Top Post Ad

धीरेंद्र महाराजांमुळे जगात देशाचे नाव होईल - श्याम मानव


 अखिल भारत अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्रीनी त्यांच्यातील दिव्यशक्ती सिद्ध करण्याचं 30 लाख रुपयांचं बक्षीस आव्हान दिलं होतं. यानंतर धीरेंद्र महाराजांनी त्यांच्या रायपूर येथील दरबारात आव्हान स्वीकारलं. तसेच रायपूरला दरबारात या, अशी अट ठेवली. यावर श्याम मानव यांनी प्रतिक्रिया दिली असून 'तुमच्याकडे दिव्यशक्ती असेल तर तुम्ही नागपूरला या, रायपूरला बोलवून भक्तांच्या आड कशाला लपता, धमक असेल तर नागपुरात येऊन तुमची शक्ती सिद्ध करा' असे चॅलेंज बागेश्वर बाबांना श्याम मानव यांनी दिले आहे. 

पुढे श्याम मानव म्हणाले, 'बागेश्वर बाबांनी चॅलेंज स्वीकारलं हेच मुळात खोटं आहे. मी त्यांना चॅलेंजबद्दल स्पष्टपणे कळवलं आहे. मुळात भक्तांसमोर या कसोट्या करणे शक्य नाही. याबद्दल त्यांच्या व्हिडीओमध्येच अनेक गोष्टी स्पष्ट दिसून येतात. बाबांकडे दिव्यशक्ती असल्याचे सिद्ध झाल्यास ती सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. मात्र वैज्ञानिक कसोटीतून त्यांनी ते करावं, आपली एवढीच मागणी असल्याचे ते म्हणाले.'  

श्याम मानव यांनी नागपुरात यावं, त्यांच्यासमोर आम्ही नवे दहा लोकं उभे करु. तसेच त्यांच्याबद्दल बाबांनी सर्व माहिती सांगावी. तसेच दरबारमध्ये ज्या प्रकारे ते भक्तांच्या घरी कोणती वस्तू कुठे ठेवली आहे, याबद्दल सांगतात. तसेच दुस्रया खोलीत आम्ही ठेवलेल्या वस्तूंबद्दल सांगावे. त्यांनी 90 टक्के जरी खरी माहिती दिली तर त्यांना अखिल भारत अंधश्रद्धा निर्मुलन समितीतर्फे 30 लाख रुपये देण्यात येतील असेही यावेळी श्याम मानव यांनी स्पष्ट केले.   


  बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्रीनी नागपुरात येऊन दिव्यशक्ती असल्याचे सांगितले. भक्तांसमोर विविध चमत्कार दाखवल्याचा दावा केला. तसेच एखाद्या अनोळखी व्यक्तीबद्दल सर्व माहिती चेहरा बघून सांगितल्याचा दावा केला. कोणाच्या घरी काय ठेवले आहे, कुठे ठेवले आहे, हेही सांगितले. त्यामुळे त्यांना नागपुरात येऊन 'दिव्यशक्ती' सिद्ध करण्याचे चॅलेंज दिल्याचे ते म्हणाले  

धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार महाराजांना  भक्तांचे नाव, वय, दूरध्वनी क्रमांक. त्यांच्या वडिलांचे नाव अंतर्ज्ञानाने समजते.. इतकेच नव्हे, तर भक्तांच्या घरातील कोणत्या अलमारीत कोणत्या वस्तू ठेवल्या आहेत हेदेखील समजते.. पण जगात आजपर्यंत कधीच सिद्ध न झालेली ही `टेलीपथी' विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध झाल्यास भारताला त्याचा फायदाच होईल. धीरेंद्र महाराजांमुळे जगात देशाचे नाव होईल, अशी उपरोधिक टीका भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि संस्थापक श्याम मानव यांनी केली आहे.  


श्याम मानव म्हणाले, आम्ही जे आव्हान दिले आहे ते वैज्ञानिक कसोट्यांवर पार पाडलं जाणे आवश्यक आहे. ही `टेलीपथी', अंतर्ज्ञान आजपर्यंत जगात कधीच सिद्ध झालेली नाही. वैज्ञानिक कसोट्यांवर जर का ही `टेलीपथी' सिद्ध झाली तर माझ्यासारख्या भारतीय माणसाला ती अभिनास्पद गोष्ट ठरेल. कारण त्यामुळे भारताचे संपूर्ण जगात नाव होणार आहे. देशाच्या सुरक्षेसाठीदेखील त्याचा फायदा होणार आहे 

श्याम मानव म्हणाले, धीरेंद्र महाराजांची दिव्यशक्ती सिद्ध व्हावी यासाठीच महाराजांपर्यंत इतर कोणत्याही मार्गाने माहिती पोहोचणार नाही याची काळजी मला घ्यावी लागेल. आम्ही अचानक त्यांच्यासमोर दहा माणसे उभी करू त्या माणसांना पाहून धीरेंद्र महाराजांनी त्यांचे नाव, वय, वडिलांचे नाव आणि त्यांचा भ्रमणध्वनी (मोबाईल) क्रमांक सांगायचा आहे. आणि बाजूच्या खोलीत दहा वस्तू ठेवू, महाराजांनी त्या वस्तू कोणत्या हे ओळखायचे आहे. पत्रकार भवनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. या सर्व घटनांचे चित्रीकरण होत राहील आणि ही प्रक्रिया दोनदा पार पाडली जाईल.  


 सामान्य माणसाच्या हातून चुका होऊ शकतात. दिव्य शक्ती 100 टक्के खरी ठरते. दिव्य शक्तीच्या हातून चुका होणे शक्य नाही. तरीही आम्ही 90 टक्क्यांची अपेक्षा बाळगतो. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी 90 टक्के जरी खऱया ठरल्या तरी आम्ही हे कबुल करू की धीरंद्र महाराजांकडे खरोखरच दिव्य शक्ती आहे. आणि त्यांनतर आम्ही आमच्या समितीचे 30 लाख रुपयांचे पारितोषिक देऊ. मी श्याम मानव अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा संस्थापक धीरेंद्र महाराजांच्या पायांवर डोके ठेवीन. त्यांची माफी मागेन. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती मागील 40 वर्षे काम करीत आहे. हजारो बाबांचा, मांत्रिकांचा, देवी-देवता शरीरात आणणाऱया लोकांचा आणि ज्योतिषांचे पितळ उघडे पडले आहे. तसेच नागपूरला `पोलखोल शहर' अशी प्रसिद्धी मिळवून दिलेली आहे. ती अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती कायमची बंद करू आणि तुमची जाहीरपणे माफीही मागू,असे श्याम मानव म्हणाले.  

श्याम मानवांनी केलेल्या टीकेबाबत धीरेंद्र शास्त्रीना विचारले असता ते म्हणाले, आमच्या गुरूंकडून आम्हाला याबाबतचे प्रमाणपत्र मिळाले आहे. आम्ही चमत्कारी पुरुष आहोत हे आम्हाला जगाला सिद्ध करून दाखवण्याची गरज भासत नाही. भारतात अशी कित्येक झपाटलेली ठिकाणे आहेत, `आयएसआय'मार्कची ठिकाणे आहेत. ज्या ठिकाणी नकारत्मक शक्तींचा वावर आहे. त्याला लोकं भूतप्रेत म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला नकारात्मक शक्ती म्हणतात. शरीरातील कंपनांच्याबाबत म्हणायचे झाल्यास लोकांमधील नकारत्मक ऊर्जा असते तीच शरीरातील कंपने असतात. आणि केवळ भारतातच नव्हे तर ब्रिटनमध्येही असे दरबार भारतात आणि त्या दरबारात भूते आली, असा दावाही धीरेंद्र शास्त्रीनी केला आहे.  

त्यांच्या दाव्यांनुसार दिव्य दरबारात ते भूतप्रेत दाखवितात. अमुक अमुक व्यक्तीच्या अंगात भूतप्रेत आले आहे, याच्यावर जादूटोणा केलेला आहे, याच्यावर करणी केली आहे, याच्यवर अमुक एका व्यक्तीने तोटका केलेला आहे, अशाप्रकारचे दावे करणे हा जादूटोण्याविरोधी कायद्यानुसार महाराष्ट्रात गंभीर अपराध आहे, असल्याचे श्याम मानव म्हणाले. अमुक एकाने तुझ्यावर जादूटोणा केवळ असे सांगितल्यानंतर जादूटोण्याच्या केवळ संशयापायी हजारो माणसे मारली जातात. त्यासाठीच हा कायदा तयार करण्यात आला आल्याचे सांगत श्याम मानव यांनी त्यावर आक्षेप नोंदविला आहे. 


इतिहासाची पुनरावृत्ती होईल का, या विचारांनी मी चिंताग्रस्त होतो. त्याशिवाय जात आणि वंश या आपल्या जुन्या शत्रूंसोबतच आपण आता अनेक राजकीय पक्षही निर्माण करणार आहोत, ज्यांचे राजकीय वंश विभिन्न आणि एकमेकांविरूद्ध विचारांचे असणार आहेत. हे वास्तव लक्षात आलं की माझी चिंता आणखीच वाढते. भारतीय लोक आपल्या देशाला आपल्या धर्मश्रद्धांपेक्षा श्रेष्ठ मानतील ? की आपल्या धर्मश्रद्धांना देशापेक्षा श्रेष्ठ मानतील ? ते मला माहिती नाही, परंतु हे खरं आहे की जर पक्षांनी आपली धर्मश्रद्धा देशापेक्षाही श्रेष्ठ मानली तर आपलं स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात येईल आणि मग कदाचित आपण ते कायमचं गमावूनही बसू. ह्या शक्यतेपासून कुठल्याही परिस्थितीत आपण आपलं रक्षण करायलाच हवं. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपण आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी झटायलाच हवं..... ......भारताने ही लोकशाही व्यवस्था गमावली. पुन्हा दुसऱ्यांदा तो ती गमावेल का ? ते मला माहिती नाही, परंतु भारतासारख्या देशासाठी ते अगदी शक्य आहे, कारण येथे लोकशाहीचा दीर्घ काळ वापरच न झाल्याने हे काहीतरी नवं आहे, असंही लोकांना वाटू शकतं. अशा वेळेस लोकशाहीने हुकुमशाहीला वाट मोकळी करून देण्याचा धोका संभवतो- म्हणजे ही नवजात लोकशाही आपलं रूप तसंच ठेवेल, परंतु प्रत्यक्षात मात्र हुकुमशाहीला स्थान देईल, असंही होणं शक्य आहे. राजकारणात मोठीच जर उलथापालथ झाली, तर ही दुसरी शक्यता प्रत्यक्षात येण्याची संभाव्यता खूपच अधिक आहे... ---
डॉ_बाबासाहेब_आंबेडकर संविधान सभेतील समारोपाच्या भाषणातून

मध्यप्रदेश राज्य के छतरपुर जिले के गढा ग्राम में शमशान घाट है. इसी शमशान घाट के पास में गांव समाज की ज़मीन पर भगवानदास गर्ग नाम के पंडित ने रोजी रोटी के लिए हनुमान मंदिर बनाया. भगवानदास गर्ग पूजा अर्चना, भगवत कथा सुनाना और भूत पिशाच भगाने के नाम पैसा कमाने लगे. चमत्कार और दिव्य शक्ति का भी दावा किया, लेकिन कोई खास प्रसिद्ध नही मिली. भगवानदास गर्ग का पोता था जो 12वीं पास था लेकिन बेरोजगार था. नाम था उसका धीरेंद्र कृष्ण गर्ग. जो रोजगार की तलाश में इसी हनुमान मंदिर को अपना कमाने का अड्डा बनाता है और अपना नाम बदलकर धीरेंद्र नाथ शास्त्री रख लेता है.

चमत्कार, दिव्य शक्ति, भूत पिशाच भगाने का दावा, इसके बावजूद धीरेंद्र कृष्ण गर्ग को वो कामयाबी नही मिली जिस कामयाबी उसकी चाहत थी. उसने स्थानीय मीडिया को भी बुलाकर चमत्कार करने का दावा किया. उसका और उसके चेलों का दावा था इस मंदिर में कोई बल्ब लगता है तो फुट जाता है. लेकिन स्थानीय मीडिया ने कोई तवज्जो नहीं दिया.
उसके बाद उसने सोशल मीडिया का सहारा लिया. अपने झूठे चमत्कार का वीडियो, भूत प्रेतों को भगाने का दवा करने का वीडियो सोशल मीडिया पर छोटे छोटे क्लिप अपलोड करने लगे. सोशल मीडिया ने उसे प्रसिद्धि दिलाई. दरबार में भीड़ बढ़ने लगी. बिना किसी जाने उसके बारे में सब कुछ बताने का षड्यंत्र रचा जाने लगा. मूर्ख अनुयायियों ने धन की वर्षा की.

धन की वर्षा में पाखंडी बाबा डूब गया. अधिक धन कमाने के लालच में अधिक चमत्कार, अधिक दिव्य शक्ति और भूत पिशाच भगाने का दावा करने लगा. और एक दिन सरेआम उसकी चोरी पकड़ी गई.
ब्राह्मण जो इस देश का शासक वर्ग है ऐसे बाबाओं की करतूतों को जानता है समझता है. लेकिन अपना आधिपत्य बनाए रखने के लिए उन्हें अंधविश्वास बनाए रखना है और यह सब वे धीरेंद्र नाथ शास्त्री के द्वारा अंजाम देते है.
मध्यकालीन यूरोप पर भी कभी केवल शासक वर्ग और चर्च का आधिपत्य था. अंधविश्वास और चमत्कार के नाम पर जनता को काबू में रखकर उनपर शासन करते थे. चारो दरिद्रता थी, किसान और आम आदमी बेहाल थे. जैसे ही विज्ञान ने ईसाई पादरियों को चर्च के भीतर बंद किया अंधकार के बदल छट गए.

यूरोप और अमेरिका भले विकसित हैं लेकिन लैटिन अमेरिका और दक्षिण अमेरिका आज भी पिछड़े मुल्क हैं. कारण लिबरल गोरों ने मूलनिवासियों पर अपना आधिपत्य बनाए रखने के लिए अंधविश्वास, चमत्कार और पादरियों को चर्च के भीतर बंद नही किया. आज भी लैटिन अमेरिकी समाज अंधविश्वास और भूत प्रेतों के चक्कर में चर्च और पादरियों के इर्द गिर्द घूमते हैं. --Kranti Kumar

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com