतल्या आहेत!!काही सन्माननीय अपवाद वगळता विरोधी पक्ष रस्त्यावर उतरत नाही, म्हणजे पाणी खूप खोलात मुरले आहे !!
आज हे लिहण्याचे पहिले कारण म्हणजे , दिवसा देश लुटला जात असताना, भारतमातेच्या देशभक्तीचे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले देशभक्त चिडीचूप बसले आहेत , मुंबईत एक सत्यवादी देशभक्त आहेत त्यांचे नाव किरीट सोमया आहे!!! .आपल्या गुजराथी बांधवांबाबत ते चकार शब्द सुद्धा काढत नाहीत. !!!
दुसरं कारण म्हणजे या सगळ्यांचा मुंबईशी संबंध आहे , उलट मुंबईत यांचेच आर्थिक साम्राज्य आहे , त्यांनी आता स्वतःच्या नव्या वसाहती वसविल्या आहेत ,त्यांच्या विभागात घर सुद्धा जात, धर्म आणि भाषा विचारून देतात , मुसलमान , ख्रिस्ती, दलित यांना तर उघड अघोषित बंदी आहे, बाकी जातीच्या लोकांना आपला शाखाहार सिद्ध करावा लागतो. या लोकांना आता उघडपणे मुंबई ताब्यात हवी आहे म्हणून ते वाट्टेल तेवढे पैसे ओतायला तयार आहेत. उद्याच्या त्यांच्या हिंदूराष्ट्रात त्यांना भारताची आर्थिक राजधानी असलेले आंतरराष्ट्रीय व्यापारी केन्द्र म्हणून मराठी मुंबई नव्हे तर हिंदुराष्ट्रवादी गुजराथी मुंबई कब्जात हवी आहे ।
संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली तेव्हाच काँग्रेच्या आडून मोरारजी देसाईंचा मुंबईला गुजराथ ची राजधानी करण्याचा इरादा होता, पण मुंबईचा मराठी कामगार लढला , 106 हुतात्म्यांचे रक्त वाहिले, साम्यवादी समाजवादी आणि आंबेडकरवादी एकत्र लढले म्हणून मुंबई वाचली पण पुढे हे सगळे एकमेकांच्या उरावर बसले !काही तर चक्क काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसले आणि मराठी मुंबईच्या मोकळ्या रानात मराठीच्या नावाचा गजर करत एक फॅसिस्ट शक्ती वाढू लागली ,तोंडाने मराठी माणसाचा जप आणि हाताने मराठी कामगार चळवळीचा खातमा,कामगार नेत्यांचे खून,गुजराथी शेठ लोकांकडून protaction money घेऊन गिरण कामागरांची वाट लावली ,दलित आणि मुसलमान यांच्या विरुद्ध दंगली करून ही शक्ती आंधळेपणाने संघपरिवारात सामील झाली!! आज संघपरिवाराच्या गद्दारीने त्यांना जाग आली आणि ते लोकशाही आणि संविधानाचे नाव घेऊ लागले आहेत , पण या नादात त्यांनी मुंबईवरील आपली सत्ता अर्धी अधिक गमावली आहे !!
मोरारजी भाईंचा त्या काळात इरादा होता,मुंबई गुजरातमध्ये सामील करण्याचा , त्यांना मुंबई महाराष्ट्राला द्यायची नव्हती !! आज देशावर गुजराथी राज्य आलं आहे ,त्यांच्या मनात सुद्धा तोच डाव आहे ,मुंबई जरी गुजरातला देता आली नाही ,तरी त्यांना ती केंद्रशासित करायची आहे, म्हणून मुंबईतील गुजराथी व्यापारी लोकांचा डोळा मुंबई महानगर पालिकेवर आहे !!
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत ,देश विकून झाल्यावर आता या गुजराथी सत्ताधार्यांना मुंबईचा घास घ्यायचा आहे ,शिवसेना फोडली आहे ,आंबेडकरवाद्यांची मतदार शक्ती जरी या शहरात असली तरी ती एकत्र नाही ,समाजवादी औषधाला उरले नाहीत ,साम्यवादी लोकांची फक्त कार्यालये कशीतरी उभी आहेत ,प्रचंड पैसा असल्याने हे फॅसिस्ट देशभरात आमदार विकत घेतात, राज्य सरकारे पाडतात, तिथे गरीब मतदारांना विकत घ्यायला किती वेळ लागणार आहे ??आणि काहीच जमले नाही तर EVM चा घोटाळा तर करूच शकतात !!!म्हणून या पैसे लुटून पळून जाणाऱ्या गुजराथी दलाल भांडवलदारांना विसरू नका, यांना एव्हडे पैसे दिले कुणी ??तर देणारेही दोन गुजराथी आणि ते पैसे घेऊन, बुडवून, पळून जाणारे सुद्धा गुजराथीच आहेत म्हणून याना विसरू नका !!यादी पुन्हा वाचा ,निवडणुकीच्या काळात हेच पैसे वापरले जाणार आहेत !!
-sambhaji bhagat
0 टिप्पण्या