Top Post Ad

पीके रोझीला सन्मानित केल्याबद्दल Google डूडलचे अभिनंदन


 पहिली मुळ भारतीय अभिनेत्री असलेल्या पीके रोझीचा सन्मान गुगलने डूडल स्वरूपात केला. जीला पडद्यावर पाहताच सिनेमागृहाच्या पडद्यावर दगडफेक करण्यात आली. खुर्च्या फोडल्या आणि नंतर हिंसक जमावाने तीचे घर पेटवून दिले. हिंसाचाराचे मूळ कारण जात होते. ती इथल्या तथाकथित स्वत:ला उच्च समजणाऱ्या जातीतील नव्हती. मग अभिनेत्री बनून रुपेरी पडद्यावर नायर जातीतील स्त्रीची भूमिका कशी काय करू शकते, असा संताप स्वत:ला उच्च समजणाऱ्या लोकांमध्ये होता.

स्वातंत्र्योत्तर केरळमध्ये 1928 मध्ये, जेसी डॅनियल नावाच्या उच्च जातीच्या ख्रिश्चन चित्रपट दिग्दर्शकाने मल्याळम भाषेतील पहिला मूक चित्रपट, विघथाकुमारन बनवला, ज्यामध्ये पीके रोझीला इतर कलाकारांसह मुख्य अभिनेत्री म्हणून साइन केले आहे. पीके रोझीचे पूर्ण नाव राजम्मा होते, ती पुलया नावाच्या जातीची होती, ज्यांचा व्यवसाय गाणे आणि नृत्याव्यतिरिक्त गवंडी काम हा होता.मल्याळम सिनेमाच्या इतिहासात पहिल्याच सिनेमात हिरोईन बनल्यानंतर पीके रोझीचं आयुष्य नरक बनलं. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच संपूर्ण केरळमध्ये खळबळ उडाली होती. स्वत:ला उच्च समजणाऱ्या लोकांना कामगार वर्गातील मुलगी नायिका बनून नाव कमावणं सहन करू शकत नाही. चित्रपटाचा प्रीमियर कॅपिटल सिनेमा, तिरुवनंतपुरम येथे होता, परंतु हिंसाचाराच्या भीतीमुळे पीके रोझी चित्रपटाच्या प्रीमियरला उपस्थित राहू शकल्या नाहीत. रिलीजनंतर हिंसाचार इतका भडकला की थिएटरची तोडफोड करण्यात आली आणि त्यानंतर पीके रोझीचे घर जाळण्यात आले. पीके रोझीने आपला जीव वाचवण्यासाठी केरळ सोडले आणि तामिळनाडूमध्ये लग्न केले. त्यांची आई एक थिएटर आर्टिस्ट आहे हे त्यांच्या मुलांना मोठे होईपर्यंतच माहीत होते.जात नसती तर पीके रोझी ही इतर अभिनेत्रींसारखी चमकता तारा ठरली असती. पण इथल्या जातीव्यवस्थेने त्यांना एका चित्रपटानंतर वनवासात पाठवले.


पी. के रोझी या मल्याळम अभिनेत्री होत्या त्यांचा जन्म 1903 मध्ये तिरुअनंतपुरम येथे झाले ज्यावेळी त्रिवेंद्र म्हणून तिरुअनंतपुरम ओळखलं जात असे बालपणापासून पिके रोजी यांना अभिनयाच्या आज त्यांची 120 वी जयंती आहे आणि त्या निमित्ताने एक खास गुगल डूडल बनवला आहे मल्याळम चित्रपटात काम करणारी पहिलीच अभिनेत्री पिके रोझी. पिके रोझी यांनी 1928 साली "विगाथाकुमारन" या मल्याळम सिनेमाच्या माध्यमातून सिनेक्षेत्रात एन्ट्री केली होती. त्यावेळी लोक सिनेमा कडे चांगल्या नजरेतून बघत नव्हते ,अशावेळी अभिनय क्षेत्रात जाण्याची जिद्द आणि स्वप्न पिके रोझी यांनी पूर्ण केले.जेंव्हा महिलांना सिनेक्षेत्रात घेतलं जात नव्हतं तेंव्हा स्वतःच्या जिद्दीवर अभिनेत्री बनली. अभिनेत्री होण्यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला होता.त्यामुळे गुगलने त्यांची 120 वी जयंती डुडल बनवून साजरी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com