Top Post Ad

धम्म हा जगण्याचा मार्ग आहे ती धार्मिकता नाही- भदन्त अजाह्य जयासारो

 
जगविख्यात बौद्ध भन्ते 'महाथेरो अजाह्य जयासारो 'थायलंड येथून भारत भेटीसाठी आले आहेत. यावेळी त्यांनी विविध भिक्खू  संघटनांना भेट दिली. त्यांच्या या भेटीदरम्यान  मुंबईमध्ये मेत्ता 'ग्लोबल फाऊंडेशनतर्फे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दादर येथील शिवाजी मंदिर येथे आयोजित या कार्यक्रमात भिक्खू संघासाठी चिवरदान देखील करण्यात आले. याप्रसंगी भन्ते अजाह्य जयासारो' यांच्या धम्मदेसनेवर आधारित इंग्रजी पुस्तक विदाऊट एन्ड विदीन याचा मराठी अनुवाद केलेल्या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आदरणीय 'महाथेरो अजाह्य जयासारो यांनी उपस्थितांना धम्मदेसना दिली. यावेळी महाउपासक हर्षदीप कांबळे तसेच थायलँडचे भारतीय राजदूत यांच्यासह थायलँड येथून अनेक बौद्ध उपासक तथा उपासिकां या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. 

यावेळी झालेल्या चिवरदान सोहळ्यात  उपासक मोठ्या संख्येने स्वहस्ते चिवरदान करून सहभागी झाले. चीवरदान सोहळ्यासाठी उपसकांची नोंदणी आठवडाभर आधीच करण्यात आली होती. चिवरदान कार्यक्रमाला मुंबई आणि आसपासच्या भागातील उपासकांनी उत्तम प्रतिसाद दिला. ज्यांची चिवरदान करण्याची ईच्छा आहे परंतु आर्थिक अडचणीमुळे ज्या उपासकांना चिवर आणणे शक्य नव्हते अश्या उपासकांना ' मोफत चिवर उपलब्ध करून देण्यात आले. 

तथागतांचा धम्म हा प्रत्येक माणसाला जीवन जगण्याचा मार्ग शिकवतो. तो इतर धर्माप्रमाणे धर्म मुळीच नाही. यासाठी श्रद्धा आणि अंधश्रद्धा स्पष्टपणे समजणे गरजेचे आहे. असे स्पष्ट मत जगविख्यात भदन्त अजान्ह जयासारी यांनी आपल्या प्रवचनातून मांडले.  आपल्या प्रवचनात भन्तेजींनी बुद्धांचा धम्म जगाला शांतीच्या मार्ग कशा प्रकारे दाखवतो याचे अतिशय योग्य रितीने विश्लेषण केले.  बुद्धांनी सांगितलेल्या विपश्यनेच्या माध्यमातून इथला प्रत्येक व्यक्ती सुखी होऊ शकतो. प्रत्येकाने सर्व प्रथम आपल्या मानसिकतेचा अभ्यास केला पाहिजे. आपले मन सुखी, आनंदी असेल तर आपण आनंद अनुभवतो. त्यासाठी प्रत्येकाने विपश्यनेच्या माध्यमातून आपल्या मनातील विकार दूर करून आपला मी पणा सोडला पाहिजे तरच आपण खऱया शांततेचा सुखी अनुभव घेऊ शकू.  प्रत्येकाने असा स्वानुभव घेतला तर अशा तऱहेने सर्व विश्वात शांतता नांदेल असेही शेवटी भन्तेंनी आपल्या प्रवचनात सांगितले. 

 यावेळी महाउपासक हर्षदीप कांबळे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. डॉ.बाबासाहेब म्हणाले होते आपण बौद्ध धम्म सस्विकारल्यानंतर आपणाला इतर बौद्ध राष्ट्रांसोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित करायचे आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या पूर्वीही औरंगाबादला दलाई लामा यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आणि त्यानंतर आज हा कार्यक्रम होत आहे. धम्माबाबत जनजागृती व्हावी. धम्माचे विचार नियमित प्रसारित व्हावे या करिता राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती सातत्याने कार्यक्रमाचे आयोजन करित आहे. आज मेत्ता ग्लोबल फाऊंडेशनच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत असल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले. 
आपल्या देशातील हा धम्म इतर देशात जाऊन फोफावला आज पुन्हा त्यांच्याकडून खूप जोरात या धम्माचा प्रचार केला जात आहे. तो पुन्हा भारतभर पसरविण्याकरिता प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी आपण सर्वजण सतर्क राहून हे कार्य अधिक गतिमान करू या असे आवाहनही हर्षदिप कांबळे यांनी केले. 
 
मेत्ता ग्लोबल फाऊंडेशनचे अलोक शेंडे यांनी फाऊंडेशनची भूमिका स्पष्ट केली तर विजय कदम यांनी उत्कृष्टरित्या सूत्रसंचालन केले. मेत्ता ग्लोबल फाऊंडेशनच्या सोनाली रामटेके यांच्यासह अनेकांनी या कार्यक्रमाकरिता आपले योगदान दिले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com