Top Post Ad

वंदे-भारत रेल्वेगाड्यांचा प्लॅन म्हणजे खासगीकरणाकडे टाकलेले पुढचे पाऊल !

  • रेल्वे प्रशासनाकडून ठाणे, नवीमुंबईतील सोलापूरवासियांवर अन्याय ?
  • मुंबई- सोलापूर वंदे भारत रेल्वेला ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकात थांबा नाही
  • खासदार राजन विचारे यांचे रेल्वेमंत्री व मध्य रेल्वे महाप्रबंधकांना पत्र


 ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला सात लाखांहून अधिक प्रवासी ये-जा करीत असतात. दि. १६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर ते ठाणे अशी भारतातील पहिली रेल्वे धावलेल्या ठाणे रेल्वे स्थानकाला ऐतिहासिक महत्त्वप्राप्त असतानाही या रेल्वे स्थानकामध्ये मुंबई-सोलापूर या वंदेभारत रेल्वेला थांबा देण्यात आलेला नाही. यांसदर्भात खासदार राजन विचारे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व मध्य रेल्वेचे महाप्रबंधक नरेश लालवाणी यांना मेलद्वारे पत्र पाठवून मुंबई-सोलापूर वंदे भारत रेल्वेला थांबा मिळावा अशी मागणी केली आहे. तसेच मुंबई - सोलापूर रेल्वेला ठाणे रेल्वे स्थानकात थांबा न मिळाल्याने त्यांनी पत्रात खेदही व्यक्त केला आहे.

ठाणे रेल्वे स्थानकात गेल्याकाही वर्षांपासून मोठ्याप्रमाणात विकासकामे सुरू आहेत. खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नामुळे रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानकाचा कायापालट केला जात आहे. ठाणे रेल्वे स्थानकात अनेक लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांना थांबा आहे. त्यामुळे ठाणे आणि नवी मुंबई येथून हजारो नागरिक ठाणे रेल्वे स्थानकातून लांब पल्ल्यांच्या गाड्या पकडण्यासाठी येत असतात. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकाला महत्त्व आहे. शुक्रवारपासून मुंबई-शिर्डी आणि मुंबई सोलापूर या दोन वंदे भारत रेल्वेंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. परंतु यातील मुंबई सोलापूर या रेल्वेला ठाणे रेल्वे स्थानकात थांबा देण्यात आला नाही. मुंबईहून ही वंदे भारत रेल्वे थेट कल्याणला थांबणार आहे. त्यामुळे ठाणे लोकसभाचे खासदार राजन विचारे यांनी मुंबई- सोलापूर वंदे भारत रेल्वेला थांबा मिळावा अशी मागणी केली. ठाणे, नवी मुंबई शहरात सोलापूर भागातील लाखो नागरिक वास्तव्यास आहेत. या गाडीला ठाणे रेल्वे स्थानकात थांबा मिळाला असता तर त्यांना मोठा दिलासा मिळाला असता. तर सोलापूरला जाणाऱ्या प्रवाशांना कल्याणला जाण्याची गरज लागणार नाही. ठाणे रेल्वे स्थानकात मुंबई-सोलापूर वंदे भारत रेल्वेला थांबा मिळाल्यास प्रवाशांचा वेळही वाचणार आहे.

-------------------------------------------------


 वंदे-भारत रेल्वेगाड्यांचा प्लॅन म्हणजे  खासगीकरणाकडे टाकलेले पुढचे पाऊल !

१) भारतीय रेल्वेकडे गेल्या अनेक वर्षांपासून LOCO (इंजिन्स) आणि रॅक्स (डब्बे) चा तुटवडा आहे .अनेक प्रमुख गर्दीच्या मार्गांवर पॅसेंजर ट्रेन्स चा तुटवडा असताना अदानी प्रायव्हेट ट्रेन्स, तेजस एक्सप्रेस सारख्या महागड्या ट्रेन्स आणि आता वंदे-भारत नामक लोकल ट्रेन सारख्या दिसणाऱ्या ट्रेन्स, जनतेच्या माथी कारण नसताना मारल्या जात आहेत. 

२) लांब पल्ल्याच्या ट्रेन्स साठी LOCO  (इंजिन) असणाऱ्या गाड्या च सोयीस्कर आहेत कारण त्यामुळे एकाच पद्धतीची-बनावटीची इंजिन्स  (LOCO) पूर्ण देशात वापरता येतात.,  इन्व्हेंटरी आणि स्पेअर पार्टस बाळगण्याचा खर्च कमी होतो.तसेच एखादी एक्सप्रेस निर्धारित स्टेशन वर पोहोचल्यावर तिचे इंजिन दुसऱ्या गाडीसाठी वापरता येते. 

३) वंदे-भारत वगैरे लोकल ट्रेन्स सारख्या,  तीन ते चार ट्रॅक्शन मोटर्स असणाऱ्या आणि दोन्ही बाजूंकडून चालू शकणाऱ्या  गाड्या लांब पल्यासाठी चालविल्याने प्रवासाचा वेळ कमी होतो हे निव्वळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणारे स्टेटमेंट आहे.

कारण आताची नवीन इलेक्ट्रिक इंजिन्स (२०१४ च्या आधी आलेली) हि खरोखर फास्ट आहेत उदा. WAP-5, WAP-7...... राजधानी आणि तेजस एक्सप्रेस साठी हीच इंजिने वापरली जातात.

एक्सप्रेस शेवटच्या स्थानकावर आल्यानंतर तिचे इंजिन बदलायला केवळ १५ ते २० मिनिटांचा वेळ लागतो आणि ती एक्सप्रेस काही लगेच माघारी प्रवासाला निघत नाही, मध्ये बराच अवकाश असतो. त्यामुळे लांब पल्ल्याच्या ट्रेन्स साठी वंदे-भारत सारखे रॅक्स वापरणे म्हणजे जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे. 

४) आम्ही फक्त ५७% प्रवासी खर्च वसूल करतो बाकी आम्ही नुकसानीत चालतो असे भारतीय रेल्वे मोठ्या गर्वाने सांगते तर मग वंदे भारत सारखी थेरं निर्माण करून तुम्ही कोणत्या फायद्यात येणार आहात ? Optimisation of existing resorces धान्यात ठेऊन आहे ते नीट चालवा असे रेल्वेला कोण सांगणार ? 

५) आता ह्या वंदे-भारत सारख्या ट्रेन्स चा मेंटेनन्स करायला नवीन LOCO -शेड्स बांधाव्या लागतील. मुंबईत २०१३ साली जेव्हा नवीन लोकल्स आल्या तेव्हा पश्चिम रेल्वेने बम्बार्डियर कंपनीच्या लोकल ट्रेन्स स्वतःकडे ठेवल्या आणि मध्य रेल्वेने सिमेन्स कंपनीच्या  लोकल ट्रेन्स स्वतःकडे ठेवल्या जेणेकरून त्या ट्रेन्स चे सुटे भाग, मनुष्यबळ, ट्रेनिंग  आणि INVENTORY  बाळगणे सोपे होईल. बम्बार्डियर कंपनीने लवकर ट्रेन्स बनवून दिल्या आणि सिमेन्स कंपनीच्या गाड्या उशिरा दाखल झाल्या.  

त्यावेळी मध्य रेल्वेने बम्बार्डियर लोकल्स आपल्या ताब्यात घेतल्या नाहीत आणि वर्षभर प्रवाश्यांना ताटकळत ठेवले कारण त्यांना अतिरिक्त inventory  बाळगायची नव्हती. त्यावेळी नखरे करणारी मध्य रेल्वे आज राजकारण्यांच्या आदेशाने "वंदे-भारत" गाडी आपल्या ताब्यात घ्यायला कशी बरे लगेच तयार झाली ?

६)  थेट भाडेवाढ करता येत नाही म्ह्णून तेजस, वंदे भारत , प्रायव्हेट ट्रेन्स सारखे मार्ग भाजपकडून अवलंबले जात आहेत.    नव्या चालू झालेल्या वंदे-भारत चे चेअर कारचे तिकीट 975/- रुपये आहे आणि तिला शिर्डी ला पोहोचायला ५ तास २० मिनटे लागतात.   आधीपासून चालू असणाऱ्या  दादर-शिर्डी-साईनगर-सुपरफास्ट एक्सप्रेस चे AC 3 Tier चे तिकीट फक्त 645/- रुपये आहे णि तिला शिर्डी ला पोहोचायला ६ तास लागतात. म्हणजेच फक्त अर्धा तास आधी पोहचण्यासाठी तब्बल 330/- रुपये प्रवाश्यांकडून उकळणे म्हणजे एक प्रकारची लूटच आहे. 

हळूहळू वंदे-भारत ट्रेन्स च्या धर्तीवर सर्वच ट्रेन्स ची भाडेवाढ केली जाईल. बेडकाला फ्रायिंग पॅन मध्ये पाण्यात ठेवून खाली गॅस पेटवून,  हळूहळू तापमान वाढवले कि बेडूक ऍडजस्ट करतो आणि उडी मारून बाहेर येत नाही तसला हा खेळ आहे.  जनतेच्या पैश्यांवर नव्या बाटलीत जुनी दारू ओतून जनतेलाच मूर्ख बनवले जात आहे.

-चंद्रभान आझाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com