Top Post Ad

मराठी वृत्तपत्र लेखक संघ, महाराष्ट्र राज्य मुंबईचे पुरस्कार जाहीर


 मराठी वृतपत्र लेख संघ, महाराष्ट्र राज्य मुंबई या संस्थेचा २२ वा वर्धापण दिन सोहळाचे औचित्य साधत संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष  एकनाथ बिरवटकर यांनी पुरस्कार घोषित केले. पत्रकार क्षेत्रातील ‘बाळशास्त्री जांभेकर' स्मृती पुरस्कार २०२३ हा ज्येष्ठ पत्रकार  रामहरी तुळशीराम कराड (दै. नांदेड एकजूट, प्रतिनिधी, पुणे) तर कै. यशवंत पाध्ये स्मृती पुरस्कार २०२३ ज्येष्ठ पत्रकार सुहास बिराडे (दै. लोकसत्ता, वसई - विरार, मुंबई ) तर जीवन गौरव पुरस्कार २०२३ डॉ. सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार, लेखक, साहित्यिक (संपादक प्रहार, मुंबई), गंगाधर म्हात्रे (आदिवासी सेवक विरार) यांना घोषित करण्यात आला असून, हा पुरस्कार प्रदान सोहळा ६ जानेवारी २०२३ रोजी दादर येथे संपन्न होणार आहे.

पत्रकार भूषण पुरस्कार २०२३

  • अरुण सुरडकर (संपादक दै. सामपत्र, औरंगाबाद) 
  •  भारत शंकरराव गठ्ठेवार (सहसंपादक दै. नांदेड एकजूट, नांदेड)
  •   दिलीप जाधव (प्रतिनिधी दै. रत्नागिरी टाईप्स)
  •   दिपक सोनवणे (संपादक दै. नवनगर, नवी मुंबई)
  •  शुभम गुप्ता (मुंबई) उद्योग  पुरस्कार २०२३  
  • सुनिल साहेबराव टिप्परसे, नांदेड समाज भूषण पुरस्कार २०२३   
  • सुमंगल मोहिते, मुंबई
  • सुहास मधुकर पाटील, सांगली
  • सचिन खुपसे, ठाणे
  • राजू केशवराव, पालघर
  • सौ. वैशाली बेलाशे, मुंबई शिक्षक रत्न पुरस्कार २०२३ 
  • कृष्णा काजरोळकर, मुंबई पत्रभूषण पुरस्कार २०२३  
  • विश्वनाथ पंडीत, मुंबई
  • रमेश लांजेवार, मुंबई   
  • श्याम ठाणेदार, ठाणे
  • संजय साळगावकर, मुंबई

दिवाळी अंक पुरस्कार २०२३

  • सावी दिवाळी अंक, पालघर
  • दै. किल्ले रायगड, रायगड
  • गंधाली, मुंबई
  • अधारेखित, पालघर शब्द संवाद, रायगड

दि. ६ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता मुंबई मराठी ग्रंथ संग्रालय, डॉ. सुरेंद्र गावसकर सभागृह, शारदा सिनेमा जवळ, नायगाव, दादर, पुर्व मुंबई- १४ येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी   डॉ. सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार, लेखक, साहित्यिक (संपादक प्रहार, मुंबई), असून प्रमुख अतिथी मा. आ.  संजय केळकर, ठाणे, मा. हेमराज बागूल, संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचानालय मुंबई, मा.डॉ.जगनाथ हेगडे, मा. नगरपाल यांची उपसिथती लाभणार असून या पुरस्कार वितरण सोहळ्यास आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष   एकनाथ बिरवटकर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com