Top Post Ad

भारतातील पहिली संपादक महिला तानुबाईं बिर्जे


 बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र' दर्पण '६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले म्हणून महाराष्ट्र शासन ६ जानेवारी हा
 पत्रकार दिन साजरा करीत असताना आम्ही महाराष्ट्राच नव्हे तर भारतातील पहिली संपादक महिला तानुबाईं बिर्जे हा पत्रकार दीन  देखील साजरा  केला पाहिजे.तानुबाई बिर्जे (1876-1913) या शतकभरापूर्वीच्या 'दीनबंधु' या सत्यशोधकी नियतकालिकाच्या स्त्री संपादक. आहेत.तानुबाई बिर्जे या पहिल्या महिला पत्रकार ज्यांनी सत्यशोधक पद्धतीने पत्रकारिता करत समाजात विचारांची देवाण-घेवाण करत बदल घडवला. त्यांनी महात्मा फुलें सावित्रीमाई याचा सत्यशोधक चळवळीत घडलेल्या प्रत्येक क्रांतिकारी घटनेची नोंद घेतली होती. भट ब्राह्मण शाही विरुद्ध त्यावेळी आवाज उठविणे अणि त्याचे लेखन करणे अतिशय अवघड कार्य होते.त्या महान कार्याचां निदान पुरोगामी आणि आंबेडकरी चळवळीला तरी विसर पडता कामा नये.

         ब्रिटिश भारतात आल्यानंतर 29 जानेवारी 1780 रोजी पश्चिम बंगालमध्ये ‘बेंगॉल गॅझेट’ नावाचे पाहिले साप्ताहिक सुरु करण्यात आले. ब्रिटिश कालखंडात इंग्रजांच्या विरोधात लिखाण करण्यास मनाई होती. असा परिस्थितीतही 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरुवात केली.एक इंग्रजी आणि एक मराठी असे दोन स्तंभ या वृत्तपत्रात असत.ब्रिटिशांना समजावे म्हणून दुसरा स्तंभ इंग्रजीत लिहला जायचा. इंग्रजी सत्तेचे कायम लक्ष असूनही तब्बल साडे आठ वर्षे दर्पण हे वृत्तपत्र चालले. त्याचा शेवटचा अंक जुलै 1840 मध्ये प्रकाशित झाला.महाराष्ट्र शासन  राज्यात पत्रकार दीन म्हणून ६ जानेवारी  साजरा केला जात आहे.तसाच तो झालं पाहिजे.    भारतात प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल मिडियात महिला पत्रकारांचा  सहभाग वाढत असला तरी . भारतातील पहिल्या महिला पत्रकार कोण होत्या.पहिल्या संपादिका कोण होत्या हे  बऱ्याच लोकांना  माहितच नाही,देश गुलामगिरीत असताना ज्यांनी आपले इमान राखून पत्रकारिता केली.क्रांती प्रतिक्रंतीच्या संघर्षात सर्वस्वी स्वतःला झोकून देणाऱ्या महिला पत्रकार याची आठवण दलाल मिडीयाला नाही तरी पत्रकारिता या आपल्या व्यवसाय करणाऱ्या प्रामाणिक मिडीयाला तरी झालीच पाहिजे.


      भारतातील पहिली संपादक महिला तानुबाईं बिर्जे या  महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या मानसकन्या होत्या.. तानुबाईं बिर्जे यांचा जन्म १८७६ मध्ये पुण्यात झाला. त्यांचे शिक्षण वेताळपेठेतील महात्मा फुले यांच्या शाळेत झालं. तानुबाई यांचे वडिल देवराव ठोसर हे महात्मा फुले यांचे सहकारी आणि शेजारी होते. त्यामुळे सावित्रबाई आणि महात्मा फुले यांच्या सहवासात तानुबाईंचे जीवन गेल्यामुळे त्यांचा सत्यशोधक चळवळीचे विचार त्यांच्याकडे होते. २६ जानेवारी १८९३ रोजी पुण्यामध्ये वासुदेव लिंबोजी बिर्जे यांच्याशी त्यांचा विवाह झाला.वासुदेव बिर्जे यांनी १८९७ मध्ये दीनबंधु या वृत्तपत्राची जबाबदारी  स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि १९०६ सालापर्यंत त्यांनी वृत्तपत्र चालवलं. मात्र काही काळानंतर त्यांचे प्लेगच्या आजारामुळे  निधन झाले. पतीच्या जाण्यामुळे दीनबंधु वृत्तपत्र बंद पडतेय की काय असा प्रश्न पडू लागला होता, मात्र तानुबाई यांनी न डगमगता प्रबोधनाचे कार्य आणि दीनबंधु वृत्तपत्राची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली.     

        महात्मा फुले याच्या  सत्यशोधक चळबळीत वडील  ठोसर आणि  पती बिर्जे होते. महात्मा फुले सावित्रीमाई फुले याच्या सहवास आणि  संस्कारातून तयार झालेल्या तानुबाईंनी ‘दिनबंधु’ चालवायला घेतले. ज्यावेळी महिलांना चूल आणि मूल यापलीकडे पाहिलं जात नव्हतं, अशा काळात तानुबाईंनी सत्यशोधकीय पत्रकारितेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. तानुबाईंनी संपादक म्हणून आपल्या अग्रलेखातून समाजातील विषमतेवर प्रहार करुन त्याची चिरफाड केली. बहुजन शिक्षणाचा विचार मांडला. नाविन्यपूर्ण विषय हाताळले. 

      तानुबाईंची सामाजिक जाणीव, बहुजनांच्या उत्थानासाठी तळमळ आणि देशातील सामाजिक सुधारणांसाठी वृत्तपत्राच्या माध्यामातून प्रबोधन करण्याचे ध्येय होते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या प्रबोधनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तानुबाईंची ही ओळख. एक अत्यंत यशस्वी, सक्षम संपादक म्हणून तानुबाईंचे नाव मराठी पत्रकारितेच्या इतिहासात सुर्वण अक्षरांनी लिहिलं गेलं पाहिजे अशी मागणी बहुजन समाजाने लावून धरली पाहिजे.कारण आज जी पत्रकारिता करतोय ती सत्यशोधक पद्धतीने करतोय का? याचे प्रतिगामी नाही पुरोगामी समाजातील पत्रकारांना तरी भान आहे ? त्यांना भानावर आणण्यासाठी तरी आम्ही बहुजनवादी मंडळींनी भारतातील पहिली संपादक महिला तानुबाईं बिर्जे याच्या नावाने पत्रकार दिन साजरा केला पाहिजे.  पत्रकार वाचक लेखक साहित्यिक आणि हितचिंतक यांना भारतातील पहिली संपादक महिला तानुबाईं बिर्जे पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि शुभमंगलकामना!

  • आनंद म्हस्के 
  • विटा खंबाळे सांगली 
  •  89285 64235


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com