Top Post Ad

कामगार, शेतकरी मेला तरी चालेल उद्योगपती जगला पाहिजे!

 


    भारतातील कामगारंची आणि शेतकऱ्याची फार वाईट परिस्थिती आहे.आई जेवण घालत नाही.आणि बाप भीक मागु देत नाही.मायबाप सरकारच काय करावे याचा मोठ्ठा पेच पडलाय कामगारांना व शेतकऱ्यांना! काँग्रेस हे भांडवदाराचे सरकार आहे.ते गोरगरीब शेतकऱ्याला मजुरांना सुखाने जगू देत नाही.यांना सत्तेतुन घालविल्या शिवाय शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार नाही.हे बेबीच्या देठा पासुन ओरडुन सांगणारे राज्यातील देवेन्द्र फडणवीस साहेब आणि देशभर शेपन्न इंच छाती फुगवुन सांगणारे नरेंद्र मोदी यांना आता काय कठीण वाटत आहे ते देशातील तमाम कामगार कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना समजण्या पलीकडे झाले आहे.तेव्हा काँग्रेस ही काही भाजप शिवसेने सारखी ज्वलंत हिंदुत्व वादी नव्हती. 

सर्वधर्म समभाव मानणारी होती.म्हणुन शेतकऱ्याची कृषीउत्पन्न बाजार समितीत हिंदुत्ववादी शेतकऱ्यांची प्रचंड लुटमारी होत होती.त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोसायटी कर्जाचा डोंगर कमी होण्या ऐवजी वाढत होता.तेव्हा दुष्काळ जाहीर करण्यासाठी गर्वसे कहो म्हणणारे तालुका,जिल्हा सिंह गर्जना करून हालवून ठेवत होते.आता त्यांना मंदिराबाहेर हिंदुत्ववादी शेतकरी,कर्जबाजारी शेतकरी दिसत नाही.त्यामुळे दुष्काळ जाहीर करायचा प्रश्नच उद्धभवत नाही. तेव्हा विहिरींना पाणी नव्हते.आता पाणीच पाणी आहे विहीरीला,तेव्हा लाईट नव्हती आणि लाईटबील मात्र वेळेवर येत होतो. आता भरपूर लाईट आहे.त्यामुळे लाईटबिल वेळच्या वेळेला येत नाही.तेव्हा काँग्रेस सह सर्वच पक्षाच्या नेत्यांचे डोळे फुटले होत.कान बहिरे झाले होते.त्यांची वाचा गेली होती.कारण त्यांनी ज्वलंत हिंदुत्ववादी कामगारंचे व शेतकऱ्यांचे कोणतेच दुःख दिसत नव्हते.तेव्हा राज्य व केंद्र साकारलं पाझर फुटत नव्हता. आताचे राज्य आणि केंद्र सरकार किती दयाळू आहे पहा. 

     किती गरीब कष्टकरी उधोगपतीनां कर्ज माफ केले.विजय मल्ल्या सारख्या गरीब माणसाला नऊ हजार करोड रुपये कर्ज बुडवून परदेशात गेला.काही केले नाही सरकार आणखी किती संस्कारीत माणस सत्ताधारी पाहिजे.शेतकऱ्यांना कर्ज देतांना सातबारा आणि ओळखीचे दोन जामीनदार लागतात.तेव्हा बँक अधिकारी कर्ज पास करता.मग विजय मल्ल्याला कर्ज देतांना कोणते कागद पत्र आणि जामीनदार घेतले?.ते ते सरकार आणि हे सरकार का नाही जाहीर करत?.हिंदुत्ववादी शेतकऱ्यांच्या थकबाकीची माहिती जामीनदारांच्या नांवा सह वृत्तपत्रात जाहिरात देऊन जनतेला सांगितल्या जाते.मग हया बँक अधिकाऱ्यांच्या गुणवंत कर्तबदारीचे जाहीरपणे मूल्यमाफन का होत नाही.शेतकऱ्यांना कर्ज देणाऱ्या अधिकाऱ्यांना वेगळा न्याय आणि गरीब उधोगपतीनां कर्ज देणाऱ्या अधिकाऱ्यांना वेगळा न्याय का?.कोणाची जात धर्म आडवा येतो?.तिथे ज्वलंत हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीय लागु होत नाही काय?.सरकारकडे पैसा नाही शेतकऱ्यांच्या कर्ज माफीला.पण भारतातील 400 रेल्वे स्टेशन वर फ्री वाय फाय सेवा देण्यासाठी सरकारने गूगल सोबत साडेचार लाख कोटी रुपयांचा करार केला आहे.शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला ७६ हजार कोटी नाहीत आणि वाय फाय साठी साडेचार लाख कोटी आहेत.माणसाला जगायला "भाकरी " पाहिजे कि वाय फाय ?.

     देशातील सर्व सरकारी नोकऱ्या हया नागरिकांची सेवा करण्यासाठी असतात.त्या उत्पादन करणाऱ्या कंपन्या,कारखाने नाहीत.तरी त्यांना दरवर्षी महागाई भत्ता आणि इतर सवलती मिळतात.त्यांच्या कर्मचाऱ्यां करीता सातवा वेतन आयोग लागु होते.मग शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव का नाही?.शेतकऱ्यांच्या पिकाला महागाईची झळ पोचत नाही काय?.शेतकऱ्यांना बि,बियाने औषध, शेतमजूर यांच्या करीता पैसा कुठून येणार?.कृषिविभागतील सर्व दुकानदार, व्यापारी,अडते,दलाल यांना सर्व महागाईची झळ लागते.कृषीउत्पन्न बाजार समितीच्या माथाडी कामगारां न कडून माथाडी बोर्ड चाळीस,एकेचालीस टक्के लेव्ही कापुन घेते.त्यांचा त्याकामगारांना कोणताही फायदा मिळत नाही.त्यावर सर्व कर्मचारी,पुढारी कायम स्वरूपी मलिदा खातात.शेतकऱ्यांना जात,धर्म,प्रांत नसतो. पण राजकीय पक्षांना त्यांच्या कार्यकर्ते,नेते यांना जात,धर्म,प्रांत असते.त्यावरच ते शेतकऱ्यांचे मतदान मिळवितात.तेव्हा त्यांना लाज कशी वाटत नाही.शेतकऱ्यांच्या मतदानावर निवडून यायला.ज्यांच्या मतदानावर निवडुन येतात आणि त्यांनाच सवलती देतांना हात मोडतात.पण कंपनी, कारखाने,बिल्डर्स यांचा टॅक्स माफ करता मेंदू आणि हात बरोबर काम करतात.विरोधी पक्षात असतांना सत्तेच्या खुर्चीसाठी ओरडून सांगत होता,कामगार,कर्मचारी शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे.मग आता काय झालं तुमच्या डोक्यातील मेंदूला.आता त्यांची निर्णय क्षमता कोमात गेली काय?.हिंदुत्व,मराठी माणस,धार्मिक भावनिक साद घालून कामगार, कर्मचारी शेतकरी नेला स्वर्गात आणि सत्ता मिळविली.आघाडीचे सरकार एकमेकांना सारखे शिव्या शाप देत होते पण सत्ता सोडत नव्हते.ते कोणते ही हिंदुत्वाचे संस्कार नसलेले बोके होते.युतीच्या सरकारात तर पिवर हिंदुत्वाचे संस्कार झाले नेते आहेत.हे त्यांच्या पेक्षा जास्त भांडतात.पण कामगार, कर्मचारी शेतकऱ्यांना मराठी माणसांना न्याय देण्यासाठी सत्तेतुन बाहेर पडत नाही.म्हणुन आता शेतकऱ्यांना स्वर्गात जाण्याकरिता आत्महत्याच करण्याची पाळी आणली राजकर्तेयांनी!.

     शेतकऱ्यांची शेतजमीन विकास करण्यासाठी घेता आणि उधोगपतीनां कवडी मोलाचे देता.त्यात तुम्ही मरे पर्यँत कमिशन खाणार आणि चार पिड्या बसुन खातीन एवढी संपत्ती गोळा करणार.शेतकऱ्यांची मुलं शेती गेल्यावर शहरात येऊन हाऊस पिकिंग किंवा वाचमन म्हणुन कायम असंघटीत कामगार म्हणुन काम करणार.या देशात देव देविका जागृत असत्या तर यांना त्यांनी कठोर शिक्षा केली असती.पण तेच भटा ब्राम्हणाच्या बौद्धिक कौशल्यामुळे दररोज बाजारात पांच रुपये किंमतीत विकल्या जात आहेत.हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व म्हणणारे कामगार,कर्मचारी शेतकऱ्यांना कोणत्याच गिनतीत घेत नाही.उच्च वर्णीय वर्गीय बँक अधिकारी शेतकऱ्यांच्या कर्ज माफीला जाहीर विरोध करण्याची हिंमत करतात.आणि हजारो कोटी रुपयाचे कर्ज बुडविणाऱ्या उच्च वर्णीय वर्गीय उधोगपतीचे कर्ज माफीची जाहीर समर्थन करतात. म्हणजे कामगार,कर्मचारी शेतकरी मेला तरी चालेल उधोगपती जगला पाहिजे ही भूमिका घेतात.कामगार,कर्मचारी शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारे प्रामाणिक असते तर यांनी या अधिकाऱ्यांचे जगणे कठीण केले असते.आता कुठे आहेत.ते तोंडाला काळे फासणारे कट्टर हिंदुत्ववादी?.कुठे आहे त्यांचा मराठी धर्म?.पैसा सर्व शेष्ठ झाला आहे.

     धर्माचे संस्कार,नीतिमत्ता कुठेच शिल्लक राहिली नाही.आघाडी सरकार व  युती सरकार नालायक होते.तर आता महाविकास आघाडी सरकार काय आहे?. म्हणजे सरकार कोणाचे ही असो.कामगार आणि शेतकरी हा भरडला जाणार असेल तर त्यांनी काय केले पाहिजे.शेतकरी कामगार पक्षातील गणपतराव देशमुख सारखा आमदार,खासदार निवडला पाहिजे.कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता आमदार, खासदार नको तर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचा खरा पुत्र निवडला पाहिजे.मानस पुत्रांनी शेतकऱ्यांनी नको तेवढी नालस्ती केली आणि विश्वास गमावला.म्हणुन जिसकी संख्या भारी उतनी उसकी भागेदारी म्हणजे शेतकरी आणि हितकरी,बहुजन हिताय बहुजन सुखाय असलाच पाहिजे.करीता शेतकऱ्यांनी महात्मा जोतीराव फुले यांचा आसुड हाती घेऊन कामगार,शेतकरी मेला तरी चालेल उधोगपती जगला पाहिजे असे धोरण घेणाऱ्या ठेवणाऱ्यांना फोडून काढलेच पाहिजे.सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सर्वच कामगार शेतकऱ्यांना प्रार्थना करतो.भटा ब्राम्हणांच्या सांगण्या वरून देवाला प्रार्थना करणे सोडा जिवंत माणसाला कामगार शेतकऱ्यांना हात जोडून प्रार्थना करा.जात,धर्म सोडा शेतीवर जगणाऱ्या सर्वच कामगार,कर्मचारी अधिकारी,शेतकरी माणसांना जोडा.

  • सागर रामभाऊ तायडे,
  • भांडुप,मुबंई ९९२०४०३८५९.
  • अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना,स्वतंत्र मजदूर युनियन


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com