Top Post Ad

लिंगायत धर्मियांना धार्मिक अल्पसंख्याक दर्जा मिळावा यासाठी राज्यव्यापी लिंगायत महामोर्चा


  महाराष्ट्र राज्यात एक कोटी व दक्षिण भारतात ८ कोटींच्या वर असणारा लिंगायत समाज गेल्या अनेक वर्षापासुन आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करित आहे विषेशतः गेल्या ८ वर्षापासून देशभरातल्या सर्व संघटना एकत्र करून स्थापन झालेल्या अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत २२ महामोर्चे झाले आहेत . यामध्ये महाराष्ट्रातल्या १० जिल्हयांचा समावेश आहे . नांदेड , लातूर , सांगली , कोल्हापूर , पुणे , सोलापूर , संभाजीनगर , परभणी , यवतमाळ , नाशिक , या जिल्हयात लांखोच्या संख्येने महामोर्चे झाले आहेत . त्याचा पुढील टप्पा म्हणून  २ ९ जानेवारी २०२३ रोजी आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी लिंगायत महामोर्चा होणार आहे यात लाखो लिंगायत समाज सहभागी होणार आहे . 

लिंगायताच्या मागण्या खालीलप्रमाणे आहे . Reg . No. INGr2360F201 दिः / / लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता द्या . राज्यातील लिंगायत धर्मियांना धार्मिक अल्पसंख्याक दर्जा द्या . लिंगायत युवकांच्या विकासासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे . मंगळवेढा येथे मंजूर असलेल्या महात्मा बसवेश्वर स्मारकाचे काम त्वरित सुरु करावे . विधानभवन परिसरात महात्मा बसवेश्वरांचा अश्वारुढ पुतळा उभा करावे .. प्रत्येक गावामध्ये लिंगायत रुद्रभूमी ( स्मशानभूमी ) जागा उपलब्ध करून द्यावी . ५ . ६ . 19 . प्रत्येक गावामध्ये शासनाने ' अनुभव मंटप ' ( सभागृह ) करून द्यावे . 6 . राष्ट्रीय जनगणनेत लिंगायतांसाठी स्वतंत्र कॉलम करावे . ९ . लिंगायत समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्हयात वसतीगृह बांधुन द्यावे .. १०. मिरज रेल्वे जंक्शनला जगतज्योती महात्मा बस्वेश्वर रेल्वे जंक्शन असे नाव द्यावे .

 गेल्या आठवडयात राज्याचे उपमुख्यमंत्री. देवेन्द्र फडणवीस यांनी लिंगायत समन्वय समितीच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली . सर्व मागण्या सोडवण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले तरी समितीने लेखी उत्तर मिळाल्याशिवाय आंदोलन थांबवण्यास नकार दिला व मुंबईत महामोर्चा घेण्याचा निर्धार केला आहे . तरी या महामोर्चा मध्ये लाखोंच्या संख्येने लिंगायत समाजाने सहभागी व्हावे असे आवाहन लिंगायत धर्म पीठाचे अध्यक्ष जगदगुरु श्री चण्णबसवांनद महास्वामी , लिंगायत समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसिकर , सुधीर सिंहासने , विजयकुमार हत्तुरे , आर . एस . देरींगे , बी.एस. पाटील , अॅड . माधवराव पाटील , सतिश कुमार पाटील , प्रदिप बुरांडे , विरेन्द्र मगंलगे , राजेश विभुते , सुनील हेंगणे , अशोक मेनकुदळे , आनंद कर्णे , किर्तीकुमार बुरांडे , विनोद पोखरकर , सचिन पेठकर , अमृता मळली , गणेश हिंगमिरे , सोमनाथ हजापुरे , सचिदानंद विख्खेवार , कैलास वाघमारे , आनंद गवी , गौरख शिखरे , मल्लीकार्जुन मानुरकर , रमेश कोरे , परमेश्वर पाटील , आनंद गुडस , श्रीकांत स्वामी ( बिदर ) यांनी केले 

  • लिंगायत समन्वय समिती
  • राष्ट्रीय समन्वयक • अॅड . अविनाश भोसीकर
  • मो . : 9405773007/9615221008 .
  • पत्ता : बसव क्रांती निवास , नविन कौठा , नांदेड ,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com