Top Post Ad

कुणाच्या नेतृत्वात ठाण्यात शिवसेनेची पिछेहाट झाली?

मागील काही वर्षापासूनचे ठाणे जिल्ह्याचे राजकारण पाहिले तर यावरून असे लक्षात येते की, ठाण्यातील शिवसेनेचा राजकीय आलेख घसरतच आलेला आहे. याला जबाबदार कोण असाही प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे महत्त्व तत्कालिन नेते प्रमोद महाजन आणि गोपिनाथ मुंडे यांना आनंद दिघे यांनी पटवून दिले होते. आणि ठाण्यात केवळ शिवसेनाच का हे देखील पटवून दिले होते. मात्र दिघे साहेब गेल्यानंतर ठाण्यातील शिवसेनेच्या आमदारांची सख्या कमी का होत गेली. यामागे कोणते राजकारण खेळले जात होते. अगदी शहरातील जागा शिवसेनेच्या हातून जाण्यास कोण कारणीभूत होते याचाही आता विचार केल्यास सध्याची राजकीय कोंडी फुटेल? कुणाच्या नेतृत्वात ठाणे जिल्ह्यात शिवसेनेची पिछेहाट झाली असा सवाल शिवसेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मान्यवरांनी उपस्थित केला.  

 धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जयंतीनिमित्त २६ जानेवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाण्यात आले असताना आनंद मठाकडे पाठ फिरवली असा विरोधकांकडून आरोप केला जात होता. त्यांना प्रतीउत्तर देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेसाठी ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, ठाणे शहरप्रमुख प्रदीप शिंदे, शिवसेना महिला आघाडी, रेखा खोपकर, समिधा मोहिते  शिवसेना प्रवक्ते चिंतामणी कारखानीस, अनिश गाढवे, चंद्रभान आझाद, तुषार रसाळ आदि मान्यवर उपस्थित होते.

पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा ठाण्यात येण्याचा नियोजित कार्यक्रम दौरा चार-पाच दिवसापूर्वी शिवसैनिकांना व पोलिसांना कळविण्यात आलेला होता. त्यामध्ये महाआरोग्य शिबिराला भेट देऊन, टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या असलेल्या पुतळ्याला अभिवादन करून जैन मंदिराच्या कार्यक्रमाला प्रस्थान करणार होते. असा नियोजित कार्यक्रम होता. उद्धव ठाकरे ठाण्यात येणार त्याच दिवशी मिंदे गटाने आनंद आश्रमास त्यांच्या पक्षाचे नाव दिले  यावर ठाण्यातील शिवसैनिकांनी नाराजी दर्शवली असून या आनंदाश्रमाचे रूपांतर वातानुकूलित कॉर्पोरेट ऑफिस मध्ये करण्यात आलेले आहे. त्यामुळे या आनंद आश्रमाचे मूळ उद्दिष्ट नष्ट होत चाललेले आहे असा आरोप केला आहे. 

आनंद आश्रमातून शिवसेना वाढली.  तिथूनच  नगरसेवक, आमदार, खासदार, उद्योजक निर्माण झाले. इतकेच नव्हे तर कित्येक बेरोजगारांना नोकऱ्या दिल्या, सर्वसामान्य नागरिकांच्या अन्यायाला वाचा फोडली जात होती. त्यांना न्याय मिळवून दिला जात होता. आनंद आश्रम म्हणजे गोरगरीब जनतेचा आश्रय होता आशास्थान होते.  हे पाहूनच त्या जागेचे पारसी असलेले मूळ मालक त्यांनी सदर जागा दिघे साहेबांना दिली होती. आजही ते सर्व शिवसैनिकांसाठी पवित्र स्थान आहे. सर्वांसाठी ते एक मंदिराप्रमाणेच आहे.  ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक शिवसैनिक आनंदआश्रमातील दिघे साहेबांच्या प्रतिमेच्या दर्शनासाठी त्यांनी स्पर्श केलेल्या त्यांच्या वस्तुच्या दर्शनासाठी त्यांच्या देवघरात माथा टेकण्यासाठी त्यांच्या जयंतीदिनी आला होता. मात्र सरकारी प्रोटोकॉलच्या कचाट्यात आनंद आश्रम अडकल्याने या शिवसैनिकांना आनंद दिघे साहेबांचे दर्शन घेता आले नाही. खरे तर आनंद आश्रम हे सर्व सामान्य शिवसैनिकाचे आहे. त्यामुळें आतापर्यंत त्याचे पावित्र्य जपले जात होते. मात्र आता त्याचे रूपांतर प्रायव्हेट लिमिटेड मध्ये झाले असल्याने मुळ निष्ठावंत  शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. आज त्याचे कार्पोरेट स्वरूप पाहून इथल्या प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात रोष उत्पन्न झाला आहे. हे आनंद आश्रम निष्ठावंत शिवसैनिकांचे आहे व राहणार यासाठी आम्ही कायदेशीर लढाई करून मिळवून घेऊ असे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख यांनी म्हटले. 

 टेंभी नाक्यावरील धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त दर्शनासाठी आनंदआश्रमात येत असलेल्या शिवसैनिकांना आजपर्यंत कधीही रोखण्यात आले नव्हते. मात्र प्रोटोकॉलच्या नावाखाली या वेळेस अनेक शिवसैनिकांना आपल्या गुरुचे दर्शन दुर्लभ झाले.  आनंद आश्रमाला मिंदे गटाने नाव देवून आपले अस्तित्व टिकविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात असून आनंद आश्रमात प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू झाली आहे का ? असा सवाल जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी उपस्थित केला. आपण याचा जाहिर निषेध करत असून यापुढे आनंद  दिघे यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणून त्या आश्रमात आपण जाणार नसून केवळ पक्षाचा आदेश असेल तेव्हा एक शिवसैनिक म्हणून नक्कीच त्या ठिकाणी जाऊ. मात्र भविष्यात आनंद आश्रमाचे दिघे साहेबांच्या काळचे वैभव परत आणण्यासाठी आम्ही जिवाचे रान करून असा विश्वासही केदार दिघे यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com