माऊंटन व्हॅली, खडी मशीन रोड येथील घर क्रमांक ए 2 / 703 हे घर मझायदा मुबीन सय्यद या नावावर Allot करण्यात आले होते. त्याची ताबा पावती तसेच इतर सर्व कागदपत्रे तयार करण्यात आली. आजही बिलं तसेच घरभाडे ही व्यक्तीच भरत आहे. पहिल्यांदा तीच्याकडून हे घर रिदा रशीद नामक महिलेने घेतले. रिदा रशीद हिची बहिणऐवजी हिने हे घर 8 लाख रुपये डीपॉझीटवर भाड्याने दिले. त्यानंतर जेव्हा प्रकरण बाहेर येईल असे कळले, तेव्हा हेच घर महापालिका कर्मचारी प्रविण शिंदे यांच्या नावावर करुन त्यांच्या नावाची सर्व कागदपत्रे तयार करण्यात आली.
राधिका अंधारे कोण तिला गाळा महानगर पालिकेच्या पुनर्वसन योजनेतून गाळे कसे मिळतात तिची बहीण तनुजा अंधारे हिला घर कसे मिळतात ते पण दोन दोघीही मूळच्या पुण्यातल्या...
अजुन खूप माहिती द्यायची आहे १००० कोटीचा घोटाळा आहे ही सर्व हेराफेरी ठाणे महानगरपालिकेतील अधिका-यांना कळत कशी नाही. सगळेच हात धुवून घेतात यामध्ये पण ठाणे महानगरपालिका अजूनही डोळ्यावर पट्टी बांधून उभी आहे.
विक्रांत चव्हाण
अध्यक्ष ठाणे काँग्रेस
वर्ष २०२० पासून ठाणे महानगरपालिकेच्या लिपिक महेश आहेर याच्या कार्यपद्धतीवर व त्यांनी केलेली भ्रष्टाचारावर मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून सातत्याने आवाज उठवत होतो. वर्ष २०२१ मध्ये माझी आवाज दाबवायला माझ्यावर महेश आहेर यांनी खंडणीचा गुन्हाही दाखल केला होता, तरीही मी सोशल मीडिया व इतर माध्यमातून महेश आहेरच्या गैरव्यवहार चव्हाट्यावर आणत होतो . या दोन वर्षात मी महेश आहेर याच्या संदर्भात अनेक तक्रारी महापालिका आयुक्तांकडे दाखल केल्या. परंतु त्या तक्रारींवर कुठलीही कारवाई न करता महेश आहेरला महापालिकेत आणखी बळ दिलं गेलं. ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सद्याचे ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना प्रत्यक्ष भेटून महेश आहेर याच्या कार्यपद्धती व तो आश्रय देत असलेले अनधिकृत बांधकामाबाबत मी ७ पानांची लेखी तक्रार ही ठाणे महापालिका आयुक्ताना दिली. परंतु त्यांवरही कुठली कारवाई करण्यात आलेली नाही.
महेश आहेरला काही नेते व उच्च पदावर बसलेले अधिकारी यांचे पाठबळ असल्यामुळे आजपर्यंत त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. हा भ्रष्टाचारात तो एकटा नसून अनेक नेते व अधिकारी यांचाही सहभाग आहे. महेश आहेर फक्त एक चेहरा आहे त्याला चालवणारे नेते व अधिकारी यांनी त्याला ठाण्यात अनधिकृत बांधकाम व त्यांची अवैध काम करण्यासाठी ठेवले असल्याचे निदर्शनास येते. महेश आहेरला निलंबित केलं की ठाणे महापालिकेत चालत असलेले हे अवैध धंदे काय थांबणार नाही, हे नेते व अधिकारी आणखी एका महेश आहेरला जन्म देईल आणि हे सुरूच राहणार..जर खरोखर ठाणे महापालिकेत ही वसुली थांबवायची आहे तर महेश आहेरला निलंबित करून त्याला मदत करणारे हे नेते व अधिकारी यांचेही कारनामे जनतेसमोर आणावे लागतील त्यासाठी आयुक्तांनी तात्काळ यावर कारवाईचा बडगा उभारावा.....
योगेश मुंधरा
0 टिप्पण्या